बुधवार, १ एप्रिल, २०२०

शेल चारोळी


*शेल काव्य प्रकार*- आपण शिकूयात काहीसा कटेकोर नियम व मर्यादित वर्ण असल्यामुळे रचना लिहिताना मजा येते. शेल काव्य प्रकार चारोळी करताना शब्दाची निवड करतेवेळी शब्द वा वर्णांचे भान आवश्यक  काव्य-प्रकार सहज प्रकारे लिहिता येतो..

या काव्य-प्रकाराचे नियम खूप सोपे आहेत व सहजच चारोळ्या करू शकता. 

शेल रचनेचे नियम

१ प्रत्येक ओळीत ( म्हणजे चारोळीत ) वर्णांची संख्या समान असावी ( चारही ओळीत सारखे वर्ण अक्षरे )

पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द व दुसऱ्या ओळीचा पहिला शब्द समान असावा.. अशाप्रकारेच तिसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द व चौथ्या ओळीत पहिल्यांदा तो शब्द असावा

चारोळी नियमाप्रमाणे चारोळीत दुसऱ्या ओळीचे व चौथ्या ओळीचे यमक असावे
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*शेल चारोळी*             
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*किती आठवणी साठवतो*
*साठवतो सूर्य मावळता*
*दररोज विलयाला जातो*
*जातो विसरुन उगवता*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा