तुझ्यातली रणरागीणी जागी होते तेंव्हा
गळून पडतात दुष्टांचे मनोधैर्य
शब्दांत बारुद भरलेली चंडीका
तुझे रुप होईल असंख्य अबलांची सावली
रक्तबंबाळ झालेल्या मनातील
तुझे हेच अस्त्र आणि शस्त्र आहेत
विसर पडू नको देऊ
तुझ्या ह्या ही रुपाला
चिरडून टाक असेच
अन्यायाच्या रोगाला
मग ते समाजातील असतील
किंवा समाज माध्यमांतील
असूरी प्रवृत्तींचा माज उतरवण्या
तुझी लेखानीच पुरेशी असेल...
सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा