शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

फुलले रे क्षण माझे ...

फुलले रे क्षण माझे..

शिंपल्याच्या मोत्यातून 
भाव शब्दांत कोरले रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

गझलेची झुळूक हलकीशी 
मनोमन भरली रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

काव्यातुन शब्दांमधे
प्रीत दोघांनी पेरली रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

वसंतात गुलाब प्रीतीचा
सुगंधात बहरला रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

किस्से राधेच्या प्रीतीचे
वृंदावनी रंगले रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

चैत्रातला पळसही 
अंगणी बहरला रे
फुलले रे क्षण माझे फुलले रे...

©सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा