शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

गर्द काळोखात मनाच्या

  
गर्द काळोखात मनाच्या
प्रकाश आहे पुस्तकांचा
असतो एकटाच तेंव्हा
जीवलग मित्र एकांताचा

अंधःकार दाटून येता
दीपस्तंभ होते ज्ञानाचा
अपयशाने खचून जाता
उत्साह मिळतो यशाचा

कोणतीही असो परीक्षा 
साथ तुझी अशीच लाभो
वाट हरवली मध्येच तर
पांथस्था परी संग लाभो

सत्य सांगतो एकच साथी
पुस्तक माझे होतो सारथी
रणभूमीवर आयुष्याच्या
शस्त्र घेतो पुस्तक हाती

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा