रविवार, १९ एप्रिल, २०२०

सांज

सांज
शब्दांनाही कधीतरी सुरुंग तो लागतो
गर्द काळ्या गाभा-यातला भावही दाटतो
लाटांची घुसमटही खडक भिजवीत येते
मना मधल्या अंधाराला ओली वाट दिसते

तांबूसल्या आकाशात काळोखही पसरतो
प्रकाशल्या दिवसाला, अंधकारही गिळतो
शुभ्र चांदण्याची चमक, ढगां आड दडते
हलकेच चंद्रकोर उगवणे नभाखाली घडते

सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा