क्षितीज
नजरेने न्याहळता
गाव मला ते दिसते
जीथे क्षितीजाचे ही
दूर अंतर मिटते
पक्षी आकाशी गातात
फिरतात थवे जिथे
अंधुकसी छाया तुझी
चांदण्याचे गाव तिथे
सर्व आभास नसतो
शब्द जपतात नाते
म्हणूनच कवितेत
मन त्याचा ठाव घेते
साहित्याच्या लेखनीने
कोरलाच जातो भाव
म्हणूनच सागरात
असतेच माझी नाव
नियतीची ही पाऊले
अनोळखी मार्गे येते
पुन्हा फिरून येथेच
मन तुझा शोध घेते
©सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा