#शेतकरी
बाप शेतकरी माझा
मोती पिकवी रानातं
जीर्ण रगताचे थेंबं
घाम गाळीतो शेतातं
पाणी जातं कधी येतं
तरी पेरीतोच बापं
मनं कधी न हारतं
सदा राबतोच बापं
कधी पेरणीला कर्ज
कधी सरकारी अर्ज
फे-यामधी नशिबाच्या
नीभावीतो सारे फर्ज
पोरं शिकण्याला दामं
नव्हं कधी घडं त्याला
पुन्हा कर्जाचा रगडा
बार बार नशिबाला
पोरं न्हातीधुती होते
हुंडा पाहूणा मागतो
उरी कर्जाचा डोंगरं
बापं अजन्म फेडीतो
#सोमनाथ_पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा