बुधवार, ८ एप्रिल, २०२०

अभंग रचनाबंध

अभंग रचनाबंध

पहील्या ओळीत चार अक्षरे 
दुसऱ्या ओळीत चार अक्षरे व यमक
तिसऱ्या ओळीत चार अक्षरे व यमक
चौथ्या ओळीत चार अक्षरे 

संकलनः सोमनाथ पुरी

#अभंग

संध्या समयीचे
रूप मनोहर
नभ समांतर
वसुंधरेला

प्रकाशाचा दिवा
मंद ह्या संध्येला
अग्नी त्या वातीला
द्यावा आता

दारी वृंदावन
कृष्ण तो सरसं
अतुर तुळसं
अंगणात 

चुल ही पेटली
सर्व घरोघरी
दरवळ भारी
भूक पोटी

तान्हा ही रडतो
माता ती कामात
पिता तो रानात
गावोगावी

#सोमनाथ_पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा