रविवार, १९ एप्रिल, २०२०

शृंखला



मनातल्या त्या शृंखला
वेदनाही तुला देती
स्वः चा लढा जिंकून तू
पाड मनातल्या भिंती 

बंध जन्मोजन्मीचे हे
तोड गुलामीचे फास
मुक्त जगणे सौख्याचे
वास्तवात जग ध्यास

सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा