स्वातंत्र्य शब्दांचे
किती अश्रू ढळतात ख-या प्रेमात ?
तरीही मने झुरतात गुलाबी आठवात
माहित असते का अगोदर कुणाला
केंव्हा प्रेम होईल वेड्या मनाला
शब्दांना असावे स्वातंत्र्य फुलण्याचे
मनाला का घालावे बंधन प्रेमाचे
प्रेम असावे समानतेच्या तत्वाचे
नसावेत प्रेमातही भेद उच्चनिचतेचे
खुलावेत मने दोघाचेही आनंदाने
सर्व खेद विसरून जवळ यावे मनाने
-सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा