मनातील भावनांना
कागदावर उतरवणे
कागदावरील शब्दांना
मधूर आवाजात गुनगुनने -जमतंय का बघा
खूप चिंतन केल्यानंतर
चिंतनातील आशय टिपणे
को-या कागदावर लिहून
भाव काव्यात गुंफणे - जमतंय का बघा
एखाद्याचे दुःख पाहून
थोडेसे व्याकूळ होणे
व्याकूळ मनालाही
फुल होऊन फुलवणे - जमतंय का बघा
जमलेच तर कोणावर तरी
निस्सीम प्रेम करणे त्या
प्रेमाला मनातून खुलवणे
स्मृतींना आयुष्यभर जपणे - जमतंय का बघा
विश्वाचा ठाव घेताना
स्वःतील माणूस जपणे
यशापयश पचवूनही
मनी उत्साह टिकवणे - जमतंय का बघा
कितीही संकटे आली तरी
जीवनाचा आनंद घेणे
गरजूंना थोडी मदत
सांत्वन करत राहणे - जमतंय का बघा
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा