सोमवार, ६ एप्रिल, २०२०

काय अजून हवय मला...



काय हवय अजून मला, भरपूर दिलेस तू
जगण्याला अर्थच नव्हता तो अर्थ दिलास तू

नैराश्येच्या पोकळीत वसलो होतो मी
अवकाशाच्या पोकळीतील स्वर्ग दिलास तू

गर्दीच्या दुनियादारीत एकटाच उभा मी
दर्दी मनाला , विश्वासाचा हात दिलास तू

दुःखात जगते जग सारे, थोडे साहतो मी
वेदनेच्या अश्रूतूनही, काव्य भाव दिलास तू

काळोखाच्या गर्भात जगतो आपण सर्व सारे
अंधारलेल्या रात्रीला,ज्योती प्रकाश दिलास तू

©सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा