सोमवार, २७ एप्रिल, २०२०

दरवळ

अंगणातल्या प्राजक्त फुलांचा
सुगंध अजून दरवळत येतो
मावळत्या संधी प्रकाशात
मनात चांदणे फुलवून जातो

दिवसरात्रीचे असते अतुट नाते
कातरवेळ मनात व्याकूळ होते
जीव खाते निःशब्द असे असणे
मन संध्येला शब्दांत व्यक्त होते

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा