शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०

आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक सामावून घेते, सा-या आठवणी, 
बालपणीचा काळ सुखाचा, आठवून येतो प्रौढपणी.

शाळेत ठेवलेले पहिले पाऊल, दांडी मारुन घरी येते,
खोटी कारणे सांगून आईलाही, थोडे वेड्यात काढते.

वाढता इयत्ता किशोर अवस्था, मित्राचे बंध वाढत जाते,
दहावीच्या परीक्षेत काॕपी बहादरांची मोठी धांदल उडते.

मनावर तान अभ्यासाचा घेऊन, मग बारावीचे वर्ष येते,
ध्येय काय कळत नाही, पण लोंढा तिकडे मन धावते.

पदवीच्या वर्षात भारावलेले डोके, ध्येयाने पेटून उठते,
पुस्तक पराड अभ्यासू मन, मग थोडे पुस्तकात शिरते.

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा