वाट शब्दांची मनात
शब्द येती विचारात
शब्द असतात भाव
ठाव आपल्या मनात
शब्द पेटवती मने
शब्द जाळती घरे
करी दुःखाचे सांत्वन
शब्द ज्ञानाची भांडारे
शब्द असतात वाट
अभिव्यक्ती रुपी साज
शब्दातच दाटती नभ
शब्द शैलीचे ही बाज
प्रोत्साहन शब्द देती
शब्दामूळे मनी भीती
पुस्तकात शब्द येती
शब्द बुध्दीलाही गती
सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा