भीम सूर्य सोशीतांचा,
भीम दवा दुःखीतांचा
भीम प्रेरणा साहित्याचा
भीम निर्माता घटनेचा
आत्मभान विसरलेल्या,
भीम तळातील मणुष्याचा.
भीम उद्गाता स्वातंत्र्याचा
भीम समतेचा व न्यायाचा
जेथे सावट अज्ञानाचे
भीम सूर्य तो ज्ञानाचा
जेथे दगडी देव पूज्य
तेथे ईश्वर माणसाचा
व्यक्ती पूजा, अंधभक्ती
भीम काळ थोतांडाचा
आत्मसन्मान विसरलेल्या
भीम आत्मभान मणुष्याचा
बुध्दीप्रामाण्य धर्म जाणनारा
भीम विचार गौतमांचा
फुले, शाहू, आशोकाचा
भीम स्तंभ लोकशाहीचा
-सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा