बुधवार, २२ एप्रिल, २०२०

भेटणे तुझे माझे

भेटणे तुझे माझे, हा एक योगायोग जीवनातला
योगायोगानेच चाफा फुलवलास,माझ्या मनातला

फुले असतात नाजूक, कोमेजून नष्ट होण्यासाठी
आठवणीचा कहर कुठे संपतो, जीवंत ह्या हृदयातला

क्षणोक्षणी फुलवायला आवडते, तुला शब्दांत विश्व
मला कुठे गवसतात शब्द, प्रत्येक क्षणाला फुलवायला

तासंतास जातात निःशब्द, मनात मात्र आभाळ असते
सुचल्यावर शब्दांत येतोच की, भाव आपल्या मनातला

तू राधा होऊन बरसतेस, श्रावणातल्या सरीसारखी
मनात भिजत जातो, मग कृष्ण होऊन त्या वृंदावनातला

@ सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा