निरागस असतात
शुध्दशब्द कलेतले
शब्दांवर प्रेम होते
भाव येता मनातले
निरागस निसर्ग तो
निरागस प्रीत असे
मोहनाला घातलेली
राधीकेने साद भासे
जेंव्हा शीळ ओळखीची
येते सख्याच्या ती कानी
होतो व्याकूळ तो सखा
चिंबवण्या प्रीत जुनी
संध्या समयी राधाही
शहारते रोमातून
आळवीते प्रितगीत
वृंदावनी मनातून
मोर पिस हलकासा
स्पर्श तनालाही होतो
व्याकूळल्या त्या मनाला
स्पर्श वसंत तो देतो
-सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा