बुधवार, १५ एप्रिल, २०२०

कविता

चातक

मावळना-या सूर्याला मी चांदणे मागत होतो
मिटवून डोळे जराशे, तुझे स्वप्न पाहत होतो

फुललेल्या रात्रांचे चंद्र सुख कुठे आता
दुपारच्या उन्हातला विरह भोगत होतो

येशील प्रिये म्हणून मी दिवा तो पेटवला
दिव्याच्या ज्योतीची ती आग सोसत होतो

विझेल कधी हा वनवा, जंगलात पेटलेला
गर्द वनराईत, उभा वृक्ष होऊन जळत होतो

आशावादी मनाला, पहिल्या पावसाची ओढ
तहानलेल्या मनाचा, चातक होऊन जगत होतो

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा