बुधवार, २२ एप्रिल, २०२०

शब्दामृत

                     शब्दामृत
घुमटावरती झेंडा फडकतो, आकाश सावळे वरी
कळसावरच्या रंग छटांचे, तिरीप माझ्या अंतरी
मंद दिव्याचे तेज झळकते, मूर्ती उभी सावळी
घंटा नाद गाभा-यातला घुमे नदी, डोंगर कपारी

जन्म मृत्यूच्या फे-यावरती दृष्टी, चंद्र माथ्यावरी
धूप चंदणी सुगंध दरवळे, शब्द अमृताचे कानी
समर्पनाचे तप अंगी, शिवलीला पार्वतीच्या मनी
तनमनाच्या एक बंधनी, शोभे नटवेश्वरअर्धांगिनी


 - सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा