काहीतरी लिहून कधी कधी मी फसतो
जे लिहिलय त्याचाच विचार करीत बसतो
कधी मनातले तर कधी ध्यानातले लिहीत असतो
आणि कधी कधी तर कशातलेच लिहीत नसतो
लिहीणे माझे कर्म मी समजतो, ते करीत असतो
कशाचा शाप का हा व्याप शब्द उगाळत बसतो.
लिहीण्याचेही व्यसन, मनाला लावून मी घेतो
काम धंदे सोडून , लिहीण्यातच हरवून बसतो.
लिहीले नाहीतर,जगात नसल्यासारखा वाटतो
मेंदूला थोडासा खुराक द्यावा म्हणून लिहीतो.
सोमनातब पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा