रविवार, १९ एप्रिल, २०२०

सुर तू.,,

सुर तू ....
किती अधीर होते ते क्षण
प्राजक्तांनी फुललेले अंगण
आता सारे फुल कोमेजतात
घालताना अबोल्याचे बंधन

अंगणाला शोभा रांघोळीची
रांघोळीतील त्या चाफ्याची
तुळशीची पानगळ दुःखद
नयनांना आवड हिरवळीची

तुळशीत असलेला कृष्ण
राधेच्या मनात खटकतो
आणि विनाकारण राधेचा
सवती मत्सर जागा होतो

गोपिकाही अतुर असतात
सावळ्याची खोड काढण्या
वृंदावनी ही सोहळे रंगतात
मुरलीचे मधुर सुर ऐकण्या

सजलेल्या अंगणाला पाहून 
राधा ही मनोमन मोहरते
सोहळ्याला साद देऊन
दोघांची प्रीत अमर करते

सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा