ओसाड खेडे
ओसाड झालेत खेडे आता
माणसाची मनेही फाटलेत
जिथे होता आनंद सदाचा
शेतातले धुरेही तुटलेत
पहात होतो येता जाता
आनंदात कुणबी राबताना
त्याच्या भाळी आट्या आता
होत नाही उलगडा जाताना
जगतात सारे अन्न खाऊन
जातात मातीला लाथाडून
धनासाठी मरतात रोज
निती नियम बाजूला ठेऊन
स्वर्ग होता केळीच्या बागेत
आंब्याच्या अमराईत अमृत
झाडा वरती पक्षी आनंदी
स्वर्ग होता हिरव्या शिवारात
शेतासाठी भावांत भांडण
कोर्टात येते नात्याला आदण
श्रम नको वाटतात आता
वेड लावी पैशाचे गोंदण
सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा