दगड
एकदा सिमेंट भिजलं की
दगड होतं कालांतरानं
माझ्या मनाचाही दगड
झालाय पहिल्या पावसानं
आता पाऊस आला तरीही
मन अजून पक्क होतं अन
पडनारं पाणी चिंब करण्या
अगोदर त्यावरुन वाहून जातं
चकाकतं दगडासारखं
ओल असे पर्यंत
पुन्हा तापत राहतं
ऊन जाईपर्यंत
सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा