गुरुवार, १२ मार्च, २०२०

अमृताभिषेक

अमृताभिषेक

ना तुला शपथेत बांधतो ना वचनात अडकवतो
ह्या हृदयाच्या पवित्र मंदिरात तुझीच मूर्ती पाहतो

जेवढे दिलेस भरभरुन लाघवे क्षण अमृताचे
ते पिंपळपान आठवांच्या पुस्तकात जपून ठेवतो

जीर्ण होतील इथले, वसंतातले फुलोरे सारे
तरी ही शेवटचा श्वास माझा तुझ्याच नावे करतो

सम्राट मी माझ्या हृदयाचा, सम्राज्ञी तु त्यातली
रणांगणी लढण्यास, तुझ्या तलवारीची धार मी होतो

नव्हेत फक्त हे शब्दांचे थवे, आहेत धमण्यातले प्रवाह
त्याच धारेने तुझ्या प्रेमाचा मी अमृताभिषेक करतो

©सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा