#यशवंतराव_बळवंतराव_चव्हाण
(१२ मार्च १९१३- २५ नोव्हेंबर १९८४)
मुंबई राज्याच्या विभाजनानंतर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे पाचवे उपपंतप्रधान होते. ते एक उत्तम राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी,सहकारातील नेते, सामाजिक कार्यकर्ते , वक्ते व साहित्यिक होते. त्यांना सामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या भाषणात आणि लेखनात प्रभावीपणे समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील शेतकरी सहकारी चळवळीसाठी महत्वाची भूमिका पार पाडली.
साहित्य
यशवंतराव चव्हाणांना साहित्यामध्ये ऋची होती. त्यांनी मराठी साहित्य मंडळाची स्थापना केली आणि मराठी साहित्य संमेलनाचे समर्थन केले. त्यांचा अनेक कवी, लेखक यांच्या चांगला संपर्क होता. त्यांचे सह्याद्रीचे वारे, युगांतर व कृष्णाकाठ ही काही साहित्यकृती प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या लेखनापैकी त्यांचे आत्मचरित्राबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र लिहीण्याचा विचार केला होता. पहिल्या खंडात सातारा जिल्ह्यातील कराड ह्या गावी त्यांच्या व्यतित केलेल्या आठवणी आहेत. त्यांचे जन्मस्थान कृष्णा नदीच्या काठावर असल्याने प्रथम खंडाला त्यांनी 'कृष्णाकाठ' हे नाव दिले.
द्विभाषिक मुंबई राज्याच्या रूपात व त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात देखिल त्यांचा पूर्ण वेळ मुंबईतच गेला. त्यासाठी दुसऱ्या खंडाचे नाव 'सागर तीर्थ' ठेवण्याचे ठरले.
त्यानंतर १९६२ मध्ये नेहरु सरकारने त्यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून नियूक्त केले. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दिल्लीतच राहिले. त्यासाठी त्यांनी तिसऱ्या खंडासाठी 'यमूना काठ' हे नाव ठरविले.
परंतु नियतीला हे मान्य नव्हते. त्यांचा पहिला खंडच पूर्ण झाला व प्रकाशित झाला. उर्वरीत दोन खंड पूर्ण होण्या अगोदरच २५ नोव्हेंबर १९८४ ला त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले परंतु त्यांचे कर्तृत्व अजरामर झाले.
#अनुवाद
#सोमनाथ_पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा