शुक्रवार, ६ मार्च, २०२०

कविता म्हणजे ...

*स्पर्धेसाठी*

*कविता म्हणजे..*

 कविता म्हणजे असते शब्दांवरचं प्रेम
मनातील भावनांचा रचनेत केलेला सुंदर मेळ

जी मनाला मोहून टाकते ती असते कविता,
गाणं होऊन मनात घुटमळते ती असते कविता

संवेदनशील मनाने घेतलेला ठाव म्हणजे कविता
मूल्यांचा सार, तत्वांचा आधारही असतो कविता

विश्वात्मकतेचे मूल्य जपून जी फुलते ती कविता
सुंगधाने असंख्य हृदयांना भारावून टाकते ती कविता

कविता कधी तुझी असते तर कधी माझी
पण असते सर्वांच्या ठायी सतत झुळझुळनारी

हळव्या मनाचे कधी ती गीत होऊन जाते तर
कधी कठोर हृदयालाही ती हळवे बनवते

माणसाला माणूसपण देणारी कविता असते
आठवणींना उजाळा देणारी कविता असते

अथांग सागर, तुफान वादळ आणि शांत किनारे
कविताच तर गाठते प्रत्येकाच्या हृदयाचे मिनारे

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा