शब्दांस धार आहे.....
म्हणतात मित्र माझे, तुझ्या शब्दास धार आहे
तो तर थोतांड दुनियेच्या, छाताडावर मार आहे
लुटलेस किती जनांना, पहा आत झोकून
अशा लुटारुंच्या, कानाखाली हा बार आहे
शालीतून मारणे गोटे, हा खेळ मवाळांचा
जहाल ह्या वीराचा, रणांगणात वार आहे
बलात्का-यांना मान जेथे, शोषण गरीबांचे
अशा समाज रचनेवर, केलेला प्रहार आहे
कशास उधळू सुमने, जेथे भक्त आंध आहे
अशा सत्तेत सैतानाच्या, देव ही लाचार आहे
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा