मनोरे उभारतांना....
मनातील स्वैर प्रश्नांचा
वास्तवात पडताळा पहावा,
कल्पनेच्याच हिंदोळ्यावर
का मनाने झुला झुलावा?
जगल्या क्षणांवर थोडा
विश्वास ठेवावा आणि
विश्वासाचा धागा का
पुन्हा कमजोर व्हावा?
असतील स्वप्ने कल्पनेचे
मनोरे उभारण्याचे तर
तसे उभारतांनाही का
मनात उणेपणा यावा?
माझीच प्रश्न अन माझीच उत्तरे
शोधू नयेत कोणी गंधीत अत्तरे
स्मरतो मजला रोजच मी
सांजेच्या सूर्यात पाहतो मी
©सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा