सोमवार, ९ मार्च, २०२०

होळी

स्पर्धेसाठी 
*होळी*

होळी करावी अवगूणांची
आणि पोळी खावी पुरणाची
खाक करावेत भेदाभेद सारे
आणि भजी खावीत कांद्याची

वृक्षवल्लीचे जतन करुन
संरक्षण करावे पर्यावरणाचे
शिव्या आयोजी ओव्या गाव्यात
जतन करावे लोकसाहित्याचे

रंग टाळावेत रसायनांचे
उधळावे गुलाब प्रेमाचे
होळी करावी व्यसनांची
खोबरे खावे घाटीचे

होळी करावी अज्ञानाची
आणि ज्ञान मिरवावे ग्रंथाचे
नकारात्मकतेला राखेत गाढून
सकारात्मक होणे गरजेचे

होळी करावी क्रोधाची अन
हृदयात भाव असावे करुणेचे
दया, क्षमा, शांती, अहिंसा 
 तत्वज्ञान घ्यावे बुध्दाचे

*सोमनाथ पुरी*
वसमत जि. हिंगोली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा