*स्पर्धेसाठी*
*व्यथा बळीराजाची*
थेंब घामाचे सांडती
काळ्या मातीमधे मोती
मोल श्रमाचे ते जाते
मातीमधे जीर्ण होती
गाढ चांदणे ते कुठे
भाळी बळीच्या असती
कुठे होळी आनंदाची
पोशिंद्याच्या भाळी येती?
मौसमात पेरणीच्या
बियाणाला भटकतो
बाप दारोदारी जातो
ऋण सावकारी घेतो
ऋण न फिटता फास
गळा तो लटकावीतो
कुटुंबाची ती आबाळ
शिक्षा ईमानी भोगीतो
सत्तेतले मदमस्त
खुर्चीवरी ते डोलती
पोशिंद्याच्या मतांवर
फक्त नजर ठेवीती
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा