रविवार, १ मार्च, २०२०

माझी मायभूमी

*स्पर्धेसाठी* (नागरी संरक्षण दिन)
 *माझी मायभू*

भारत मातेचा महिमा, शब्दांत वर्णीतो मी
महान कर्मवीर होऊन गेले, त्यांना स्मरतो मी

छत्रपतींचे आदर्श मिळाले या मायभूमीला
मार्गदर्शन लाभले त्यांचे, त्यांना शब्दांत रेखीतो मी

अंधारात ही ज्ञान वाटा, ज्यांनी दावील्या अबला
त्या ज्योतीबाच्या सावीत्रीस, शतदा नमन करतो मी

प्रकाश बाबा आमटे, महान त्यांचे कार्य
दीन दुबळ्यांचे सेवा कर्म, हृदयात गोंदतो मी

देव प्रथम कोणी दाविला? त्या राजा रवी वर्माला
चित्राचित्रातुन देवाच्या, कलेत अमर पहातो मी

'आणि बुध्द हसला' संदेश शांतीचा दिधला
त्या अब्दुल कलामांना, सलाम करतो मी

धर्मनिरपेक्षतेची अन समान स्वातंत्र्याची गाथा
ज्यांनी दिली भारता, त्या भिमाला वंदन करतो मी

*सोमनाथ पुरी*









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा