शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी...

प्रत्येक सकाळ फुलून आल्यावर तुलाच आठवतो
त्याच आठवणींचे ढग दाटल्यावर, दिवस मावळतो

जर सकाळ सायंकाळ तुझीच आठवण करतो
तर तुच सांग आता मी माझा कुठे उरतो ?

केले प्रेम तुझ्यावर, हे घे ! चार चौघात सांगतो
व्यव्हारच जाणतेस तु, तरी तुझीच आठवण करतो

सत्य ना नाकारतो, ना कधी असत्य स्वीकारतो
व्याकूळलेल्या मनामधूनी, तुलाच मी स्मरतो

व्यव्हार मी सोडला कधीचा, मूल्य तत्वांचे जाणतो
करत नसशील प्रेम माझ्यावर, तरीही मी प्रेम करतो

*सोमनाथ पुरी*
दि.२९/०२/२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा