रविवार, २९ मार्च, २०२०

क्षितीज

क्षितीज

नजरेने न्याहळता
गाव मला ते दिसते
जीथे क्षितीजाचे ही
दूर  अंतर मिटते

पक्षी आकाशी गातात
फिरतात थवे जिथे 
अंधुकसी छाया तुझी
चांदण्याचे गाव तिथे 

सर्व आभास नसतो
शब्द जपतात नाते
म्हणूनच कवितेत
मन त्याचा ठाव घेते

साहित्याच्या लेखनीने
कोरलाच जातो भाव
म्हणूनच सागरात
असतेच माझी नाव

नियतीची ही पाऊले
अनोळखी मार्गे येते
पुन्हा फिरून येथेच
मन तुझा शोध घेते

©सोमनाथ पुरी

गुरुवार, २६ मार्च, २०२०

माझे घर

कितीही असू दे सोसीयल अंतर
मनात ठसलेत हृदयाचे मंतर

मूक्त तू आहेस नसेल बंधन
सोडून देऊ आता जादूचे मंतर

जप एकच ध्यास मनामधला
सुगंध दरवळू दे प्रीतीचे अत्तर

रोज नवे बहाणे करावे कशाला
जगूया मनी रंग गुलाबाचे बेहत्तर

विसरून सारे दोघे एक होऊया
गझलेत शेर एकजीवाचे नीरंतर

©सोमनाथ पुरी

काव्यप्रेमी

जिथे वेदनेने जीव विव्हळतो 
तिथे संवेदनांना अर्थ मिळतो
जिथे काळजातून काव्य पाझरते
तिथे काव्यप्रेमी जन्मास येतो

हिरवा निसर्ग

निसर्ग हिरवा

भिर भिर भिर भिर मुक्त पारवा
 ऋतु मधला सौम्य गारवा
चैत्रामधला निसर्ग हिरवा

मरुउद्यानात ह्या वसंत फुलू दे
येतील तुफाने अथांग सागरात 
होडी तरंगती स्थिर राहू दे...!

©सोमनाथ पुरी

कोरोना आने पर

#कोरोना_के_आने_पर

हे इंसान मत कर गुरुर, खुद के मिजाज पर
मिट जायेगा एक दिन, कोरोना के आने पर

बैठा रह अब आरामसे, इक्कीस दिन घर में
कफन भी कम पड जायेंगे, सड़कपे आने पर

बडो बडो को सबक सिखलाया, मिट्टी में मिलाकर
क्यों घुमते हो भीड़ में ,मिटोगे कोरोना के आने पर

हात ना मिलाना,दिन में धोते रहना साबुन लगाकर
गंधगी फैलायी तो, बुं आयेगी तेरी कोरोना के आने पर

दाल खा, रोटी खा, घर बैठे दिमाग खा, ना करना सफर 
वरना पछताना पडेगा, घर वालों को कोरोना के आने पर

#©सोमनाथ_पुरी

पर्यावरण संरक्षण

*****************
*स्पर्धेसाठी*
*पर्यावण संरक्षण* 
******************

अरे माणसा माणसा
घ्यावा प्रत्येकाने वसा
सृष्टी रक्षणा असावा
ध्यास निसर्गाचा जसा

स्वार्थ साधन्यासाठी तू
नको करू वृक्षतोड
करशील विनाश तू
जीवनाचा तो बीमोड

पाणी जपून वापरू
नदी नाले स्वच्छ ठेवू
भूई पाण्याला मुरवू
साठा भूजल वाढवू

हवा स्वच्छ श्वासासाठी
ध्वनी तो ऐकण्यासाठी
स्वच्छ भूमी ती असावी
बालकांच्या खेळासाठी

वृक्ष तोड ती थांबवू
रोप जीवनाचे लावू
मानवाच्या सुखासाठी
जीव सृष्टीचा वाचवू

******************
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
******************

बुधवार, २५ मार्च, २०२०

गुढी मांगल्याची

***************
*स्पर्धेसाठी*
*गुढी मांगल्याची*
***************
नव वर्षाची  पहाट
गुढी उभारूया ताठ
साडीचोळी घाटी तांब्या
कुंकू हळदीचे ताट

चैत्रातला तो फुलोरा
लींब पालवी साखर
फुल हार तो मोगरा
दावू नैवेद्य कानोला

मांगल्याचा सण दारी
पवित्रता शोभे न्यारी
भक्तीभाव तो शृंगारी
दूर जाई महामारी

नाते ते आपुलकीचे
जपा ते हृदय कपारी
गीत मानवतेचे गाऊ
प्रत्येकाच्या ते अंतरी

*****************
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************

मंगळवार, २४ मार्च, २०२०

व्यथा बळीराजाची

*स्पर्धेसाठी* 
*व्यथा बळीराजाची*

थेंब घामाचे सांडती
काळ्या मातीमधे मोती
मोल श्रमाचे ते जाते
मातीमधे जीर्ण होती

गाढ चांदणे ते कुठे
भाळी बळीच्या असती
कुठे होळी आनंदाची
पोशिंद्याच्या भाळी येती?

मौसमात पेरणीच्या
बियाणाला भटकतो
बाप दारोदारी जातो
ऋण सावकारी घेतो

ऋण न फिटता फास
गळा तो लटकावीतो
कुटुंबाची ती आबाळ
शिक्षा ईमानी भोगीतो 

सत्तेतले मदमस्त
खुर्चीवरी ते डोलती
पोशिंद्याच्या मतांवर
फक्त नजर ठेवीती

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*

सोमवार, २३ मार्च, २०२०

माझी लेखनी

**************
*स्पर्धेसाठी*
*माझी लेखनी*
***************
भान वास्तवाचं असे
लेखनीला माझ्या जसे
परखड शब्द जपे
भाव अमृताचा वसे

गाव मनातला दिसे
लेखनीत सहृदय
बंध मनाचीया जसे
चांदण्याची छाया भासे

मानवता लेखनीत
विचारात शुध्दता ती
जनू मोती शिंपल्यात
वसलेले नीत्य सौंदर्य 

लेखनीत माझ्या कधी
तुकीयाची वाणी कधी
नामयाची जनी वसते
व्याधी समाजाची कधी

गुलामीला आळा बसो
गुलामांना मिळो न्याय
सदाचार सदा दिसो
भ्रष्ट आचारास बाय

***************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
******************

रविवार, २२ मार्च, २०२०

कर्प्यू कोरोना

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*स्पर्धेसाठी*
 *स्वीकार जन कर्प्यूचा...*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*स्वीकारले मनातून*
*जनतेच्या कर्प्यूला*
*नरेंद्राचे आवाहन*
*भारताच्या कल्यानाला*

*व्हायरस कोरोनाचा*
*बळी घेतो कित्येकाचा*
*जपा जीव प्रत्येकाचा*
*हाच संदेश राष्ट्राचा*

*हात धुवा साबणाने*
*घरी स्वच्छता असावी*
*करा मदत रोग्याची*
*हिच प्रार्थना मानावी*

*भिती नको मनामध्ये*
*धीर द्यावा जनामध्ये*
*संकटात लढण्यास*
*बळ ठेवा स्वतःमध्ये*

*वाढ करा शरीरात*
*रोग प्रतिकार शक्ती*
*करा सेवन सत्वाचे*
*नको उगी अंधभक्ती*

*आता फक्त धीर द्यावा*
*प्रतिकार कोरोनाचा*
*असो मनी प्रसन्नता*
*धिक्कारत्या विषाणूचा*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
©*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, २० मार्च, २०२०

सायंकाळचे वर्णन

तिन्ही सांजेला कडा अभाच्या शाम वर्ण होती
किलबिलती थवे पक्षांचे आवाज पिलांचे ऐकती
व्याकूळ ध्वनींनी वासरे हंबरती धेनु त्याकडे वळती
मंदीराच्या गाभा-यामध्ये घंटा नाद घुमती अन
आरास दिव्यांची तिमिरातून दिशादिशा उजळती
गजर टाळांचा अन नाद मृदंगाचा मनोमनी घुमती
सावळीच मूर्ती विठ्ठलाची चंद्रभागे तीरी शोभती
नाद मनाचा, श्वास जीवाचा, विठ्ठलमय होती.....!

©सोमनाथ पुरी

चिऊ चिऊ चिमणी (बालकाव्य)


चिऊ चिऊ चिमणी...

चिऊ चिऊ चिमणी
कुठूण गं आली ?
अंगणातील झाडावर
बसली तु फांदीवर

चिऊ चिऊ चिमणी
काय खाते दिवसभर
देते तुला चारा आणि 
पाणी पी पोटभर

चिऊ चिऊ चिमणी
पंख तुझे किती छान
अंग तुझे मऊ मऊ
कुठे असतात कान?

चिऊ चिऊ चिमणी
चोच तुझी किती छान
सुई सारखे टोक त्याला
उडत फिरतेस पानोपान

चिऊ चिऊ चिमणी
राहतेस कुठे रातभर
कुठे असते बाळ तुझे
तुझ्यावीना दिवसभर

चिऊ चिऊ चिमणी
खोपे करतेस नक्षीदार 
कुठे शिकलीस हे ज्ञान
न जाता शाळेवर

चिऊ  चिऊ चिमणी
येतेस का माझ्या घरा
बाळांना तुझ्या मी
भरवीन  पाणी चारा

चिऊ चिऊ चिमणी
इवले इवले तुझे पाय
जमिनीवर थोडा वेळ
भूर्रकन उडून जाय

चिऊ चिऊ चिमणी
डोळे तुझे गोल गोल
टकामका फिरविते
ऐटीत त्याचा डोल

चिऊ चिऊ चिमणी
झाडावर असते घर
झाड नसते तेंव्हा
हिंडते उन्हात भर


*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*


गुरुवार, १९ मार्च, २०२०

हायाकूवरील लेख

‘हायकू’ हा काव्यप्रकार मराठी मातीत रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांचंच!

ग्रंथनामा - झलक

कवयित्री शिरीष पै यांच्या ‘हायकू हायकू हायकू’ या संग्रहाचं मुखपृष्ठSat , 17 November 2018ग्रंथनामाझलकशिरीष पैShirish Paiहायकू हायकू हायकूHaiku Haiku Haiku

कवयित्री शिरीष पै यांच्या समग्र हायकू प्रथमच एकत्रितरीत्या ‘हायकू हायकू हायकू’ या संग्रहात एकत्रित करण्यात आल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनाच्या वतीनं १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित झालेल्या या संग्रहाचं संपादन ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी केलं आहे. त्यांनी संग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

१.

मराठी मातीत ‘हायकू’ हा काव्यप्रकार रुजवण्याचं श्रेय शिरीष पै यांच्याकडे जातं.

शिरीष पै यांचे १९७९ ते २०१५ या कालावधीत एकूण दहा हायकू-संग्रह प्रसिद्ध झाले व अकरावा प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं; त्यामुळे काही हायकू अप्रकाशित राहिले. त्यांनी लिहिलेले प्रकाशित-अप्रकाशित असे सर्व हायकू आता एकत्रितपणे प्रसिद्ध होत आहेत. या हायकूंखेरीज इतरत्र प्रसिद्ध झालेले वा त्यांच्याच वह्यांमध्ये राहिलेले असे हायकू कदाचित असतीलही, परंतु त्यांचे पुत्र अ‍ॅडव्होकेट राजेंद्र पैंनी उपलब्ध करून दिलेले सर्व हायकू या संग्रहामध्ये संग्रहित झाले आहेत. त्यांच्या पहिल्या ‘ध्रुवा’ या हायकूसंग्रहाचा अपवाद सोडला तर शिरीषताईंनी बाकी सर्व संग्रहांच्या नावांमध्ये कटाक्षाने ‘हायकू’ हा शब्द आणलेलाच आहे. उदा. ‘माझे हायकू’, ‘फक्त हायकू’, ‘हेही हायकू’, ‘मनातले हायकू’ इत्यादी. म्हणूनच याही संग्रहाचं नामाभिधान ‘हायकू’ ‘हायकू ‘हायकू’.

या हायकूंची मांडणी तीन भागांमध्ये केलेली आहे. शिरीषताईंच्या सुरुवातीच्या संग्रहांमध्ये त्यांचे हे अनेक विषयांवरचे हायकू एकत्रितपणे सामोरे आले. पहिल्या विभागात ते त्याच अनुक्रमाने आलेले आहेत. २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मनातले हायकू’ या संग्रहात आणि त्यानंतरच्या सर्व संग्रहांत त्यांनी स्वतःच हायकूंची मांडणी जाणीवपूर्वक विषयवार केलेली आहे. थोडी सरमिसळही झाली आहे, पण नीट पाहूनच ‘मनातले हायकू’ व त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या संग्रहांतील हायकूंची मांडणी विषयवार करून दुसरा भाग सिद्ध केलेला आहे. तिसरा भाग हा त्यांच्या आजवर प्रकाशित न झालेल्या हायकूंचा, ज्यात त्यांच्या वहीतून मिळाल्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयांवरचे हायकू एकत्रितच आलेले आहेत.

शिरीषताई स्वतः तर हायकू लिहीत होत्याच. त्याचबरोबर महत्त्वाच्या जपानी हायकूकारांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या हायकूंचे मराठी अनुवादही करीत होत्या. सुरुवातीच्या त्यांच्या या संग्रहामध्ये त्यांनी त्यांच्या अनुवादित हायकूंचाही समावेश केला. नंतरच्या संग्रहांमध्ये मात्र त्यांनी फक्त त्यांचे स्वतंत्र हायकूच घेतले आहेत. आणि ‘हायकू, हायकू, हायकू’ या संग्रहात अर्थातच फक्त शिरीषताईंनी लिहिलेल्या स्वतंत्र हायकूंचाच समावेश आहे.

शिरीषताईंनी स्वतःच्या काही हायकूसंग्रहांना प्रस्तावना लिहिल्या. काही संग्रहांमध्ये प्रस्तावनेखेरीज हायकूसंबंधातले आणखीही काही लेख लिहिले. त्यांतील काही लेखांची शीर्षकं अशी, ‘हायकू : पूर्व स्वरूप आणि आविष्कार’, ‘हायकू आणि मी’, ‘हायकूमधील आध्यात्मिकता’ असे लेख व प्रस्तावना यांचा या लेखनातील संपादित भाग या संग्रहातही घेतला आहे. जिज्ञासूंना तोही नक्कीच वाचनीय वाटेल. हायकू रचनेचे किमान तंत्रही एका लेखात त्यांनी विशद केलेले आहे.

..............................................................................................................

.............................................................................................................................................

२.

शिरीषताईंचे वडील प्रख्यात साहित्यिक, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. शिरीषताई म्हणतात, “आचार्य अत्र्यांची मी कन्या झाले, ती भविष्यकाळात वाङ्मयसेवा करण्यासाठी जणू! ज्या घरात मी जन्मले, मोठी झाले त्या घरात दुसरे कुणीही साहित्याकडे जीवनाचे एक ध्येय म्हणून वळलेच असते. त्या घराचे वाङमयीन संस्कारच असे झपाटून टाकणारे होते की, लेखक होण्यापलीकडे दुसरा काही मार्ग किंवा पर्यायच नव्हता. नियतीने जणू ओढत, खेचत फरपटत मला लेखनाच्याच दिशेला नेले.” या कथनातील शेवटच्या वाक्यातील सूचकता (आणि सत्रताही) शिरीषताईंनी आयुष्यभर केलेल्या ‘लेखन-संसारा’ला व्यापून आहे.

शिरीषताईंनी सुरुवातीला साधं, सोपं, सर्वांना सहज समजेल, भिडेल असं लिहित्यासाठी आपल्या वडिलांनाच ‘लेखनगुरू’ मानलं होतं, तरी गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून जाताना कालांतरानं स्वतःचा लेखनमार्ग स्वतःलाच शोधावा लागतो याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच शिरीषताईंचं त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षापासून सुरू झालेलं कथालेखन हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवांतून निर्माण झालं होतं आणि अर्थातच त्यावर अत्र्यांच्या लेखनाचा आशयाच्या दृष्टीनं प्रभाव जाणवला नव्हता. ‘चैत्रपालवी’ या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत स्वतः अत्र्यांनी लिहिलं होतं, ‘मला आश्चर्य वाटलं, माझ्यासारख्या विनोदी लेखकाची मुलगी असूनही माझ्या मुलीला ट्रॅजिडीचं आकर्षण वाटतं!’ अत्र्यांची नाटकंही ‘उद्याचा संसार’सारखे काही अपवाद सोडले तर प्राधान्याने विनोदी होती. या नाटककाराच्या कन्येनंही चार नाटकं लिहिली पण ती अत्र्यांच्या नाटकांहून पूर्णतः वेगळ्या स्वरूपाची होती. विषय वेगळ्या प्रकारचे होतेच, आणि संवादांमध्ये काव्यात्मता होती.

एकोणीसशे त्रेपन्नपासून शिरीषताईंची पत्रकारिता सुरू झाली. ‘नवयुग’ साप्ताहिकाच्या संपादन खात्यात काम करताना त्या ‘नवयुग’चा वाङ्मयीन विभाग सांभाळत होत्या. या बाबतीत त्यांना दत्तू बांदेकरांचं मार्गर्शन मिळालं. इथं त्यांनी चित्रपट परीक्षणं, पुस्तक परीक्षणं, मुलाखती, व्यक्तिचित्रं असं अनेक प्रकारचं लेखन केलं. याच काळात दोन कादंबऱ्यांचंही लेखन झालं. त्यातील एका कादंबरीला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. त्यांच्या कथांना तर दिवाळी अंकांत मागणी असे. त्यामुळे कथालेखन तर खूपच झालं. ‘नवयुग’कडे येणाऱ्या लेखनामुळे त्यांना मराठी वाङ्मयातील नवीन प्रवाहांची कल्पना येत होती. इतरांच्या कविता छपाईपूर्वी तपासताना आणि दुरुस्त करताना त्यांची कवितेबद्दलची समजही वाढत गेली. पण या साऱ्यांत त्यांची स्वतःची कविता लुप्त झाल्यासारखीच झाली होती. पुढे दैनिकांनी साप्ताहिक पुरवण्या सुरू केल्या, त्यामुळे साप्ताहिकांचे खप खूप कमी झाले आणि ‘नवयुग’ बंद करावं लागलं.

पण १९५६ मध्ये अत्रे यांनी ‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या चळवळीच्या प्रचारासाठी दैनिक ‘मराठा’ सुरू केले व त्यात शिरीषताई ललित लेख लिहू लागल्या. अत्र्यांनी रविवारच्या पुरवणीची जबाबदारी विजय तेंडुलकर आणि शिरीषताईंवर सोपवली होती. अर्थातच तेंडुलकरांचाही शिरीषताईंच्या वाङ्मयीन दृष्टिकोनावर परिणाम होत होता. शिरीषताईंनी या काळात ‘मराठा’चे वाङ्मयीन अग्रलेखही लिहिले आहेत. एकूण या काळात त्यांचा हात वेगवेगळ्या प्रकारे सतत लिहिता राहिला. ‘मराठा’साठी आणि त्याआधी ‘नवयुग’साठी लिहिलेल्या लेखांमधूनच त्यांचे काही उत्तम ललितलेख-संग्रह तयार झाले. त्यांच्या अशा वर्तमानपत्रांसाठी लिहिलेल्या लेखांमधूनही त्यांच्या संवेदनशीलतेचे, निसर्गप्रेमाचे दर्शन होत होतं.

मात्र लुप्त झाल्यासारखी वाटलेली शिरीषताईंची कविता त्यांच्या मुलांच्या बालपणातल्या क्रीडा पाहताना पुन्हा जागी झाली. त्या सुमारास त्यांनी मराठी विषय घेऊन एम. ए.चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या काव्यजाणिवेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरला. अभ्यासासाठी बा. सी. मर्ढेकर आणि विंदा करंदीकर यांची कविता होती. शिकवायला होते, ज्या कवीची कविता शिकवायची त्या कवीच्या काव्यप्रकृतीशी पूर्ण समरस होणारे कवी वसंत बापट. अत्र्यांमुळे नवकाव्याबद्दल शिरीषताईंच्या मनात आधी असलेली अढी नाहीशी झाली आणि बापटांच्या अध्यापनातून शिरीषताईंना मर्ढेकर समजू शकले. करंदीकरांच्या ‘मृदगंध’मुळे काव्यानुभव मुक्तपणे कसा व्यक्त व्हायला हवा याचं शिरीषताईंना भान आलं. म्हणूनच शिरीषताई ‘बापट आणि करंदीकरांचं माझ्या कवितेवरचं ऋण फार मोठं आहे’, अशी कबुली देतात. एवढेच नाही तर त्या असंही म्हणतात की, “मला बापटांनी मर्ढेकरांची आणि करंदीकरांची कविता शिकवली नसती तर... मी कवितेच्या क्षेत्रात जी थोडीफार वाटचाल केली ती कदाचित केलीही नसती.”

पत्रकारितेमधला काळ त्यांना पुरेपूर कार्यमग्न ठेवणारा होता आणि सुरुवातीला काही बाबतीत विफलता निर्माण करणारा होता. मुलांच्या जन्मानंतर त्यांची निराशा नाहीशी झाली आणि त्यांनी एकामागून एक अशा वात्सल्यभावाच्या कविता लिहिल्या, मालवणच्या साहित्यसंमेलनात सादर केलेली ‘बाळ जन्मले तेव्हा मी फिरून जन्मले’ ही कविता तर खूपच गाजली. मधुकर केचे यांना तर ती इतकी आवडली की आपला ‘पुनवेचा थेंब’ हा संग्रह त्यांनी या कवितेलाच अर्पण केला! शिरीषताईंचं कवितालेखन पुन्हा सुरू झालं!

विंदांच्या ‘मृदगंध’ने शिरीषताईंना नवी दिशा दिली आणि शिरीषताईंनी आपल्या ‘एका पावसाळ्यात’ या मालिका कविता लिहिल्या. शिरीषताई आता सातत्याने कविता लिहीत होत्या. त्यांचा ‘कस्तुरी’ हा पहिला कवितासंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. मग (मधुकर केचेंच्या प्रभावामुळे) ‘एकतारी’मध्ये त्यांची अभंगरचना आली. याशिवाय ‘वियाग’, ‘चंद्र मावळताना’, ‘ऋतुचित्र’ हे कवितासंग्रह आले. या काळातल्या त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या मनातल्या निसर्गप्रेमाने चिंब झालेले प्रेमानुभव उत्कटपणे व्यक्त झालेले दिसतात. बाह्य जगातल्या कटू अनुभवांची कुठलीही छाया या कवितांवर दिसत नाही. ‘एका पावसाळ्यात’मधली ‘आपले पाय’ ही एक कविता इथे देण्याचा मोह होतो.

आपले पाय चालत असतात एका अज्ञात संकटाची वाट

लाटेमागून फुटत जाते आंधळी होऊन एक एक लाट

पुन्हा पुन्हा उजळून मिसळतो प्रकाश काळोखात

विझून विझून परत जळतात आपलेच हे मातीचे हात

ठाऊक असते सारे काही... सारे काही दिसत असते

वाहत्यासाठी जन्मलेली एक जखम इमानाने वाहत असते

अशीही एक लढाई असते जिचा शेवट असतो पराभव

वाया जाण्यासाठीच घ्यायचे असतात असे काही अनुभव

३.

मराठी वाचकांना हायकू या तीन ओळींच्या जपानी काव्यप्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने शिरीषताईंनी ‘सत्यकथे’च्या डिसेंबर १९८०च्या अंकात, ‘हायकू : एक वृत्ती एक साधना’ हा लेख प्रसिद्ध केला. या लेखासाठी त्यांनी केनेथ यासूदा यांच्या ‘द जॅपनीज हायकू’ या पुस्तकातील लेखांचा आधार घेतला होता. जपानी कवी पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून हायकू रचित आलेले आहेत व आपल्या अनुभूतींचा उच्चार करत्यासाठी हे माध्यम अत्यंत अनुकूल असल्याचे त्यांच्या अनुभवाला आलं आहे. याच लेखात हायकू वृत्ती, हायकूचा आशय आणि रचना यातील एकात्मता, हायकूचा रूपबंध, हायकूची भाषा अशा अनेक मुद्यांचा परामर्श घेतला होता. या लेखाबरोबरच त्यांनी इंग्रजी अनुवादावरून मराठीत केलेले अनुवादही दिले होते. ‘हायकू’बद्दल आस्था असलेल्या आणखी काही लेखकांनी व कवींनी या लेखांतील काही मुद्यांवर मतमतांतरे व्यक्त केली असली तरी या लेखामुळे बऱ्याच वाचकांचं लक्ष ‘हायकू’कडे वेधलं गेलं. जपानी भाषेतील हायकूंच्या त्यांनी केलेल्या मराठी रूपांतराबद्दल विशेष ऊहापोह झाला.

हायकू हा जरी बराचसा उत्स्फूर्त आविष्कार असला तरीही जपानी हायकूंच्या रचनेचे विशिष्ट तंत्र आहे. त्यांचे रूपबंध निश्‍चित झालेले आहेत. त्यात शब्दमर्यादाही आहे व अशा तंत्रशुद्ध हायकूलाच शुद्ध हायकू मानलं जातं. पण जपानी वा इंग्रजी भाषेपेक्षा मराठी भाषेची मोडणी खूपच वेगळी, काहीशी पसरट असल्यामुळे जपानी हायकूची सर्व वैशिष्ट्यं मराठी हायकूत उतरणं अशक्य आहे याचीही जाणीव झाली. जपानीमधील हायकूंच्या इतिहासातही अनेक प्रयोग होत होतच शुद्ध हायकूचा रूपाशय आकाराला आला होता. तसे प्रयोग मराठी हायकूरचनेतही होत राहणारच हेही लक्षात आलं.

शिरीषताईंच्या ‘सत्यकथे’तील लेखाच्या थोडासा आधी; म्हणजे नोव्हेंबर १९७८ मध्ये अंजली कीर्तने आणि रमेश पानसे यांनी संपादन केलेल्या ‘ऋचा’ या नियतकालिकाचा ‘हायकू विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. या अंकाबद्दल थोडं सविस्तर सांगणं आवश्यक आहे या अंकाच्या निर्मितीमागे प्रेरणा आणि मार्गदर्शनही शिरीषताईंचं होतं. अंजलीने तिच्या संपादकीयात या अंकाचं स्वरूप परिचयात्मक आहे हे स्पष्ट केलं होतं. जपानमधील हायकूंच्या परंपरेचा, त्यामागील झेन तत्त्वज्ञानाचा परिचय मराठी वाचकांना व्हावा हा हेतू होता. त्यात सुरुवातीला ‘हायकू : प्रकृती आणि परंपरा’ हा अभ्यासपूर्ण आणि ‘हायकू’ या काव्यप्रकाराचं मर्म जाणवून देणारा लेख शिरीषताईंनी लिहिला होता. हायकूची रचना, त्यातून जाणवणारं ऋतुभान, निसर्गाचं रमणीय तसंच रौद्र रूप हे सर्व साक्षीभावाने पाहताना मनात जागृत होणारी स्पंदनं, झेन तत्त्वज्ञानाचा जपानी हायकूकारांवरचा प्रभाव व त्यातून होत गेलेला ‘हायकू’ या प्रकाराचा विकास अशा हायकूविषयक अनेक गोष्टी शिरीषताई सांगत जातात. काही महत्त्वाच्या जपानी हायकूकारांचा परिचयही त्या करून देतात आणि हेही सांगतात की ‘हायकू’ जपानच्या सीमा ओलांडून अनेक पाश्चात्य देशांतही पोचला आहे.

या अंकात बा. भ. बोरकरांचा ‘जपानची सांस्कृतिक चित्रलिपी’ हा लेख आहे. शांता शेळके यांची हायकूसंदर्भात पद्मिनी बिनीवाले यांनी घेतलेली एक मुलाखत आहे. इथं मला शांताबाईंनी आळंदीला झालेल्या साहित्यसंमेलनात हायकूंबाबत व्यक्त केलेला धोकाही आठवतो. त्या म्हणाल्या होत्या, “लेखकांचा- विशेषतः कवींचा एक वर्ग कृतक नावीन्यासाठी हपापलेला असतो. ‘सुनीत’ हा रचनाबंध आला तेव्हा रसहीन व कृत्रिम सुनीतांचा सुळसुळाट झाला. मुक्तछंद आला तेव्हा केवळ मुक्त छंद किंवा मुक्त रचना म्हणजेच नावीन्य असं अनेक कवी समजू लागले आणि छंद, जाती, वृत्त यांचा विटाळ मानू लागले. सुरेश भट उत्तम गझल लिहितात हे पाहिल्यावर ‘गझलके सिवा बात नहीं’ अशी हवा पसरली. शिरीष पै, सुरेश मथुरे या कवींनी हायकूचे रचनातंत्र, आशय नीट समजून घेऊन हायकू लिहिले. पण बऱ्याच सामान्य कवींनी ‘हायकू’ हे सध्या चलनी नाणे आहे म्हणून हायकू लिहिण्याचा सपाटा लावला आहे. अशा हायकूंपासून व हायकूकारांपासून सावध राहिले पाहिजे.”

‘ऋचा’च्या अंकात शिरीषताई, सदानंद रेगे, पु. शि. रेगे यांचे उत्कृष्ट हायकू आहेत. इंग्रजीतून आलेल्या हायकूंचे उत्तम अनुवाद आहेत व अन्य काही कवींच्या हायकूसदृश कवितांची दखल घेतली आहे.

पुढे ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या हायकू विशेषांकातूनही हायकू घरोघरी पोहोचला. शिरीषताईंचे हायकू व त्यावर श्याम जोशींनी काढलेल्या रंगचित्यांची प्रदर्शनं झाली. शिरीषताई आपल्या लेखांमधून, पत्रोत्तरांमधून हायकूबद्दलच्या शंकांचं निरसन करीत असत. तरुण कवी-कवयित्री हायकू लिहू लागले. त्यांचे संग्रह प्रकाशित झाले. अशा आठ-दहा संग्रहांना शिरीषताईंनीच चिकित्सक प्रस्तावना लिहिल्या व नव्या हायकूकारांना त्या प्रोत्साहन देत राहिल्या.

शिरीषताईंचं हायकू या मूळ जपानी काव्यप्रकाराकडे लक्ष वेधलं ते विजय तेंडुलकरांनी. १९६३ मध्ये त्यांनी शिरीषताईंच्या हातात इंग्रजीतून अनुवादित झालेले जपानी हायकूंचे सुबक, छोटेखानी हायकू संग्रह ठेवले आणि म्हणाले, “आधी नाही... नंतर नाही... फक्त आत्ताचा क्षण... या क्षणाची कविता म्हणजे हायकू.” तेंडुलकरांचे हे शब्द शिरीषताईंच्या स्मरणात कोरले गेले. त्यांनी ते अनुवाद आस्थेने वाचले. हायकू म्हणजे फक्त तीन ओळींची, काहीतरी हृद्य अनुभव व्यक्त करणारी कविता एवढं तर लक्षात आलंच होतं. तसा प्रयत्न करून पाहूया असंही त्यांच्या मनात आलं. पण हायकू रचना मराठी काव्यपरंपरेपेक्षा फारच वेगळी आहे, हे त्यांच्या त्याच वेळी लक्षात आलं. पण त्याचबरोबर, ही माझ्या स्वतःच्या काव्यवृत्तींशी समांतर अशी एक कविता, असा एक अननुभूत काव्याविष्कार सापडला अशीही महत्त्वपूर्ण जाणीव त्यांना झाली. म्हणूनच ‘हायकू’संबंधातल्या अनेकानेक ग्रंथांचं त्या वाचन करत राहिल्या. या प्रकाराच्या सखोल अभ्यासासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्या झेन तत्त्वज्ञानामधून ‘हायकूं’चा उगम झाला ते तत्त्वज्ञान, त्यातून निर्माण झालेल्या परंपरा, अनेक जपानी हायकूकारांची पार्श्वभूमी, त्यांच्या रचना, जपानमधील निसर्ग अशा आवश्यक गोष्टी समरसतेने समजून घेतल्या. अनेक हायकूंचे अनुवादही त्या करीत होत्या. खरं म्हणजे ही शिरीषताईंना प्रिय झालेल्या हायकूच्या लेखनासाठी त्यांनी केलेली मनाची मशागतच म्हणावी लागेल. त्यांच्या ‘चारच ओळी’ किंवा ‘शततारका’ या संग्रहातील कवितांमधून त्यांच्या हायकूंची चाहूल स्पष्ट कळून येते. उदाहरणादाखल खालील ओळी पाहाव्यात.

पानही हलत नाही

संध्याकाळी आज वाऱ्यानं

हिंदकळत नाही मन

तुडुंब भरून प्रेमानं

....

रोज उठतायत तरंग

करू काय?

भरतीवर समुद्राला

उपाय काय?

मध्यंतरीच्या बारा-तेरा वर्षांत त्यांच्या आयुष्यात खूपच घडामोडी झाल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्र्यांना अटक झाली तेव्हा ‘मराठा’ या वृत्तपत्राचं संपादकपद त्यांना स्वीकारावं लागलं होतं. वेगवेगळी आव्हानं स्वीकारावी लागली. वडिलांच्या, म्हणजेच आचार्य अत्र्यांच्या निधनानंतरही त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागली. अनेक अडचणींना तोंड देता देता ‘मराठा’ही बंद करावं लागलं. हा आयुष्यातला फार मोठा पराभव सोसवेना त्यांना. वैयक्तिक जीवनातही तशी स्वस्थता नव्हती. एकूण; त्यांचे दिवस अत्यंत खिन्न मनःस्थितीत चालले होते. त्या काळाबद्दल त्यांनी लिहिलं आहे, “अचानक जीवन थबकले होते. पुढे काय, हे कळत नव्हते, त्या काळात एकटी, अगदी एकटी पडले होते. बराच वेळ एकटीच बसून असायची मी. मन शून्य झाले होते, पूर्ण रिकामे. घरात बसल्या बसल्या खिडकीतून बाहेरचा निसर्ग दिसायचा. झाडाच्या फांद्या, आकाशाचा निळा तुकडा, उन्हाचे कवडसे, पक्ष्यांचे आवाज ऐकू यायचे. विशेषतः कावळ्यांचे.” त्यांच्या रिक्त जगात भोवतालच्या निसर्गाची प्रतिबिंबे पडायची. तरळत राहायची आणि अशाच मनःस्थितीत त्यांना त्यांचा हायकू सुचला,

केव्हापासून करतोय कावकाव

खिडकीवरला कावळा

इतका भरून येतो त्याचाही गळा?

मग पुढे त्यांना हायकू सुचत गेले. काळ कठीण होता पण हायकू अखेर त्यांना भेटला होता! ज्या हायकूचा त्यांनी शेवटपर्रंत अनुनय केला तो त्यांचा जीवनसाथीच झाला. अखेरपर्यंत त्या हायकू लिहीत राहिल्या.

कविवृत्तीच्या शिरीषताईंचं पहिल्यापासून निसर्गावर नितांत प्रेम होतं. झाडे, पाने, फुले, पाणी, पाऊस, वेगवेगळे ऋतू, आकाश, सूर्य, चंद्र तशी सगळीच पाखरं, मुके प्राणी त्यांच्याशी पहिल्यापासूनच बोलत होते. आता त्यांच्या हायकूमधून अनेक मानवी जीवनानुभव व्यक्त होत होते. ‘प्रेम’ हा विषय तर त्यांच्या मनाचा हळवा भाग व्यापून होता. अशा कितीतरी विषयांवरचे हायकू त्यांच्या लेखनातून सहजपणे उतरत गेले. हायकू सुचत नसलेल्या काळात त्यांची विलक्षण तगमग होत असे. ती तगमगही त्यांच्या हायकूतून प्रतिबिंबित होत असे. हायकूंचा त्यांनी असा ध्यास घेतला होता, जसा मीरेने गिरिधर गोपालचा. त्या कावळ्याशी तर त्यांची घट्ट मैत्री जमली.

कुणाची कशाशी

कुणाची कशाशी

माझी मैत्री कावळ्याशी

या कावळ्यावर त्यांनी शंभरएक तरी हायकू केले असतील.

शिरीषताईंच्या हायकूंचे अंतरंग पुढच्या काही वर्षांत खूपच बदलत गेले. पूर्वी त्या निसर्गाशी संबंधित नसलेल्या क्षणचित्रांना, हायकूंना विशुद्ध हायकू न म्हणता हायकूसदृश रचना म्हणत असत. पण ते त्यांचे मत अनुभवांनी बदललं आहे. आता त्यांच्या मते, ‘तीन ओळीत लिहिलेली दुसऱ्या व तिसऱ्या किंवा पहिल्या व तिसऱ्या ओळीत यमक साधणारी, मूळ उद्गाराला अकस्मात कलाटणी देणारी, छंदमुक्त पण तालबद्ध, कोणताही विषय स्वीकारणारी कविता म्हणजे ‘हायकू’. शिरीषताईंचं निसर्गप्रेम, त्यांना वाटणारी प्राणीमात्रांबद्दलची कणव, त्यांची स्वतःची अध्यात्माबद्दलची ओढ, जे. कृष्णमूर्ती, ओशो, श्री अरविंद, श्रीमाताजी अशा प्रज्ञावंतांचा विचारांची गाढ परिचय अशा सर्व गोष्टी त्यांच्या हायकूनिर्मितीसाठी पोषकच होत्या.

काय चमत्कार झाला

हायकू लिहिल्यावर

प्राण शांत झाला

आणखी एका मनोगतात त्यांनी म्हटलं आहे, “भोवतालच्या आणि स्वतःच्या जीवनातील ज्रा जाणिवा, उणिवा, जी दुःखे मला जाणवतात त्यातून माझ्या हल्लीच्या हायकूंची निर्मिती होत असते... ‘हायकू एक भाव आहे, तो माझा स्वभाव आहे.”

‘हे का हायकू?’ या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं होतं, “हा माझा बहुधा शेवटचा हायकूसंग्रह ठरावा. आता माझी हायकूनिर्मिती थांबली आहे. वयाला पंच्याऐंशी वर्षे पूर्ण होताना आणखी नवीन काय सुचणार?” हे उद्गार व्याकूळ करणारे आहेत. शिरीषताई असत्या तर या प्रतिभाशाली कवयित्रीचा ‘हायकू, हायकू, हायकू’नंतरचा नव्या अनुभवांना साक्षात करणारा संग्रह नक्कीच प्रकाशित झाला असता. आणि त्या नसल्या तरी या हायकूंची प्रतीती नित्य नवीनतेने येत राहणार आहे आणि त्यांचा तो फुलपाखरावरचा हायकू...

नको रे धरूस चिमटीत

फुलपाखराचं नाजूक अंग

दुखतोय... पंखांवरला रंग

तो आणि आणखी कितीतरी हायकू हायकूरसिकांच्या मनात भिरभरत राहतील.

मराठी भाषेत जपानी हायकू प्रकार रुजवणाऱ्या, बहराला आणणाऱ्या कवयित्री शिरीष पैंचं मराठी साहित्यजगत सदैव ऋणी राहील.

https://www.aksharnama.com/client/article_detail/2760

गझलेची बाराखडी

| गझलेची बाराखडी ||

                                - सुरेश भट
    
आता महाराष्ट्रात गझल हा काव्यप्रकार आपल्या अंगभूत शक्तीमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. आता नव्या दमाची तरूण पिढी गझलेकडे वळू लागली आहे. परंतु दुर्दैवाने गझलेची पुरेशी किंवा मुळीच माहिती नसल्यामुळे कोणतीही रचना अनेकदा "गझल" म्हणून सादर केली जाते.

गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार असल्यामुळे गझल लिहिणारा आधी उत्तम कवी असला पाहिजे, ही गझलेची पूर्वअट आहे. आणि त्याबरोबरच गझल लिहिणाऱ्याला आधी वृत्तात कोणतीही चूक न करता लिहिता आले पाहिजे. गझलेमध्ये शेवटपर्यंत एकच वृत्त वापरले पाहिजे, हे गझल लिहू इच्छिणाऱ्या कवीने लक्षात ठेवले पाहिजे.

"गझल" हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मूळ अरबी शब्द "गजल" आहे. तोही स्त्रीलिंगी शब्द आहे. हा शब्द जसाच्या तसा फारसीत आला आहे तोही स्त्रीलिंगी म्हणूनच. आणि मराठीत "गजल" ह्या शब्दाला "गझल" हे रूप मिळाले. गझलेचा एकूणच पिंड, तिचा नखरा व नजाकत पाहाता तिचे लिंगपरिवर्तन करणे योग्य नव्हे.

एकाच वृत्तातील, एकच यमक (काफिया) व अन्त्ययमक (रदीफ) असलेल्या प्रत्येकी २-२ ओळींच्या किमान पाच किंवा त्याहून अधिक कवितांची बांधणी म्हणजे गझल.

गझलेमधील ह्या प्रत्येक ओळींच्या कवितेला आपण "शेर" म्हणतो.  गझलेमधील प्रत्येक शेर हा आपल्या जागी एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली स्वतंत्र आणि सार्वभौम कविताच असते.

नेहमीची कविता सलग असते. तिची एक "थीम" असते आणि म्हणूनच ती उलगडत जाते. पण गझल उलगडत नसते. एकाच गझलेत विविध विषय हाताळले जाऊ शकतात. प्रत्येक शेराचा आशय स्वतंत्र असू शकतो किंवा एकच संवेदना, एकच भाव किंवा एकच मूड असलेले सर्व शेर असू शकतात.

जर आपण गझलेमधून कोणताही शेर बाहेर वेगळा काढून त्याचे चिंतन केले, तर मागचा पुढचा कोणताही संदर्भ किंवा संबंध नसूनही तो शेर म्हणजे एक संपूर्ण अभिव्यक्ती असलेली एक वेगळी कविताच असल्याचे आढळून येते.

गझलेच्या फॉर्ममध्ये उलगडत जाणारी सलग कविता लिहिली जाऊ शकते, पण ती कविताच; गझल नव्हे! म्हणून गझलेचे खरे गमक हेच आहे की, प्रत्येक सुटा शेरसुद्धा स्वतंत्र कविताच असतो.

नेहमीची कविता आणि गझल ह्यांत - १) अनेक कवितांची एकाच फॉर्ममध्ये बांधणी आणि मांडणी आणि २) प्रत्येक शेराचे स्वतःचे कविता म्हणून स्वतंत्र अस्तित्व, हे दोन महत्वाचे व मूलभूत फरक असतात.

*गझलेचा आकृतिबंध*

आता गझलेचा आकृतिबंध म्हणजे काय हे समजून घेऊ या. कारण हा आकृतिबंध समजल्याशिवाय गझल लिहिता येत नाही.

गझलेचा आकृतिबंध 

संबंधित गझलेचे वृत्त (बहर), यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) असल्यास अन्त्ययमक या घटकामुळे गझलेचा आकृतिबंध निश्चित होतो. या आकृतिबंधालाच "जमीन" असे म्हणतात. 

*ही न मंजूर वाटचाल मला*
*दे भविष्या तुझी मशाल मला*

*संत समजून काल मी गेलो*
*भेटला शेवटी दलाल मला*

*मी कधीचा उभाच फिर्यादी*
*वाकुल्या दाखवी निकाल मला*

माझ्या या गझलेतील हे तीन शेर आपण वाचले. या तिन्ही शेरात (जातीच्या अंगाने आलेले) एकच वृत्त आहे.

*राधिका*, *राधिका*, *यमाचा*, *गा*

हेच वृत्त या गझलेत शेवटपर्यंत कायम राहते. या गझलेचा शेवटचा शेर असा आहे-

*ये, लपेटून चांदणे घेऊ*
*तू कशाला दिलीस शाल मला?*

वर निर्देशिलेले वृत्त "राधिका, राधिका, यमाचा, गा" या शेवटच्या शेरातही कायम आहे. 

गझलेच्या पहिल्याच शेरात तिचा आकृतिबंध- तिची  'जमीन' स्पष्ट होते. कारण पहिल्या शेरात गझलेचे वृत्त, यमक आणि अन्त्ययमक स्पष्ट होते.
वर दिलेल्या उदाहरणात वृत्त (राधिका, राधिका, यमाचा, गा) स्पष्ट झाले आहे. आणि पहिल्या दोन ओळीत "वाटचाल" व "मशाल" ही दोन यमके आली आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही ओळीत "वाटचाल" आणि "मशाल" या यमकानंतर "मला" हे अन्त्ययमक आले आहे.

गझल शेवटपर्यंत एकाच वृत्तात चालत असली तरी तिच्या फक्त पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत यमक आणि अन्त्ययमक येते. नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीतच यमक आणि त्यानंतर  अन्त्ययमक येते.

गझलेतील अन्त्ययमक (रदीफ) गझल संपेपर्यंत बदलत नाही. काही गझलात अन्त्ययमक नसते. पण ज्या गझलेत अन्त्ययमक असते, त्या गझलेत ते अन्त्ययमक शेवटपर्यंत कायम राहते. एका शेरात एक अन्त्ययमक तर दुसऱ्या शेरात दुसरे अन्त्ययमक असा हास्यास्पद प्रकार गझल खपवून घेत नाही.

त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही, त्याचे शब्द बदलतात. यमकाच्या शब्दात असलेली "अलामत" उर्फ "स्वरचिन्ह" हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते. या अलामतीवरच त्या यमकाचे जीवन अवलंबून असते. हे स्वरचिन्ह (अलामत) सांभाळून यमक कसे साधावयाचे, हे मी येथे नंतर यथास्थल स्पष्ट करीन. त्यापूर्वी "काफिया" आणि "रदीफ" या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे.

*काफिया आणि रदीफ*

"काफिया" या अरबी शब्दाचा अर्थ आहे- मागेमागे चालणारा, पुन्हापुन्हा येणारा, पायाला पाय लावून चालणारा.
मी वरील व्याख्येवरून "काफिया" अधिक स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करतो.

*चंद्र आता मावळाया लागला*
*प्राण माझाही ढळाया लागला*

*काय तो वेडा इथेही बोलला*
*हा शहाणाही चळाया लागला?*

*हाक दाराने मला जेव्हा दिली*
*उंबरा मागे वळाया लागला*

नमुन्यादाखल दिलेल्या माझ्या एका गझलेतील ह्या तिन्ही शेरात "मावळाया, ढळाया, चळाया, वळाया" हे चार शब्द काफिया म्हणून आलेले आहेत. 'मावळाया' ह्या शब्दामागून 'ढळाया' हा शब्द येतो. 'ढळाया'ची पाठ धरून 'चळाया' येतो आणि 'चळाया' नंतर लगेच 'वळाया' हा शब्द त्याच्यामागे येतो. 'ढळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या आधीच्या शब्दाचे अनुसरण केले आहे, तर नंतरच्या शेरात 'चळाया' ह्या काफिया म्हणून येणाऱ्या शब्दाने 'मावळाया' व 'ढळाया' ह्या शब्दांची पाठ सोडलेली नाही. आणि 'वळाया' हा काफियाचा शब्द "मावळाया, ढळाया, चळाया" ह्या आधीच्या (काफिया म्हणून आलेल्या) शब्दांशी नाते राखत आहे. "मावळाया" ह्या काफियाच्या शब्दाच्या मागेमागे, एकामागे एक, अशी एकमेकांचा पदर धरून ही इतर (काफियाच्या) शब्दांची माळ चालत आहे. काफिया हा शब्द पुल्लिंगी आहे. काफियांचे बहुवचन 'कवाफी' असे होते.

आता आपण रदीफ म्हणजे काय ते पाहू या. "रदीफ" ह्या अरबी भाषेतील स्त्रीलिंगी शब्दाचे दोन अर्थ आहेत ते असे-
१) घोडा किंवा उंटावर बसलेल्या स्वारामागे बसलेली व्यक्ती किंवा २) गझलेतील शेरात काफियाच्या (यमक) नंतर पुन्हापुन्हा येणारा शब्द किंवा शब्दगट.
गझलेच्या संदर्भात सांगायचे झाले, तर तिच्या प्रत्येक शेराच्या बाबतीत हे दोन्ही अर्थ अगदी चपखलपणे लागू होतात. कारण आपण जर काफिया (यमक) म्हणून येणाऱ्या कोणत्याही शब्दाला वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेला स्वार मानले तर रदीफ (अन्त्ययमक) म्हणून येणारा शब्द किंवा शब्दगट त्या स्वाराच्या मागे हटकून स्वार होतो, उदाहरणार्थ -

*कालची बातमी खरी नाही*
*हाय, स्वर्गात भाकरी नाही*

*मागता काय लेखणी माझी*
*ही कुणाचीच बासरी नाही*

*राहिले काय पूर्णिमेत अता?*
*चंद्र माझ्या उशीवरी नाही*

वरील तीन शेरात काफिया (यमक) म्हणून आलेले "खरी, भाकरी, बासरी व उशीवरी" हे शब्द "राधिका, राधिका, यमाचा गा"  ह्या वृत्ताच्या घोड्यावर किंवा उंटावर बसलेले स्वार आहेत. पण ह्या प्रत्येक स्वाराच्या मागे "रदीफ" म्हणून आलेला "नाही" हा शब्द हटकून  बसतोच!

इस्लामपूर्व काळापासून अरब जमात काव्यप्रेमी आहे. आणि ह्या जमातीच्या जीवनात घोडा आणि उंट ह्या दोन प्राण्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. अरबी भाषेनुसार "रदीफ" ह्या शब्दाचा अर्थ "घोड्यावर किंवा उंटावर बसलेल्या स्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती" असा आहे. आणि म्हणूनच अरबांनी आपल्याला छंदशास्त्रातातही काफियानंतर हटकून व चिकटून मागोमाग येणाऱ्या शब्दाला किंवा शब्दगटाला "रदीफ" हेच नाव दिले. "रदीफ" या स्त्रीलिंगी अरबी शब्दाचे बहुवचन "रदाफी" असे आहे.

*स्वरचिन्ह उर्फ अलामत*

गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची "जमीन" निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात. पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. उदाहरणार्थ- वाटचाल, मशाल, दलाल, निकाल, रुमाल, हालचाल वगैरे.मात्र गझलेतील अन्त्ययमक उर्फ रदीफ म्हणून असलेला शब्द किंवा शब्दगट शेवटपर्यंत बदलत नाही.

नमुन्यादाखल दिलेल्या शेरात *"मला"* हे अन्त्ययमक उर्फ रदीफ आहे. हे अन्त्ययमक, ही रदीफ पहिल्या ओळीत येणार आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक शेराच्या दुसऱ्या ओळीत यमकांनंतर म्हणजेच काफियानंतर हटकून येणार. उदाहरणार्थ - वाटचाल *मला*, मशाल *मला*, दलाल *मला*, आणि शाल *मला* वगैरे.

ज्याप्रमाणे गझलेच्या पहिल्या शेरात (मतला) तिचा आकृतिबंध उर्फ "जमीन" वृत्त, यमक व अन्त्ययमकावरून ठरत असते, त्याचप्रमाणे ज्या जमिनीत अंगभूत असलेल्या यमकाचे उर्फ काफियाचे स्वरूप त्यातील स्वरचिन्हावरून ठरत असते. या स्वरचिन्हालाच "अलामत" म्हणतात. म्हणूनच ही "अलामत" समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

यमकाच्या उर्फ काफियाच्या शेवटच्या न बदलणाऱ्या एका अक्षराआधी किंवा एकाहून अधिक अक्षरांआधी येणाऱ्या एका विशिष्ट अक्षरात जो न बदलणारा स्वर असतो, त्यालाच स्वरचिन्ह किंवा "अलामत" समजावे. 
उदाहरणार्थ-

*हा ठोकरून गेला, तो वापरून गेला*
*जो भेटला मला तो वांधा करून गेला*

वरील शेरात "ठोकरून, वापरून, करून" अशी यमके उर्फ काफिये (कवाफी) आलेले आहेत. (एकाच ओळीत दोन यमके चालू शकतात.) जर आपण यमकांचे बारकाईने निरीक्षण केले, तर आपणास असे आढळून येईल की "ठोकरून, वापरून, करून" या तिन्ही यमकात "रून" ही शेवटची दोन अक्षरे बदलत नाहीत. मात्र त्यांच्याआधी येणाऱ्या- "ठोकरून" मधील "क" या अक्षरात 'वापरून' या यमकामधील "प" या अक्षरात आणि पुन्हा "करून" या यमकातील 'क' या अक्षरात - हटकून "अ" हा स्वर आलेला आहे. क्वचित 'अ' च्या जागी ऱ्हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर वापरला जातो. परंतु तो अपवाद समजावा.

याच गझलेतील अजून एक शेर पहा.

*आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा*
*माझाच भास माझ्या अंगावरून गेला*

वरील शेरात यमक म्हणून "अंगावरून" हा शब्द आलेला आहे. या यमकात शेवटी "रून" ही दोन अक्षरे अटळपणे आलेली आहेत. परंतु त्याचवेळी "रून" या शेवटच्या दोन अक्षरांआधी असलेल्या 'व'  या अक्षरांतील 'अ' हा स्वर सांभाळला गेला आहे. म्हणजे "रून" ही शेवटची दोन अक्षरे कायम आणि त्याआधी येणाऱ्या "व" या अक्षरात "अ" ही अलामत कायम.

अलामतीची कल्पना देण्यासाठी मी याच गझलेतील अजून एक शेर येथे देतो-

*कानात कोठडीच्या किंचाळला झरोका-*
*"बाहेर एक कैदी तारा धरून गेला!"*

*स्वरचिन्ह उर्फ अलामत-२*

गझल लिहिण्यासाठी फक्त शेवटपर्यंत एकाच वृत्तात लिहून भागत नाही, तर एकदा पहिल्या शेरात यमक आपल्या स्वरचिन्हासह प्रस्थापित झाले की, अलामतीसकट काफियाचे स्वरूप स्पष्ट झाले की, मग शेवटपर्यंत त्या अलामतीच्या कायद्यानुसारचे, ते स्वरचिन्ह सांभाळून नंतरचे यमकाचे शब्द योजावे लागतात. 

उदाहरणार्थ-

हरेक आवाज आज अर्ध्यात *छाटलेला*
हरेक माणूस आज आतून *फाटलेला*

अरे कुणी चोरला उद्याचा पहाटतारा
उजेड येई दिव्यादिव्यातून *बाटलेला*

माझ्या एका गझलेचे हे दोन शेर आहेत. पहिल्या शेरात "छाटलेला" आणि "फाटलेला" असे दोन यमकाचे शब्द आहेत. येथे जर काळजीपूर्वक विचार केला, तर आपणास असे आढळून येईल की, गझलेच्या पहिल्या शेरातच यमकाचे स्वरूप स्पष्ट झालेले आहे.

ह्या यमकात शेवटची ती अक्षरे - "ट-ले-ला" ही अटळ आहेत, आणि त्याआधी येणाऱ्या "छा" आणि "फा" ह्या प्रत्येक अक्षरात "आ" ही अलामत आहे. ह्याच कायद्यानुसार ह्या गझलेत "काटलेला, दाटलेला, पहाटलेला, थाटलेला, वाटलेला, झपाटलेला" असे यमक म्हणून शब्द येतील. कारण 'ट-ले-ला' ह्या शेवटच्या तीन न बदलणाऱ्या अक्षरांआधी येणाऱ्या 'का, दा, हा, था, वा, पा' ह्या अक्षरांत न चुकता 'आ' ह्या स्वराची अलामत आलेली आहे. म्हणजे आधी 'आ' हा स्वर असलेले, 'आ' ही अलामत असलेले अक्षर आणि नंतर 'ट-ले-ला' ही शेवटची तीन न बदलणारी अक्षरे, असे हे यमक आहे. 

अलामत गझलेनुसार येणाऱ्या विविध यमकात आपली जागा बदलू शकते. 
उदाहरणार्थ-

मी असा त्या बासरीचा *सूर* होतो
नेहमी ओठांपुनी मी *दूर* होतो

मी न केली चौकशी साधी घनांची
ऐन वैशाखातला मी *पूर* होतो

ह्या गझलेत सूर, दूर, आणि पूर ह्या यमकात 'ऊ' ही अलामत आहे. शेवटचे अक्षर 'र' हे आहे. येथे यमकातील शेवटून दुसऱ्या अक्षरात अलामत आहे.  ही अलामत सूर, दूर आणि पूर यमकातील 'सू, दू, आणि पू' ह्या शेवटून दुसऱ्या अक्षरातील 'ऊ' ह्या स्वरांची आहे. ह्याच गझलेतील अजून एक शेर पहा-
कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ?
जीवनाला मीच नामंजूर होतो

ह्या शेरातील 'नामंजूर' ह्या यमकातील 'जू' ह्या अक्षरात सुरवातीचीच 'ऊ' ही अलामत आली आहे. मात्र 'र' ह्या शेवटच्या अक्षराच्या आधी येणाऱ्या अक्षरातच 'ऊ' ही अलामत आहे.
मघाशी आपण पाहिले की, 'ट-ले-ला' ह्या तीन न बदलणाऱ्या (छाटलेला, फाटलेला) अक्षरांआधी येणाऱ्या शेवटून चौथ्या अक्षरात 'आ' ही अलामत होती. तर आता वरील शेरात 'ऊ' ही अलामत असून तिचे स्थान मात्र यमकाच्या शेवटून दुसऱ्या अक्षरात आहे.
गझलेच्या पहिल्या शेरात 'जमीन' निश्चित होते. जमीन म्हणजे काय याचे स्पष्टीकरण आधी झालेले आहेच. परंतु ह्या जमिनीत असलेले यमक ऊर्फ काफिया कसा असावा, हे अलामतच ठरवते. आणि ह्या अलामतीच्या कायद्यानुसारच शेवटपर्यंत यमक ऊर्फ काफिया चालवायचा असतो. 
अलामत म्हणजे काय हे स्पष्ट होण्यासाठी आता मी शेवटचे उदाहरण देतो -

*बेरका होता दिलासा मानभावी धीर होता*
*पाठ राखायास माझी लाघवी खंजीर होता*

*मी जरी हासून आता बोलतो आहे ऋतूंशी*
*ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता*

वरील शेरात 'धीर, खंजीर' आणि 'गंभीर'  ह्या यमकातील 'धी, जी, आणि भी' ह्या अक्षरात 'ई' ह्या स्वराची अलामत आहे. शेवटचे 'र' हे अक्षर मात्र कायम!

*शेवटी महत्वाचे*

१. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.

२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.

३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!

४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.

५. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद  असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.

६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.

७. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.

८. गझलेमधील शेर विरोधाभासावरच (PARADOX) आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे. स्थलाभावी नमुन्यादाखल माझा एकच शेर येथे उद्धृत करतो-

*उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी*
*उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली*

९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये. 

शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-

*ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s*
*रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s*

एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?
म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा.

१०. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा. 

महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो.

जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा;
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही...!🙏🙏

स्पर्धेसाठी कोरोना

******************
*स्पर्धेसाठी*
*कोरोना*
******************
आला आला व्हायरस 
त्याला देऊ नका थारा
प्रवेश त्याचा शरिरात
आपले वाजवितो बारा

उपाय त्याचे सोपे
हात स्वच्छता करा
हातातले हात सोडा
दुरून नमस्कार करा

असो किती गोड बाळ
त्याचे मूके घेणे टाळा
कोरोनाच्या युध्दामध्ये
प्रेमातही दुरुनच पडा

शिंकताना तोंडाला 
रुमाल आडवा धरा
घरीदारी नेहमीच
ठेवा स्वच्छता जरा

आला प्रसंग त्याला
घाबरु नका कोणी
हिंमतीने असे तोंड द्या
कि नष्ट व्हावे संकटानी

******************
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
******************

बुधवार, १८ मार्च, २०२०

हायकू (कोरोना)

हायकू

कोरोना प्रेम
जगाचा केला गेम
शाळेला सुट्टी 

विद्यार्थी खुश
गुरुजी तो बेकार
सुट्टया चिकार

तोंडाला मास्क
मृत्यू दराचा टास्क
जगात भिती

हात धुवून 
सगळे परेशान
पाण्याला काम

मंत्र तो छान
कोरोना गो कोरोना
जातो कोरोना ?

©सोमनाथ पुरी

हायकू

🌹🌹🌹🌹
*स्पर्धेसाठी* 
🌷🌷🌷🌷
*पळस (हायकू)*
💐💐💐💐💐
*पळस  रानी*
*वसंत फुल मनी*
*तीन पानाचा*

*फुलता लाली*
*रंगात बहरली*
*रोमांच मनी*

आला कुठूनी*
*सूर बासुरीचा तो*
*राधा दिवानी*

*रंग पंचमी*
राधाकृष्ण रंगली
वनी सजली

रंग रंगत
*गुलाबाचा रंगीला*
राधाकृष्णात
🌺🌺🌺🌺🌺
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🌻🌻🌻🌻🌻🌻



मंगळवार, १७ मार्च, २०२०

गझल सदृश्य

               

माझं असणं आता नकोसं झालय तुला
बघ किती नजरांनी घेरलय आपल्याला 

शब्दांतील भाव पेलतांना तोलले शब्दाने
तुझे माझे नाते शब्दांतून भावले लोकांला

आता तु माझ्यापासून का दूर जात आहे ?
तु दूर जान्यानं मनात गहिवर येतो मला

ब-याचवेळा  एकांतात असतो मी दूर तू
शब्द तरी कधी आठवले प्रत्येक भावाला

तुला नियमात बांधणे शक्य होत नाही गझले
तशी व्याकरणातील गझल कुठे जमली मला?

©®सोमनाथ पुरी

सोमवार, १६ मार्च, २०२०

गुलमोहर

🌸🌸🌸🌸🌸🌸
*स्पर्धेसाठी*
🌻🌻🌻🌻🌻🌻
*गुलमोहर*
🌷🌷🌷🌷🌷🌷
फुलता मनीचा वसंत
गुलमोहर मनाची पसंत
लालरंग उधळतो नभी
उन्हातही फुलतो वसंत

मधूरस प्राशन करण्या
भ्रमरास खुलवी सुमन
आठवणीतून मनाला
फुलवीतो फुलमोहन

गुलमोहर कळतो त्याला
ज्यांच्या अनुभवात प्रेम
असेल विरह तरी दिसते
विरहणीत मोहर प्रेम

शाम मुकुटावर वसे
गुलमोहर कृष्णचूड
राज आभरण असे
राजस गुणांचे फुल

🌹🌹🌹🌹🌹🌹
*©®सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

मनोरे बांधतांना....

मनोरे उभारतांना....

मनातील स्वैर  प्रश्नांचा
वास्तवात पडताळा पहावा,
कल्पनेच्याच हिंदोळ्यावर 
का मनाने झुला झुलावा?

जगल्या क्षणांवर थोडा
विश्वास ठेवावा आणि 
विश्वासाचा धागा का
पुन्हा कमजोर व्हावा?

असतील स्वप्ने कल्पनेचे
मनोरे उभारण्याचे तर
तसे उभारतांनाही का
मनात उणेपणा यावा?

माझीच प्रश्न अन माझीच उत्तरे
शोधू नयेत कोणी गंधीत अत्तरे
स्मरतो मजला रोजच मी 
सांजेच्या सूर्यात पाहतो मी

©सोमनाथ पुरी

रविवार, १५ मार्च, २०२०

आठवणीचा बहर

🌼🌻🌻🌻🌻🌻🌼
        *स्पर्धेसाठी*
🌺🌺🌺🌺🌺🌺
   *आठवांचा बहर*
🌹🌹🌹🌹🌹🌹

*तुझं पत्र मी चोरुन* 
*एकदा वाचलं होतं*
*तु न सांगीतलेलं* 
*सर्व मला कळलं होतं*

 *माहेर सोडताना*
 *गहिवरलेलं मन*
*शब्दामध्ये प्रथम*
*मी पाहिलं होतं*

*रडत होते सर्व पण* 
*तुझा चेहरा क्लांत*
*आत गीळलेलं दुःख*
*मी वाचलं होतं*

*उंबरठा ओलांडताना*
*गाठ होती पदराची*
*मोहरुन आलेलं मन*
*मी ही पाहिलं होतं*

*सुख दुःखात साथ देत*
*तु कसं कुटुंब जपलं*
*संयमानं जगण्याचं गुढ*
*मला आता उमगलं होतं*

*तुला न सांगताच* 
*तुझं पत्र वाचलं होतं*
*न सांगीतलेलं सर्व* 
*आता मला कळलं होतं*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
🌹🌹🌹🌹🌹🌹



शनिवार, १४ मार्च, २०२०

पानगळ

*स्पर्धेसाठी*
*पानगळ*

पानगळ असते वृक्षांची तसेच मनाची
ऋतू येतात आणि जातात झाडे झडली
तरी मनाचे सौंदर्य झडत नसते आणि 
झडलेलं मन ऋतू नूसार दरवळत नसते.

निसर्गाचे व मानवाचे अतूट नाते असते
पण मानवाला बुध्दीचे वरदान असते
म्हणून मानव फुलवतो हवा तेंव्हा स्वतःचा निसर्ग 
ज्याला नसते बंधन निसर्गाचे आणि ऋतूचे

कर्माच्या आणि बुध्दीच्या आधारे मानवास
निसर्ग फुलवता येतो हवा तेंव्हा आनंद घेता येतो
सकारात्मक दृष्टिकोन माणवाच्या उच्च संस्कृतीचे
निर्माण करतो हवा तेंव्हा निसर्ग फुलवतो

होत असतातही निसर्गात बदल 
माणवाला मोहून टाकणारे येतात बादल
निसर्गात हरवणे हि मानवाची प्रवृत्ती 
व स्वतःचा निसर्ग निर्माण करणे ही संस्कृती 

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*






शुक्रवार, १३ मार्च, २०२०

सृष्टीचे ऋतूचक्र

सृष्टीचे ते ऋतूचक्र निरंतर....

गंधीत वाटा गंधीत लाटा 
रंग इश्काचे दिसती बेटा

दवांत भिजणे तुझीच माया
धुक्यात झाली अंधुक छाया

रंगात रंगली मखमल काया
स्पर्श सख्याचा लज्जीत व्हाया

स्वप्न उरीचे घेऊन धडधड
थोडीच झळ थोडीच तडफड

नयन चमकले पाऊल थबकले
वळून पाहता सूरही जुळले

चांदणी रात फुलली रातभर
दाटता अंधार सावट चंद्रावर

सृष्टीचे ते ऋतूचक्र निरंतर
मोहून गेला तो रामप्रहर

©सोमनाथ पुरी






रंगात रंगूया

*स्पर्धेसाठी*
*रंगात रंगू या*

निळे अंबर काळी धरती
फुलांत अनेक  रंग वसती
पाऊस सरी गारा वादळ
रंगीत पक्षांचे थवे पुष्कळ 

निसर्गात ह्या रंगाची उधळण
माणवा सांगती रंगच तनमन
जीवन सारे रंगमय असावे
जीवन कधीही बेरंग नसावे

म्हणून सणाला रंगपंचमीच्या
रंग उधळावे अंगी प्रत्येकाच्या 
रंग प्रेमाचा राधा कृष्णाचा
रंग आनंदाचा प्रत्येक मनाचा

रंगामध्ये नसावा भेद काही
विवीध रंगात एकात्माता वाही
रंग गुलाबी असे प्रेमाचा
नीळा अंबरा एवढ्या मनाचा

रंग पांढरा श्वेत शांततेचा
रंग शेंदरा मनी वैराग्याचा
हिरवी सृष्टी मोरपंखी उत्साह
रंगपंचमीत सोडावा कुत्साह

जीवनामधल्या आनंदाला
रंगात जपावे स्नेह सादाला
खेळूनी रंग होऊया दंग
भिजवूया बेरंगाचे अंग

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*


आभास

माझे प्रश्न अन माझीच उत्तरे 
आभासी जगात शब्दांचीच अत्तरे

सुंगध अभासी दरवळ अभासी
नभा मधला चंद्र अभासी

शब्दामधले फुले अभासी
होळीमधले रंग अभासी

तुझे माझे भेटणे अभासी
जगणे इथले प्रेम अभासी

विश्व अभासातले जगतो आम्ही 
रात्रा रात्रा जागतो आम्ही

डोळे लाल अन डोक्यात स्वप्ने
घेऊन फिरतो स्वर्ग आभासी


मधाळ गोडवा चाखतो अभासी
वाहवा त्याची स्तुती अभासी

अभासतच जगतो जीवन
जगतानाही मरण अभासी

उणे हृदय भरले नयन
काठोकाठ तुडुंब अभासी

©सोमनाथ पुरी

गुरुवार, १२ मार्च, २०२०

कर्तृत्ववान पुरुष

*स्पर्धेसाठी*
*कर्तृत्वान पुरुष*

जोतीबाने सावित्रीला शिकवून
सबळ केले तिच्या ज्ञानाला
वृत्त शिक्षणाचे घेऊन
तिनेही घडवीले स्त्रियांला

त्याग त्या महापुरुषांचा
ज्यांनी देशासाठी केला
भगतसिंग, राजगुरु 
हसत चढले फासावर

अंधश्रध्दा, कर्मकांडास बळी
पडली इथली जनता
तुकोबा अभंगातून रचून 
प्रबोधनाचे वादळ झाला

जाणता राजा शिवछत्रपती
अन्यायातून मूक्त करण्या
शोषीत पिढीत जनतेसाठी
स्वराज्याची शपथ घेतली

स्वच्छतेचा मंत्र देऊनी
हातात घेतले त्याने झाडूला
एकच भाकरी,गाडगे भाजीला
गाडगेबाबा म्हणतात त्याला

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*






यशवंतरा चव्हाण जयंती निमित्त

#यशवंतराव_बळवंतराव_चव्हाण

(१२ मार्च १९१३- २५ नोव्हेंबर १९८४)
      मुंबई राज्याच्या विभाजनानंतर ते स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे पाचवे उपपंतप्रधान होते. ते एक उत्तम राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी,सहकारातील नेते, सामाजिक कार्यकर्ते , वक्ते व साहित्यिक होते. त्यांना सामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या भाषणात आणि लेखनात प्रभावीपणे समाजवादी लोकशाहीचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील शेतकरी सहकारी चळवळीसाठी महत्वाची भूमिका पार पाडली.

साहित्य 
        यशवंतराव चव्हाणांना साहित्यामध्ये ऋची होती. त्यांनी मराठी साहित्य मंडळाची स्थापना केली आणि मराठी साहित्य संमेलनाचे समर्थन केले. त्यांचा अनेक कवी, लेखक यांच्या चांगला संपर्क होता. त्यांचे सह्याद्रीचे वारे, युगांतर व कृष्णाकाठ ही काही साहित्यकृती प्रसिद्ध आहेत.
      त्यांच्या लेखनापैकी त्यांचे आत्मचरित्राबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र लिहीण्याचा विचार केला होता. पहिल्या खंडात सातारा जिल्ह्यातील कराड ह्या गावी त्यांच्या व्यतित केलेल्या आठवणी आहेत. त्यांचे जन्मस्थान कृष्णा नदीच्या काठावर असल्याने प्रथम खंडाला त्यांनी 'कृष्णाकाठ' हे नाव दिले.
     द्विभाषिक मुंबई राज्याच्या रूपात व त्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात देखिल त्यांचा पूर्ण वेळ मुंबईतच गेला.  त्यासाठी दुसऱ्या खंडाचे नाव 'सागर तीर्थ' ठेवण्याचे ठरले.
    त्यानंतर १९६२ मध्ये नेहरु सरकारने त्यांना भारताचे संरक्षण मंत्री म्हणून नियूक्त केले. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते दिल्लीतच राहिले. त्यासाठी त्यांनी तिसऱ्या खंडासाठी 'यमूना काठ' हे नाव ठरविले.
     परंतु नियतीला हे मान्य नव्हते. त्यांचा पहिला खंडच पूर्ण झाला व प्रकाशित झाला. उर्वरीत दोन खंड पूर्ण होण्या अगोदरच २५ नोव्हेंबर १९८४ ला त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
        असे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले परंतु त्यांचे कर्तृत्व अजरामर झाले.

#अनुवाद
#सोमनाथ_पुरी

अमृताभिषेक

अमृताभिषेक

ना तुला शपथेत बांधतो ना वचनात अडकवतो
ह्या हृदयाच्या पवित्र मंदिरात तुझीच मूर्ती पाहतो

जेवढे दिलेस भरभरुन लाघवे क्षण अमृताचे
ते पिंपळपान आठवांच्या पुस्तकात जपून ठेवतो

जीर्ण होतील इथले, वसंतातले फुलोरे सारे
तरी ही शेवटचा श्वास माझा तुझ्याच नावे करतो

सम्राट मी माझ्या हृदयाचा, सम्राज्ञी तु त्यातली
रणांगणी लढण्यास, तुझ्या तलवारीची धार मी होतो

नव्हेत फक्त हे शब्दांचे थवे, आहेत धमण्यातले प्रवाह
त्याच धारेने तुझ्या प्रेमाचा मी अमृताभिषेक करतो

©सोमनाथ पुरी

बुधवार, ११ मार्च, २०२०

संस्कार आणि संस्कृती

*स्पर्धेसाठी*
*संस्कार व संस्कृती* 

गरज आहे माणवाला संस्काराची
घडी बसवण्या योग्य समाजाची
संस्कार असती नानाविध अनेक
माणुस घडवण्या उपयोगी बहुत

असतात संस्कृतीतही संस्कार 
भाषेचे, वेशभूषा व शिक्षणाचे
रितीरीवाज तर असतात अनेक
पण थोडकेच त्यातील असती नेक

हुंडा पध्दती एक संस्कृतीच समाजाची
दोष मानावा अशा संस्काराचा 
पति दारुड्या तो कसला परमेश्वर?
प्रहार करावा अशा सर्व संस्कारांवर

संस्कृती देवाची आणि फसवणा-या बुवांची
संस्कार ह्यातून होती कसले नसावे असले
भ्रष्टाचार अनितीचे जे किस्से गिरवीती
त्याचा विरोध हेच संस्कार संस्कृती 

*©सोमनाथ पुरी*
वसमत जि. हिंगोली









मधुचंद्र

मधुचंद्र
शब्दांचे केले अत्तर तुझ्या चंदण देही शिपडाया
तुझा देह सुगंधीत झाला, अन माझी तृप्त काया

मधुचंद्र धुमसत राहिला एकांत काळोख्या राती
भान हरवून प्राशिल्या अमृत गंधीत धारा 

चांदणे टिपूर शरदाचे, तनावरी त्या खिळले
अन मिठीत घेणे तुजला अंगअंग चुंबाया

दुधाळल्या कातळावरी अंग रोमरोमांत शहारले 
सुत एकवटलेले घुसळीत, नर्म मुलायम स्पर्षाया

हा देह पंचमहाभुतांचा मातीत जीर्ण व्हाया
सुख क्षणाचे घेऊन, अक्रंदन दुभंगून जाया

©सोमनाथ पुरी

मंगळवार, १० मार्च, २०२०

तयास कवी म्हणावे का?

तयास कवी म्हणावे का?

मूग्ध आहे प्रीत ज्याची त्यास शब्द मित्र म्हणावे का?
कवितेत ओसंडली म्हणून काय तिस प्रीत म्हणावे का?

प्रीत हृदयी नसे ज्याच्या ती लेखनीत उतरेल का? 
जे माजवतात शब्दांचे अवडंबर त्यांना कवी म्हणावे का?

ज्या नारीस लळा गोपाळांचा तीस राधा म्हणावे का?
सर्व करुनी मी निर्लेप म्हणणा-यास माणुस म्हणावे का?

व्यव्हाराच ज्याला कळतो नीत्य तो करुणामयी असेल का?
माणुसकीचा थांग न ज्याला त्याला संवेदनशील म्हणावे का?

विष  हृदयात असेल ज्याच्या त्यास अमृता प्रीतम समजेल का?
वा-यासारखे भरकटनारे पाय जमिनीवर राहतील का?








वृत्त काव्य

१] तडित : गालगा
[२] वीरलक्ष्मी : गालगा गालगा गालगा
[३]स्त्रग्विणी : गालगा गालगा गालगा गालगा
[४] कल्पना : गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा
[५]भामिनी : गालगा गालगा गालगागा
[६]लज्जिता : गालगा गालगा लगागागा
[७]पुष्प : गालगागा
[८]मनोरमा : गालगागा गालगागा
[९] कादंबरी : गालगागा गालगा
[१०] मेनका : गालगागा गालगागा गालगा
[११]मंजुघोषा : गालगागा गालगागा गालगागा
[१२]राधा : गालगागा गालगागा गालगागागा
[१३]देवप्रिया/कालगंगा : गालगागा गालगागा गालगागा गालगा
[१४]व्योमगंगा : गालगागा गालगागा गालगागा गालगागा
[१५] सती : लगालगागा
[१६] जलौघवेगा : लगालगागा लगालगागा
[१७]हिरण्यकेशी : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा
[१८] तोटक : ललगा ललगा ललगा ललगा
[१९] संयुत : गागालगा गागालगा
[२०] आनंद : गागालगा लगागा
[२१] आनंदकंद : गागालगा लगागा गागालगा लगागा
[२२] विद्युल्लता : गागालगा लगागा गागालगा लगा
[२३] रसना : गागालगा लगालगा गागालगा लगा
[२४] मंदाकिनी : गागालगा गागालगा गागालगा गागालगा
[२५] सौदामिनी : लगागा लगागा लगागा लगा
[२६] भुजंगप्रयात : लगागा लगागा लगागा लगागा
[२७] वागेश्वरी : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
[२८] प्रमिला/मृगाक्षी : लगागागा लगागागा लगागा
[२९] वियदगंगा : लगागागा लगागागा लगागागा लगागागा
[३०] कलिंदनंदिनी : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[३१] चंचला : गालगाल गालगाल गालगाल गालगाल
[३२] चामर : गालगाल गालगाल गालगाल गालगा
[३३] रंगराग : गालगा लगागागा गालगा लगागागा
[३४] गांधर्वी : गागागागा गागागा
[३५] विद्युन्माला /पादाकुलक : गागागागा गागागागा
[३६] कल्याण : गागागागा गागागागा गागागागा
[३७] विधाता : गागागागा गागागा गागागागा गागागा
[३८] आकाश : गागागागा गागागागा गागागागा गागागा
[३९] ब्रह्मरूपक /कामोन्नता : गागागागा गागागागा गागागागा गागागाग
[४०] मोहिनी : मात्रा [१४,१० ]
[४१] कामिनी : गालगाल गालगालगा
[४२] साशंक : गागाल लगागागा गागाल लगागागा
[४३] महामाया : लगागागा लगागागा
[४४] प्रसूनांगी : लगागागा लगागागा लगागागा
[४५] पिनाकी : लगागागा लगागागा लगागागा लगागा
[४६] हिमांशुमुखी : लगाललगा लगाललगा लगाललगा लगाललगा
[४७] मेधावी : गागागाल गागागाल गागागा
[४८] मायावी : गागागाल गागागाल गागागाल गागागा
[४९] रागिणी : गालगालल गालगालल गालगा
[५०] वंशस्थ : लगालगागा ललगा लगालगा
[५१] अनुराग : ललगालगालगागा ललगालगालगागा
[५२] कन्दर्प : गागालगाल गालल गागालगाल गागा
[५३] रम्याकृती : गागालल गागालल गागा
[५४] मदिराक्षी : ललगागा ललगागा ललगा
[५५] वनमाला : ललगागा लगालगा ललगा
[५६] मानवती : गाललगा गाललगा गाललगा
[५७] प्रेय : गाललगा गालगा गाललगा गालगा
[५८] शुभकामी : गागालल गागालल गागालल गागा
[५९] कलावती : लगालगा ललगागा लगालगा गागा
[६०] मरीचिका : लगालगा ललगागा लगालगा ललगा
[६१] प्रियशिष्या : ललगागा ललगागा ललगागा ललगा
[६२] यशोगंध : लगागाल लगागाल लगागाल लगागा
[६३] श्यामकान्त : गालगाल लगागाल गालगाल लगागा
[६४] नूपुर : गाललगा गालगाल गाललगा गालगा
[६५]रसोदत्त : लगागाल गालगाल  लगागाल गालगाल
[६६] उषा : लगागाल गागागा लगागाल गालगा
[६७] मनमोहिनी : लगागाल गागागा लगागाल गागागा
[६८] गिरिबाला : ललगागा ललगागा ललगागा ललगागा ललगागा
[६९] वसुन्धरा : लगालगा ललगागा लगालगा लगालगा ललगागा
[७०] इन्दुमुखी : गाललगा गाललगा गाललगा गाललगा
[७१] प्रमाथिनी : लगालगा गाललगा लगालगा गाललगा
[७२] पाणिबन्ध : गालगाल गाललगा गालगाल गाललगा
[७३] मानसभंजनी : गाललगा लगालगा गाललगा लगालगा
[७४] आंदोलिका : गागालगागा लगालगागा
[७५] केकिरव : ललगालगागा ललगालगागा
[७६] उपेंद्रवज्रा : लगालगागा ललगालगागा
[७७] विमला : ललगा लगागा
[७८] इंद्रवंशा : गागाल गागाल लगा लगा लगा
[७९] शालिनी : गागागागा गालगागालगागा
[८०] वैश्वदेवी : गागागागागा गालगागा लगागा
[८१] चित्रा : गागागा गागागा गागागा लगागा लगागा
[८२] शिखंडिनी : लगागागागागा
[८३] भ्रमरी : ललगागा
[८४] कन्या : गागागागा
[८५] वागुरा : गालगालगा
[८६] लालिनी : गालगाल लगा लगा लगा
[८७] नाराच : गागालगा लगालगा
[८८] भुजंगसंगता : ललगा लगा लगा लगा
[८९] अच्युत : गालगा ललगा लगा
[९०] पंक्तिका : गालगा लगागा लगालगा
[९१] विद्युलेखा : गागागागा गागा
[९२] सरल : गागागागा ललगा
[९३] तार : ललगा ललगा गागागा
[९४] रामा : गागालगा लगागागागा
[९५] कलिका : गालगागा गागाल लगागा
[९६] कलह : ललगागा ललगागा गा
[९७] सुलोचना : गागाललगा लगालगा
[९८] चारूलोचना : ललगा ललगा लगालगा
[९९] नृपात्मजा : लगालगागा लगालगा
[१००] अर्धक्षामा : गागागागा गाललगागा
[१०१] दोधक : गालल गालल गालल गागा
[१०२] मोदक : गालल गालल गालल गालल
[१०३] त्रिलोकगामी : गागागागा लगालगागा
[१०४] वैष्णव : गाललगागा लगालगागा
[१०५] इरा : गागाललगा लगालगागा
[१०६] अमला : ललगा ललगा लगालगागा
[१०७] मयूरसारिणी : गालगालगा लगालगागा
[१०८] दीपकमाला : गाललगागा गालगालगा
[१०९] चारूलक्षणा : लगालगागा गालगालगा
[११०] रूपोन्मता : गागागागा गागागागा गा
[१११] पद्मावर्त : गागागागा गागागागा गागा
[११२] कान्तोत्पीडा : गाललगागा गाललगागा गागा
[११३] माल्यश्री : गागागागा गागागागा गागागा
[११४] व्रीडा : लगागागा
[११५] सुकेशी : लगागागा लगागा
[११६] सावित्री : गागागालगा
[११७] सुनंदा : गागागा लगागा
[११८] सोमप्रिया : गागालगा
[११९] मदनप्रिया : ललगालगा
[१२०] चूडामणि : गागालगा ललगा
[१२१] वैखरी : गागालगा गागालगा गागालगा
[१२२] मानसहंस : ललगालगा ललगालगा ललगालगा
[१२३] सुरनिम्नगा : ललगालगा ललगालगा ललगालगा ललगालगा
[१२४] प्रीति : गालगागागा
[१२५] नीलतोया : गालगागा गागा
[१२६] नगाणिका : लगालगा
[१२७] प्रमाणिका : लगालगा लगालगा
[१२८] विभावरी : लगालगा लगालगा लगालगा  
[१२९] प्रभाव : लगालगा लगालगा लगालगा  लगा
[१३०] मृणालिनी : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१३१] तरंगिणी : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१३२] अनंगशेखर : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१३३] घारि : गालगाल
[१३४] जला : गागालगा लगा
[१३५] सुकामिनी : गालगाल गालगा
[१३६] समानिका : गालगाल गालगाल
[१३७] कामिनी : गालगाल गालगालगा
[१३८] कलापति : गालगाल गालगाल गालगाल गा
[१३९] देवराज : गालगाल गालगाल गालगाल गालगा
[१४०] गंडका : गालगाल गालगाल गालगाल गालगाल गालगाल
[१४१] प्रमद्वरा : गागालगा लगा गागालगा लगा
[१४२] नारि : गागागा
[१४३] सम्मोहा : गागागागागा
[१४४] तनुमध्या : गागाल लगागा
[१४५] हाला : गागाल लगागागा
[१४६] उध्द्ता : गालगाल लगागा
[१४७] मातंगी : गागागा गागागा
[१४८] साशंक : गागाल लगागागा गागाल लगागागा
[१४९] कलावती : लगालगा ललगागा लगालगा गागा
[१५०] श्रीलीला : गागागा गागागा गागागा गागागा
[१५१] मनोमोहिनी " लगागाल गागागा लगागाल गागागा
[१५२] केशा : लगागा
[१५३] सोमराजी : लगागा लगागा
[१५४] सौदामिनी : लगागा लगागा लगागा लगा
[१५५] कंद : लगागा लगागा लगागा ल
[१५६] कंदुक : लगागा लगागा लगागा गा
[१५७] सिंहपुच्छ : लगागा लगागा लगागा लगागा लगागा
[१५८] क्रीडचंद्र : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा
[१५९] विद्युदाला : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा
[१६०] वागीश्वरी : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा
[१६१] महानाग : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा
[१६२] हारीत : गागालगागा
[१६३] मंथान : गागाल गागाल
[१६४] संनीत : गागाल गागाल गागाल
[१६५] तारामती : गागाल गागाल गागाल गा
[१६६] लयग्राहि : गागाल गागाल गागाल गागा
[१६७] सारंग : गागाल गागाल गागाल गागाल
[१६८] मंदारमाला : गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा
[१६९] सर्वगामी : गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागा
[१७०] आभार : गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल
[१७१] कामबाण दंडक : गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागा
[१७२] द्वियोद्ध : गालगा गालगा
[१७३] हंसमाला : गालगा गालगा गा
[१७४] श्रुतानंद : गालगा गालगा गागा
[१७५] दया : गालगा गालगा गा गालगा गालगा गा
[१७६] श्राद्धरांता : गालगा गालगा गालगा गालगा गा
[१७७] केकेनी : गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गा
[१७८] स्वैरिणीक्रीडन : गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा
[१७९] मत्तमातंग दंडक : गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा
[१८०] आख्यानकी : गागालगागा ललगालगागा लगालगागा ललगालगागा
[१८१] भ्रांत : गालगागा गालगागा गालगागा गालगा गालगागा गालगा
[१८२] वारकामिनी : गालगाल गालगाल गालगा
[१८३] वानरी : लगालगा लगालगा गालगा
[१८४] शिखी : गालगा लगालगा लगालगा लगालगा
[१८५] शिखंडी : लगालगा लगालगा लगालगा गालगा
[१८६] नितंबिनी : गालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१८७] सारसी : लगालगा लगालगा लगालगा लगालगा गालगा
[१८८] वारुणी : गालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१८९] अपरा : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा गालगा
[१९०] वतंसिनी : गालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा
[१९१] सुहंसिक : लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा लगालगा गालगा
[१९२] प्रदीस : गालगाल गालगा लगालगा लगालगा
[१९३] यवन्विता : गालगाल गालगाल गालगाल लगालगा लगालगा लगालगा गा
[१९४] धरित्री : लगालगा लगालगा लगालगा गा
*[१९५] स्वानंदसम्राट: गागालगागा गागालगागा 
[१९६]देवराज: गालगाल गालगाल गालगाल गालगा
[१९७] सत्ईश: गालगागा गालगागा गालगागा गागा
*

दिल नही मानता

तुम नही हो यह दिल ही नही मानता
तुम हो यह भी तो दिल ही नही मानता

तेरे लब्जों कों कब तक आंखो में सजाऊं
झूठे है तेरे लब्ज यह भी दिल नही मानता

दौडाती हो लब्जों को, हमेशा घोडे की तरह
तुम क्या हो सच में यह मैं भी नही जानता

सेज पे बैठी हो सजकर, मेरे हि मकान के अंदर
क्या करती हो दिन रात, यह भी मैं नही जानता

कई बार कहां अपनेही दिलको  मत जा  दरपर, 
कब लौटता हूं मेरे दर पर पता ही नही चलता

धुलिवंदन

*स्पर्धेसाठी*
*धुलिवंदन*

धुल हि असते मातृभूमीची
ललाटास लावा टिळा तीचा
असती अनेक सत्व मातीची
जपावी नाती खरी स्नेहाची

एक रंग असतो गुलाबाचा
रंगात बेधुंद होऊन रंगण्याचा
राधाकृष्णाची प्रीत खरी
प्रीतीचे अत्तर होण्याचा

असता मित्र सुदामा सारखे
भेद विसरावे कृष्णासारखे
अहंकाराला फाटा देऊन
मित्र प्रेम करावे सुदामासारखे

ज्यांच्या तोंडी नेहमी शिव्या
त्यांनी गाव्यात धुळीस ओव्या
अशी धुळ ख-या प्रेमाची
साजीरी करावी आनंदाची

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*




सोमवार, ९ मार्च, २०२०

होळी

स्पर्धेसाठी 
*होळी*

होळी करावी अवगूणांची
आणि पोळी खावी पुरणाची
खाक करावेत भेदाभेद सारे
आणि भजी खावीत कांद्याची

वृक्षवल्लीचे जतन करुन
संरक्षण करावे पर्यावरणाचे
शिव्या आयोजी ओव्या गाव्यात
जतन करावे लोकसाहित्याचे

रंग टाळावेत रसायनांचे
उधळावे गुलाब प्रेमाचे
होळी करावी व्यसनांची
खोबरे खावे घाटीचे

होळी करावी अज्ञानाची
आणि ज्ञान मिरवावे ग्रंथाचे
नकारात्मकतेला राखेत गाढून
सकारात्मक होणे गरजेचे

होळी करावी क्रोधाची अन
हृदयात भाव असावे करुणेचे
दया, क्षमा, शांती, अहिंसा 
 तत्वज्ञान घ्यावे बुध्दाचे

*सोमनाथ पुरी*
वसमत जि. हिंगोली

रविवार, ८ मार्च, २०२०

ब्रम्हकमळ

ब्रम्हकमळ

ती फुलांची अपेक्षा करते माझ्याकडून 
मी काट्यांची फुलं मागतो तिच्याकडून

सुगंध तर दरवळनारच दोन्ही ही फुलांचा
रंगाची अपेक्षा का करावी आपण जगाकडून

रंग तर आहेच ना तुझा आणि माझा गुलाबाचा
कुठे जानवते वेगळे काट्यांचे अस्तित्व मनाकडून

आठवणीवर आठवण असतेच ना सकाळ सायंकाळ
येतेच ओघाने दोघाच्याही भारावलेल्या शब्दांकडून

जीथे उमलते ब्रम्हकमळ तिकडेच जाते आपली वाट
त्या वाटेवरचे सहप्रवाशी दरवळ पसरे आपल्याकडून

©सोमनाथ पुरी

महिला दिन काव्य



संस्कृतीनंही थोडसं बदलावं...

अजून किती वर्ष करावा नुसताच शुभेच्छांचा वर्षाव ?
साखळदंड झुगारुन आतातरी स्त्रिनं स्वातंत्र्य जगाव

स्वामी तिन्ही जगाचा असतो मायेविना भिकारी तर
म्हातारपणी त्याच आईला का वृध्दाश्रमात धाडावं

स्त्री नटली सोन्याने मडविली म्हणूनच का होते मूक्त?
तिच्या पंखांनाही आकाशी झेपावण्या बळ मिळावं

का टाकाव्यात शृंखला संस्कृतीच्या स्त्रीच्या पायात?
तिच्या कल्याणासाठी संस्कृतीनही थोडसं बदलावं

पुजन करता ना ? प्रत्येक  सनाला स्त्री देवतेचं मग
त्याच देवीवर अत्याचार होताना का मर्दानं बघावं?

©सोमनाथ पुरी





कर्तृत्ववान नारी

स्पर्धेसाठी
कर्तृत्ववान नारी

सावित्री वाट झाली प्रकाशाची
सोसुन वेदना ढाल झाली ज्ञानाची
शतकानूशतकाचा अंधार पेलना-या
ज्योत झाली स्त्रियांच्या शिक्षणाची

जिजाऊ माता झाली दुःखी रयतेची
भरकटलेल्या समाजाला न्याय देण्या
गुरु झाली बाल शिवाजींची
घडविण्या तारणहार स्वराज्याची

खुप लढली रणांगणात इंग्रजांशी
इतिहासाचे पान झाली राणी झाशीची
बाळ पाठीवर हाती खड़गं घेऊन
टाच दिली वारुस दाद तिच्या हिंमतीची

हिरकणी दुधाचे कर्ज चुकवत
बुरुज उतरली आई बाळाची
होऊन गेली तीच माता
हिराकणी स्वराज्याची

अहिल्या ती होळकरांची
पति नंतर योध्दा प्रांताची
हाती पिंड शिवाची घेऊन
घडविले तीर्थ जोतीर्लिंगाची

©सोमनाथ पुरी
वसमत जि. हिंगोली

आणि बुध्द झालो...

आणि बुध्द झालो..

तडफडलो एकदाच, शेवटचा श्वास जाताना
मेलोही तेंव्हाच, तुला आइ लव यु म्हणताना

आता आलीस तरी, तुला माझी चीताच सापडेल
राख पाहून पुन्हा, रडू नकोस परत घरी जाताना

येऊ नको स्वर्गातही, मला पुन्हा शोधायला
भेटलोच नाही तर, रचु नको पुन्हा कवितांना

आता मी अज्ञात आहे, अनामिक माझे नाव आहे
दिसेल हिमालयात तुला, पिंपळास कवटाळताना

इथे ही प्रेमच जगतो आहे, हे तु विसरु नकोस
परमतत्व जागत आहे, दुःखाचे मूळ शोधताना

©सोमनाथ पुरी





शनिवार, ७ मार्च, २०२०

नमन शूरवीरा

*स्पर्धेसाठी*
*नमन शूरवीरा*

भेद माणसांनी, माणसांचेच केले
लुटने अनेकांचे मातीत ओशाळले

माणसांपेक्षाही देव भलतेच झाले
आणि माणसांचे जगणे कठीण झाले

श्रध्दा गेली तळाला, वाढ अंधश्रध्देची
अन जन सामान्यांचे पोट सपाट झाले

काळ हा असा झाला दुष्काळी सदाचा
कष्टक-यांच्या घामाचे थेंब जागीच विरले

ध्यास जिजाऊचा,  अन शिवबा तेज झाला
मावळे सोबत घेऊन, स्वराज्यास स्थापिले...

©सोमनाथ पुरी
वसमत जि. हिंगोली

मी एकटा

पहिला पाऊस

पहिला पाऊस

पहिल्या पावसाचा अर्थ 
प्रथमच मला समजला होता
अन दूर तु जाताना तोच
पाऊस पुनःपुन्हा स्मरत होता

किती होते आभाळ दाटलेले?
शब्दांनाही कोडे पडावे
ऐवढे भावनांचे तरंग होते
मनाच्या गाभाऱ्यात उठलेले

वाट पहात आहे पुन्हा
त्याच पावसाची तु नसताना
एकांतात तुझ्याच आठवणीत
बेभान होऊन भिजण्याची...!

©सोमनाथ पुरी





शुक्रवार, ६ मार्च, २०२०

कविता म्हणजे..,.2

*स्पर्धेसाठी*

*कविता म्हणजे...*

कविता म्हणजे असते एक
झुळझुळनारं प्रवाही गाणं
प्रत्येकाच्या हृदयात फुल उमलनारं

नसते ती आग ज्वाला कारण
शितल चांदणे फुलवण्यास
येतात शब्द आगितून तपलेले

कविता कधीच विझत नसते
ती प्रत्येकाच्या हृदयात फुलत असते
कधी ओठावर येते तर कधी आतच स्मरते

नसतो सोस अवाढव्य शब्दांचा कवितेला
असतो तो फक्त भाव विचारातुनही आलेला

श्रेष्ठ कनिष्ठ कुठले भेद? 
नसतातच तसे छेद
ज्या भात्यातून ती येते असतो 
तो संवेदनशिलतेचा असंख्य 
हृदयांना जपणारा.

*सोमनाथ _पुरी*
वसमत जि. हिंगोली



कविता म्हणजे ...

*स्पर्धेसाठी*

*कविता म्हणजे..*

 कविता म्हणजे असते शब्दांवरचं प्रेम
मनातील भावनांचा रचनेत केलेला सुंदर मेळ

जी मनाला मोहून टाकते ती असते कविता,
गाणं होऊन मनात घुटमळते ती असते कविता

संवेदनशील मनाने घेतलेला ठाव म्हणजे कविता
मूल्यांचा सार, तत्वांचा आधारही असतो कविता

विश्वात्मकतेचे मूल्य जपून जी फुलते ती कविता
सुंगधाने असंख्य हृदयांना भारावून टाकते ती कविता

कविता कधी तुझी असते तर कधी माझी
पण असते सर्वांच्या ठायी सतत झुळझुळनारी

हळव्या मनाचे कधी ती गीत होऊन जाते तर
कधी कठोर हृदयालाही ती हळवे बनवते

माणसाला माणूसपण देणारी कविता असते
आठवणींना उजाळा देणारी कविता असते

अथांग सागर, तुफान वादळ आणि शांत किनारे
कविताच तर गाठते प्रत्येकाच्या हृदयाचे मिनारे

*©सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*





बुधवार, ४ मार्च, २०२०

तुफानाचा आधार मी झालो...

तुफानाचा आधार मी झालो...

खवळलेल्या तुफानाचा आधार मी झालो
अन नकळत तुफानावर उदार मी झालो

ध्यास घेऊन शब्दांचे , लेखनीला हाती घेतले
पायावर पडलेल्या दगडाचा घाव मी झालो

गुलाब उधळीता, क्षणोक्षणाला करी काटे रुतले 
बरणी हातामध्ये, अन प्रीतीचा गुलकंद मी प्यालो

राधा होती रंग बावरी , रुप तीचे प्राजक्तांचे
वेनू पडताच, शीळेवरी पाषाण मी झालो

धागे तुटले मोती उडाले, झाले कहर शब्दांचे
नसलेल्या प्रीतीचा, नयनातील सागर मी झालो

@ सोमनाथ पुरी

वेणीत माळीतो मी....


तुझ्या वेणीतं माळीतो, मी फुले प्राजक्तांचे
जनू आकाशी भासे, सौंदर्य  तारकांचे
साडी चांदण्याची खुलवे, तुझ्या ह्या तनाला
रंगवून घेऊ आता सोहळे, आपल्या प्रणयाचे

येशील तु यमूनेच्या तिरी, ऐकून सूर वेनुचे
दिसेल सावळे आसमंत, तुझ्याही मनाचे
देशील तु साथ, बासुरीस मधुर  सुरांच्या
अंगी तरंग उठतील, डोहातील यमूनेचे

पाहशील रुप तु, दर्पणात स्वतःचे
असेलही त्यात रुप, कृष्ण सख्याचे
शोधशील सुरांना, मधुर पाव्याच्या
हृदयातील सूर, असतील मोहनाचे

#सोमनाथ_पुरी

बालगीत

स्पर्धेसाठी
#बालगीत;  माझी बाहुली

किती छान तुझे बोबडे बोल बोल
डोळे मोठे लुकलुकनारे गोल गोल
केश उडे भुरुभुरु बट त्याची गोल गोल
तुच बोलतेस माझ्याशी छान छान बोल

चाल तुझी दुडुदुडु, आहे झोल झोल
पंख तुझी परी सारखे, आहे डोल डोल
च्याबी फिरता गाते कशी गोड गोड
आवडे नेहमी खायला चिक्कुची फोड फोड

आईची आहे तुला खूप ओढ ओढ
खायला देते नेहमी गोड धोड
रंग तुझा गोरा कपाळी टिकली गोल गोल
रुसता तुझे गाल जातात खोल खोल

#सोमनाथ_पुरी
वसमत जि. हिंगोली
9665989838 

गुरुने दिले

*स्पर्धेसाठी*
*गुरुने दिला*

गुरुने दिला मंत्र ज्ञानाचा
अनुभव घ्यावा जगीचा
नावीन्याचा ध्यास घ्यावा 
विकास व्हावा मनाचा

गुरुने दिला मंत्र वाचनाचा
ग्रंथानाच गुरु मानन्याचा
सतत वाचन करुन
वर्तनात पुस्तक आणण्याचा

गुरुने दिला मंत्र निसर्गाचा
नाश केला वृक्षाचा तर
विनाश होईल मानवाचा
गुरुने दिला संदेश सृष्टीचा

गुरूने दिला मंत्र जलाचा
पवित्र असावा साठा तयाचा
जर का करेल अशुद्ध कोणी
विनाशास कारण होईल सृष्टीचा

गुरुने दिला मंत्र मानवतेचा
जीवांवर दया करण्याचा
अहिंसेची कास धरुण
विश्वाचा संहार रोकण्याचा

*सोमनाथ पुरी*
वसमत जि. हिंगोली



सोमवार, २ मार्च, २०२०

शब्दांस धार आहे...

शब्दांस धार आहे.....

म्हणतात मित्र माझे, तुझ्या शब्दास धार आहे
तो तर थोतांड दुनियेच्या, छाताडावर मार आहे

लुटलेस किती जनांना, पहा आत झोकून 
अशा लुटारुंच्या, कानाखाली हा बार आहे

शालीतून मारणे गोटे, हा खेळ मवाळांचा
जहाल ह्या वीराचा, रणांगणात वार आहे

बलात्का-यांना मान जेथे, शोषण गरीबांचे
अशा समाज रचनेवर, केलेला प्रहार आहे

कशास उधळू सुमने, जेथे भक्त आंध आहे
अशा सत्तेत सैतानाच्या, देव ही लाचार आहे

- सोमनाथ पुरी




तिने कसे जगावे?

स्पर्धेसाठी!
तिने कसे जगावे?

स्वच्छंदी फुलपाखरु होऊन
जीवनाच्या बागेत विहरावे
मनमौजी तरल वा-यासम
चंचल तिने असावे

मायेच्या सागराचे शुभ्र
मोती तिने वेचावे
परिमल परिमळ सुगंध होऊन
जीवन तिचे दरवळावे

ज्ञानाच्या पंखाचे बळ
तिने शिक्षणातून घ्यावे
दाहकतेला जीवनाच्या
शितल चांदण्याने शमवावे

मानवतेच्या शत्रू संगे
दूर्गा होऊन लढावे
अपयशाला न खचता
तिने धैर्याने तोंड द्यावे

नकारात्मकतेच्या गर्तेतुन तिने
लाट सकारात्मकतेची व्हावे
तिने असे जगावे, की
कर्तृत्वाने इतिहासाचे पान व्हावे.

सोमनाथ पुरी
वसमत जि. हिंगोली
9665989838









शुभ संध्या

रविवार, १ मार्च, २०२०

माझी मायभूमी

*स्पर्धेसाठी* (नागरी संरक्षण दिन)
 *माझी मायभू*

भारत मातेचा महिमा, शब्दांत वर्णीतो मी
महान कर्मवीर होऊन गेले, त्यांना स्मरतो मी

छत्रपतींचे आदर्श मिळाले या मायभूमीला
मार्गदर्शन लाभले त्यांचे, त्यांना शब्दांत रेखीतो मी

अंधारात ही ज्ञान वाटा, ज्यांनी दावील्या अबला
त्या ज्योतीबाच्या सावीत्रीस, शतदा नमन करतो मी

प्रकाश बाबा आमटे, महान त्यांचे कार्य
दीन दुबळ्यांचे सेवा कर्म, हृदयात गोंदतो मी

देव प्रथम कोणी दाविला? त्या राजा रवी वर्माला
चित्राचित्रातुन देवाच्या, कलेत अमर पहातो मी

'आणि बुध्द हसला' संदेश शांतीचा दिधला
त्या अब्दुल कलामांना, सलाम करतो मी

धर्मनिरपेक्षतेची अन समान स्वातंत्र्याची गाथा
ज्यांनी दिली भारता, त्या भिमाला वंदन करतो मी

*सोमनाथ पुरी*