बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

कोल्हापूरी मिर्ची (लावणी)

***********************************
*स्पर्धेसाठी*
*शब्दरजनी साहित्य समूह आयोजित*
*भव्य राज्यस्तरीय लावणी लेखन स्पर्धा*
*दि. ३०/१२/२०२०, बुधवार*
***********************************
*विषय : कोल्हापूरी मिर्ची*

लागती तिखट चांगली लालभडक ही मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||धृ||

आला थंडीचा महिना जीवाची झाली दैना
वरण भात, भाजीचा पांचट पणा तो जाईना
जीभीला चटका आवड मी आहे सा-यांची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||१||

म्हाता-याला लागते खमंग ठेचा अन भाकरी
तरण्यालाही आहे माझ्यातच गोडी लय भारी
भर ज्वानीत आहे, गावरान लालेलाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||२||

थंडीत गरमी गरमीत नरमी मिरची लाल सस्ती
चव जरा तोंडानी घ्या ना जीरवा तुमची मस्ती
हिरव्या देठाची आहे भर पाडात लाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची||३||

**********************************
*- सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
**********************************

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

काव्यांजली

🌹🌾🌹🌾🌹🌾🌹
गाली तुझ्या
आज लाली पाहिली
झाली काहिली
हृदयाची 🍁

निःशब्द भाव
दरवळत असतो सुगंध
परिमळ बंध
मनोमनी 🍁

गुलाबी सहवास
करतो बेधुंद मनाला
रोमांच क्षणाला
एकांतवेळी 🍁

नीत्य नावीन्य
रोज झळकते अदाभारी
मूर्ती संगमरवरी
हृदयांतरी 🍁

स्मित रुबाबी
बट शोभे भाळी
तेज झळाळी
नेत्रपालवी 🍁

🌹🌾🌹🌾🌹🌾🌹
*सोमनाथ पुरी*
🌹🌾🌹🌾🌹🌾🌹

प्रीत गुलाबी थांडीची (लावणी)

*उपक्रमासाठी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*शब्द रजनी साहित्य समूह आयोजित*
*लावणी उपक्रम*
*विषय : प्रीत गुलाबी थंडीची*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*प्रीत गुलाबी थंडीची....*

मौसमात आली बहार, रानामधी ही सुगीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची||धृ||

सोळा श्रृंगार केला राजसा हा तुमच्यासाठी 
राया आता!अहो सख्या आता! घ्या एक मिठी
पहा कशी नभी लाली पसरली तिन्ही सांजेची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||१||

थंडी वाढली झोंबणारी, गोरी काया थरथरली
तुम्हा पाहून मनात वेंधळी भावना सळसळली
अहो सख्या आता ऊब द्या ना जरा पिरतीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||२||

तारांगणे ही फुलली, रात चांदण्यात शहारली
सख्या पहा ना आता कशी रात धुंद नशीली
बघा भर ज्वानीत कशी कामिनी हि मदनाची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||३||

*- सोमनाथ पुरी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

घुंगरु (लावणी)

 *घुंगरु* (लावणी)

साज श्रृंगार केला सख्या, मी राणी प्रीतीची ||
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||धृ.||

नखरा केला नथीचा, साडीवर शोभे मोर पिसे
भर यौवनात रसरसलेली ज्वानी माझी दिसे
त्यावर खूले पिवळी धमक नऊवारी जरीची
पायी चाळ  घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||१||

काढीते रांगोळी प्राजक्ताची मी तुझ्या अंगणी
मोगराही कसा बहरला,मी गज-याची दिवाणी
माळ वेणीत गजरा दिलबरा, मी राणी प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रितीची ||२||

उडवून दे एकदा बार इश्काचा रंगमहाली
राजसा टच्च अंगभर ज्वानी ही रसरसली
मी भूकेली सख्या दिलबरा तुझ्या प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||३||

*सोमनाथ पुरी*

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

गीत म्हणजे काय?

*गीत म्हणजे काय*

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.


*ध्रुवपद म्हणजे काय ?* *मुखडा म्हणजे काय ?*

ध्रुवपद म्हणजे गाण्याची सुरुवात. त्याला मुखडाही म्हणतात. गाण्याची सुरुवात दोन ओळी किंवा चार ओळीने लिहिता येते. यात छंद आणि मात्रा मध्ये या दोन्ही पद्धतीने गाण्याची रचना लिहिता येते.

*अंतरा म्हणजे काय?*

मुखडाच्या ओळी संपल्यावर नंतर ज्या ओळी सुरू होतात. त्यांना अंतरा म्हणतात. कोणत्याही गाण्यात एका कडव्यात  चार किंवा पाच ओळी असतात.
अंतरीच्या ओळी तीन ओळी असतात. चौथी ओळ ही मुखडा ओळीची असते. अंतरीच्या ओळी ध्रुवपदास समरूप असायला हवी. रचनेत लय,ताल, आशय, यमक असावा. गाण्याच्या ओळी अर्थपुर्ण असाव्यात.सहज गुणगणता यावी आणि चाल लावता यावी अशी रचना असावी. कोणत्याही गाण्याची कडवी ३,४, त्याही पेक्षा जास्त कडवी असू शकतात.

*मीटर म्हणजे काय*?
पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंतचे जे त्याला मीटर असे म्हणतात.
गीत लिहिताना मीटरचे अंतर कमी असावे. गीत सहज गुणगुणता व चाल लावता यावी असे असावे. 

*गीत प्रकार*
अभंग , गझल , लावणी , बालगीत ,भावगीत , भक्तीगीत, देशगीत ,लोकगीत, ओवी, गवळण, पोवाडा असे अनेक गीतेचे प्रकार आहेत.

१) गीत प्रकार :- लावणी

आज आपण लावणी गीत प्रकार बघणार आहोत. लावणी हा काव्याचाच प्रकार आहे. लावणी वाड्:मयाचा अभ्यास करताना... प्रथम आपण तिची शैली पहाणार आहोत . तिची मांडणी, काव्यात्मकता कशी असते रचना लिहिताना या गोष्टी घ्यावा लागतात. गीतांमध्ये सुर,ताल आणि भाव यांचा मधूर संगम असतो. लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला असावा. लवण म्हणजे सुंदर...लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला असावा. लावणी शृंगाररसाचा मानसिक पाया आहे ‌. लावणी हे ग्रामीण गीत आहे. ग्राम्यता, शृंगार व गेयता या तीन लक्षणांसोबत नृत्यात्मकता हे लावणीचे लक्षण आहे. सजण व साजणी यांची मनाला धुंद करणारी चित्र लावणीत आढळतात.लावणीचे अंतरंग सुंदर व रसपूर्ण ती म्हणण्याचा ढंग ही नखरेबाज आहे. वीरश्री आणि शृंगार हे तारूण्याला शोभणारा विषय आहे. लावणी लिहिणे सोपे नाही. वीर, कारूण्य, शृंगार यांची मांडणी म्हणजेच लावणी असते. लावणी लिहिताना आपल्या नजरेसमोर तशी बैठक आणि बाज ठेवावा लागतो. शृंगारशिवाय लावणीत मजा नाही. नुसताच शृंगार रस नाही तर नऊरसांनी ती सजलेली आहे. म्हणून ही लावणी नऊवारीत सादर केलेली आपण नेहमी पाहत आलो आहे. ह्रदयाला चटका लावणारी आणि विशेषतः स्त्री सौंदर्य वर्णन असणारी लावणी आपण शिकणार आहोत.

*लावणीचे प्रकार*

(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

*सौ. अनिता आबनावे* ©®

लावणी उपक्रम

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

*उपक्रम    उपक्रम    उपक्रम*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम लावणी गीत लेखन*

*विषय:- घुंगरू*

*दिनांक:-२८/१२/२०२०*

*लावणी गीतरचना नियम*

♥️  *पहिल्या दोन ओळी ध्रुवपदाच्या असाव्यात*

♥️  *दोन्ही ओळीत शेवटी यमक असावे*

♥️  *चार ओळींची तीन कडवी असाव्यात*

♥️  *दोन दोन ओळीत यमक असावे* 

♥️  *चौथी ओळ ध्रुवपदाची असावी*

♥️  *त्यानुसार लावणीगीत रचना लिहावी*

♥️  *लावणी लयबध्द, सहज गुणगुणता यावी अशी असावी*

🔴   *लावणीचा बाज हा शृंगारीकच हवा,त्यातील लकब,अदाकारी,शृंगार सुंदर शब्दात लिहावे*

🔴.  *लावणीतील प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावी*

*लावणी लिहिणे सोपे नाही तरीही सुध्दा काही जुनी गाणी अभ्यासू शकता... अभ्यासाठी चित्रपटातील जुनी लावणी ऐकून त्यानुसार अभ्यास करावा*


*लावणी म्हटले की शृंगार हा हवाच , आपल्या छान छान शब्दांनी सजवावी नऊरसात ही लावणी, पण लक्षात असू द्या तीन ओळींचा अंतरा घेऊन तिसरी ओळ ध्रुवपदास समरूप व्हायला हवी. लावणी लिहिताना अश्लिलता नको, आपल्या  समूहामध्ये महिला वर्ग आहे याचे भान ठेवावे. लावणीत ठसकेबाज शब्दांचा उपयोग करावा .लावणी सहज गुणगुणता यावी अशा शब्दांची मांडणी करावी. प्रत्येकाची लावणी सुंदर  अविस्मरणीय लावणी व्हायला हवी आहे*
*चला शब्दरजनीकर लिहायला सुरुवात करा*
👍👍👍

=======================

*समूह मार्गदर्शिका*
*कवयित्री राजश्री भावार्थी*
*कवयित्री अनिता आबनावे*

*समूह संचालिका*
*कवयित्री अनिता आबनावे*

*आयोजक*
*शब्दरजनी साहित्य समूह*

🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️

गीत म्हणजे काय?

[27/12, 11:47 PM] Abnave Anita: *गीत म्हणजे काय*

शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्‍त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.


*ध्रुवपद म्हणजे काय ?* *मुखडा म्हणजे काय ?*

ध्रुवपद म्हणजे गाण्याची सुरुवात. त्याला मुखडाही म्हणतात. गाण्याची सुरुवात दोन ओळी किंवा चार ओळीने लिहिता येते. यात छंद आणि मात्रा मध्ये या दोन्ही पद्धतीने गाण्याची रचना लिहिता येते.

*अंतरा म्हणजे काय?*

मुखडाच्या ओळी संपल्यावर नंतर ज्या ओळी सुरू होतात. त्यांना अंतरा म्हणतात. कोणत्याही गाण्यात एका कडव्यात  चार किंवा पाच ओळी असतात.
अंतरीच्या ओळी तीन ओळी असतात. चौथी ओळ ही मुखडा ओळीची असते. अंतरीच्या ओळी ध्रुवपदास समरूप असायला हवी. रचनेत लय,ताल, आशय, यमक असावा. गाण्याच्या ओळी अर्थपुर्ण असाव्यात.सहज गुणगणता यावी आणि चाल लावता यावी अशी रचना असावी. कोणत्याही गाण्याची कडवी ३,४, त्याही पेक्षा जास्त कडवी असू शकतात.

*मीटर म्हणजे काय*?
पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंतचे जे त्याला मीटर असे म्हणतात.
गीत लिहिताना मीटरचे अंतर कमी असावे. गीत सहज गुणगुणता व चाल लावता यावी असे असावे. 

*गीत प्रकार*
अभंग , गझल , लावणी , बालगीत ,भावगीत , भक्तीगीत, देशगीत ,लोकगीत, ओवी, गवळण, पोवाडा असे अनेक गीतेचे प्रकार आहेत.

१) गीत प्रकार :- लावणी

आज आपण लावणी गीत प्रकार बघणार आहोत. लावणी हा काव्याचाच प्रकार आहे. लावणी वाड्:मयाचा अभ्यास करताना... प्रथम आपण तिची शैली पहाणार आहोत . तिची मांडणी, काव्यात्मकता कशी असते रचना लिहिताना या गोष्टी घ्यावा लागतात. गीतांमध्ये सुर,ताल आणि भाव यांचा मधूर संगम असतो. लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला असावा. लवण म्हणजे सुंदर...लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला असावा. लावणी शृंगाररसाचा मानसिक पाया आहे ‌. लावणी हे ग्रामीण गीत आहे. ग्राम्यता, शृंगार व गेयता या तीन लक्षणांसोबत नृत्यात्मकता हे लावणीचे लक्षण आहे. सजण व साजणी यांची मनाला धुंद करणारी चित्र लावणीत आढळतात.लावणीचे अंतरंग सुंदर व रसपूर्ण ती म्हणण्याचा ढंग ही नखरेबाज आहे. वीरश्री आणि शृंगार हे तारूण्याला शोभणारा विषय आहे. लावणी लिहिणे सोपे नाही. वीर, कारूण्य, शृंगार यांची मांडणी म्हणजेच लावणी असते. लावणी लिहिताना आपल्या नजरेसमोर तशी बैठक आणि बाज ठेवावा लागतो. शृंगारशिवाय लावणीत मजा नाही. नुसताच शृंगार रस नाही तर नऊरसांनी ती सजलेली आहे. म्हणून ही लावणी नऊवारीत सादर केलेली आपण नेहमी पाहत आलो आहे. ह्रदयाला चटका लावणारी आणि विशेषतः स्त्री सौंदर्य वर्णन असणारी लावणी आपण शिकणार आहोत.

*लावणीचे प्रकार*

(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

*सौ. अनिता आबनावे* ©®
[27/12, 11:59 PM] Abnave Anita: लावणी 
विषय :- लाखात एक शुक्राची चांदणी

कुहू कुहू कोकीळा गाते प्रेमात मंजुळ गाणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

नेसली भरजरी साडी पैठणी नऊवारी
ओठांवर लाली साज गळ्यात कोल्हापूरी
बांगड्या वाजे खणखण ज्वानीत धुंद होऊनी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

गोरी गोरी माझी काया गालावर खळी
यौवनात उमलते जशी गुलाबाची कळी
झालं वरीस सोळा बहरत आली ज्वानी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

नजर नका लावू नेत्री लावली कोरीव काजळी
लाल कुंकवाचा टिळा चंद्राची कोर कपाळी
उमटे दिलावर राया राज करते ही इश्काची राणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी

.....सौ. अनिता आबनावे ©®
[28/12, 12:04 AM] Bhavarthi Rajashri: लगीनाची घाई का हो झाली कारभारी*!
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!धृ!!*

आणालं का हो राया पैठणी पिवळीजर्द...
बघून तुम्हांस्नि होतील सख्या साऱ्याच सर्द !
मर्दानी बाणा तुमचा पाहता भुलले हो स्वारी ...
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!१!!*

लावण्य सुंदरी मनात खूप भरली ..
पहावया तिला पाव्हणं गोळा झाली !
स्वागतासी त्यांचा मंडप घातला दारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!२!!*

भरजरी शालूचा पदर सावरत ..
नटखट ऐश्वर्या निघाली बावरत !
अक्षतेसाठी हो खोळंबली सारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!३!!*

सौ राजश्री भावार्थी
        पुणे
[28/12, 12:06 AM] Bhavarthi Rajashri: विषय - आरसा*

*भिगिभिगी पावलं माझी आरशापुढे धावली.....!*
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !! धृ !!*

बुगडी माझी सावरत हो, वाट तुमची अडवते ....
वर्खाचा गोविंद विडा, तुमच्यासाठी गुंफते !!
कोमल काया माझी, तुमच्या प्रेमात बुडाली...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली!!१!!*

कारभारी आता तुम्ही जरा दमानं घ्या ...
आरशात माझं देखणं रूप, हे पाहून घ्या !!
पिळदार रुबाबाची भुरळ, या दिलावर पडली ...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !!२!!*

मनीचं माझ्या गोड गुपित,हे सांगून झालं....
काया तुमची बघून माझं अंग शहारलं !!
पिरतीच्या चांदण्याची उधळण, अंगणभर पसरली ..
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी,मनी खूप लाजली!!३!!*

   ©️  *राज*

*सौ राजश्री भावार्थी*
         *पुणे*

शनिवार, २६ डिसेंबर, २०२०

सुनीत


सुनीत

तुझ्या भेटीने काहूर मनी माजतो
का मजला नजर ही तुझी छळते?
पाहून तुला अंतःकरण पिळवटते
मग भाव मनी तुझाच माझ्या दाटतो

देशील तू ही हात हाती माझ्या
चिंतनात किती मी असतो तुझ्या?
नको प्रेमाचा चौघात गाजा वाजा
अशा प्रसिध्दीची नसते प्रेमात मजा

कुढत असशील तू ही मनोमन प्रिये
मी एकांतात गातो तुझेच प्रीत तराणे
का जीवाला घोर लावी नुसता सये ?
एकांतवासी घेऊयात मजेत उखाणे

विरहात तुझ्या असेच मी बडबडतो
सांजवेळी शब्दांत थोडा गडबड 

~ सोमनाथ पुरी

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

शृंगार तुझा...

जीव माझा रंगला सखे
प्रीतीत तुझ्या खरा
काय करु उमजेना मला
दे शब्दांचा आसरा 🍁

दिसता तू होतो धूंद मी
उमलू दे प्रीत ही
रातराणीची दरवळ
येते कशी बघ ही 🍁

नको दुरावा असा आता
जप भाव तू असा
प्राजक्ताचा सडा अंगणी
यावा सुगंध तसा 
🍁
तू अबोली बागेतील ती
मी निःशब्द भ्रमर 🐝
स्मित तुझे फुल पाकळी🌷
मी मोती दहीवर🍁

कमल नेत्री काजळ ते
पाणीदार तरल👀
रेखीव भुवया जणू गं
नक्षी शिल्प सरल
🍁
आवर पदर जरासा
खांद्यावर तो आला
नाजुक बांधा चंचला तू
मनी ताबा सुटला🍁

तू स्वप्न परी घोर जीवा
मनी मोर नाचरा 🦃
देखे तुला तरुण होतो
जरी असे बोचरा
🍁
हजर जबाबी चाणाक्ष
वैभव ते बुध्दीचे
शब्दाशब्दांत मांडीशी तू
गीत प्रेम धुंदीचे😍

नजरा खिळवूनी राही
चाहूल ती लागता
हृदये चोरुन घेशी तू💕
सर्वांचे जाता जाता  💃

 🎅 सोमनाथ पुरी✍ 🎅


शेतकरी

#शेतकरी

बळी राजा
कुनब्यांचा
घास सुखी
पोशिंद्याचा

दैन्य दैवी
आले आज
आत्महत्या
जरी काज

कर्ज सदा
डोई त्याच्या
अन्न तोंडी
खव्वयाच्या

सिंचनाची
त्याची आस
कोण नेई
पूर्णत्वास?

धोतरही
मळकट
अंगी बंडी
कळकट

उध्दारणे
कष्ट त्याचे
कर्तव्य हे
ही सर्वांचे

#सोमनाथ _पुरी

स्मृती गंध

*स्मृती गंध*

स्वप्नी येणे
पूरे झाले
निःशब्द हे 
भाव झाले

वळूनी तू
बघ आता
प्राण माझा
जाता जाता

तारांगणे
निष्प्रभ हे
फुले झाले
निस्तेज हे

सांजवेळ
स्मृती येती
अंधकारी
मला नेती

गुंग मती
तुझ्याविना
चांद जसा
ता-या विना

परतूनी तू
येशील का?
श्वास माझा
होशील का?

*सोमनाथ पुरी*



बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

सुरेश भटांचे शेर

सुरेश भटांचे  शेर.सगळी अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे आहेत 


(अ)
अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली?...सुरेश भट.
*
(आ)
आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी..
हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली...सुरेश भट.
*
(इ)
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते....सुरेश भट.
*
(ई)
'ईश्वरी इच्छा'च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?...सुरेश भट
*
(उ)
उरले उरात काही आवाज चांदण्याचे..
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली....सुरेश भट.
*

(ए)
एक मी निःशब्द किंकाळीच होतो 
ऐकण्यासाठी सुना बाजार होता ….सुरेश भट.
*
(ऐ)
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले...सुरेश भट.
*
(ओ)
ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो...सुरेश भट.
*



(क)
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली....सुरेश भट.
*
(ख)
खरेच सांग मला.. काय ही तुझीच फुले?
तुझा सुगंध कसा ये न आढळून मला?....सुरेश भट.
*
(ग)
‘गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाव नाही.’...सुरेश भट.
*
(घ)
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते...सुरेश भट.
*
(च)
चाहूल ही तुझी की, ही हूल चांदण्याची?
जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला!.....सुरेश भट.
*
(छ)
छाकटे दुर्वास का निवृत्त झाले?
शापितांनी काय छाट्यांचे करावे?..... सुरेश भट.


(ज)
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!’....सुरेश भट.
*
(झ)
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!....सुरेश भट.
*
(ट) 
टाकली हातातली मी सर्व पाने
कोण,जाणे,हारलो की जिकलो मी...सुरेश भट. 


(ठ)
ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना...सुरेश भट.

(त)
तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात वाटमारे अजून काही....सुरेश भट.
*
(द)
दिसूनही दार तो तिथे थांबलाच नाही
खरेच दात्याहुनी भिकारी हुशार होता....सुरेश भट. 

*
(थ)
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्या  कसलीच खंत नाही....सुरेश भट.
*
(ध)
धन्य ही श्रद्धांजली जी वाहिली मारेक~यांनी,
संत हो आता बळीचा न्यायनिर्वाळा कशाला ?.....सुरेश भट.

(न) 
नको जगा विचारू हासण्याचे गुपित माझ्या,
कित्येक हुंदक्यांनी, कोंडला एकांत माझा....सुरेश भट.
*
(प) 
पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!....सुरेश भट.
*
(फ)
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते....सुरेश भट.
*
(ब)
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!...सुरेश भट.
*
(भ)
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एव्हढे मी भोगिले की मज हसावे लागले ...सुरेश भट.

*
(म)
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते !...सुरेश भट.
*
(य)
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते...सुरेश भट.
*
(र)
रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे...सुरेश भट.
*
(ल)
लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा....सुरेश भट.
*
(व)
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?...सुरेश भट.
*
(श)
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही....सुरेश भट.
*
(स)
सकाळी तू उन्हापाशी कसा केलास कांगावा,
तरीही खूण चंद्राची तुझ्या ओठांवरी होती....सुरेश भट 
*

हजार काजव्यांनी पाहिला एकांत माझा,
तुझ्याच आठवांनी उजळला एकांत माझा....सुरेश भट.
*

ज्ञानदेव लिहुनी गेले ओळ ओळ भाळी
निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी....सुरेश भट.

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

ग्रहमाला

ग्रहमाला

सूर्य एक
ग्रहमाली
तेज त्याचे
सर्वकाली

बुध ग्रह
तो कक्षेच्या
नजदीक
आदित्येच्या

शुक्राची ती
तेजस्वीता
पहाटेची
तपस्वीता

नीलवर्णी
वसुंधरा
सर्वग्रही
ती सुंदरा

मंगळाचा 
थाट न्यारा
ताम्र तेज
पृष्ठ प्यारा


 ग्रह गुरु
मोठा असे
चन्द्र त्याचे
बहु असे

शनिची ती
कडा छान
ज्योतिष्यात
तो महान

~सोमनाथ पुरी


चाराक्षरी नियम

🌹🙏🏻साहित्य उपक्रम🙏🏻🌹

उपक्रम क्र २ - चाराक्षरी लेखन 

दिनांक : २२-१२-२० ते २६-१२-२०(मंगळवार ते शनिवार)


वेळ : ८-१०

नमस्कार!!🙏🏻🙏🏻

मागच्या आठवड्यात आपण शिरोमणी काव्य शिकलो. सर्वांनी छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार.🙏🏻😊

आता आजपासून आपण बघुया... चाराक्षरी.....तर तयार राहा एक नवीन काव्यप्रकार शिकायला.🙏🏻😊👍🏻

*चाराक्षरी*
        *चाराक्षरी* हा काव्यप्रकार प्रणाली म्हात्रे यांनी निर्मिला आहे. म्हणून हा काव्यप्रकार *' प्रणु* *चाराक्षरी*' या नावानेही प्रचलित आहे. हा काव्यप्रकार अगदी साधा, सोपा, सहज आहे.

*नियम*
१. प्रत्येक ओळीत फक्त चारच वर्ण अक्षर असायला हवेत.
२. कमीतकमी ६ आणि जास्तीत जास्त १० कडवे असावीत.
३. विराम चिन्हांचा आवश्यक त्या तेथे वापर असावा.
४. कवितेला आशय, लय, ताल व व्याकरण योग्य असावे.
५. दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक असावे.
६. यमक हे अंत्यपुर्वी स्वर यमक असावे.
७. ओढूनताणून यमक जुळवू नये.

*स्वर  यमक म्हणजे काय?*
*यमक*
ज्या शब्दांची सुरुवात वेगळ्या अक्षराने होते पण शेवट सारख्या अक्षरांनी होते त्याला म्हणतात यमक.
उदा. असते - नसते

*स्वरयमक*
  यमक जुळणाऱ्या शब्दांत उच्चार करताना सारखा स्वर येणे म्हणजेच *स्वरयमक* होय. 
उदा. फुलला - खुलला
वरील दोन्ही शब्द यमक जुळणारे आहेत. फुलला हा उच्चार करताना ला पूर्वी ल येतो. यामध्ये अ हा स्वर आहे. त्याचप्रमाणे खुलला यामध्ये पण उच्चार करताना अ हाच स्वर येतो. म्हणून खुलला आणि फुलला हे *स्वरयमक* आहेत.

कधीकधी आपण कविता लिहिताना यमक जुळवतो,पण प्रत्येक यमक हा *स्वरयमक* नसतो.
उदा. यमुनेतिरी - चातकापरी 
हे शब्द यमक आहेत पण *स्वरयमक* नाहीत.

मी इथे तुम्हाला  चाराक्षरी चे एक उदाहरण देते. त्यावरून प्रयत्न करून पाहा.

रम्य प्रातः
उगवली,
शुभ्र जाई
उमलली||१||

तिचा मंद 
हा सुवास,
करी धुंद
या मनास||२||

तिचा वर्ण 
शुभ्र सारा,
नभिचाच
शुक्र तारा||३||

तिचे देठ
हे कोवळे,
दिसतसे
गं वेगळे||४||

ती हसते
एकट्यात,
नि गर्दीत 
गजऱ्यात||५||

उमलते
कळीतून,
प्रगतीच्या
पेनातून||६||

ती फूलते 
झाडावर,
प्रगतीच्या 
पानावर||७||
-@प्रगती देशमुख(चंदुले).
    (शब्दसंगिनी)

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

विवीध काव्य नियम

Shalini Wagh:
*काव्यबत्तीशी हा काव्यप्रकार मोहरली समुह प्रमुख सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार आहे.*

*काव्यबत्तीशी नियमावली*

काव्य बत्तीशी प्रकारातील काव्य करीत असताना

१}

*पहिल्या ओळीत       नऊ(९)* 
*दुसऱ्या ओळीत       सात(७)*
*तिसऱ्या ओळीत      नऊ(९)*  
*चौथ्या ओळीत         सात(७)*
                *एकूण *बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी....*

किंवा याच्या अगदी उलट म्हणजेच

*पहिल्या ओळीत       सात(७)* 
*दुसऱ्या ओळीत        नऊ(९)* 
*तिसऱ्या ओळीत       सात(७)*  
*चौथ्या ओळीत         नऊ(९)* 
                 *एकूण बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी...*

अशा पद्धतीने वर्णाक्षरे यायला हवी.

*एकूण काय तर नऊ सात किंवा सात नऊ अशी चारोळीची मांडणी असायला हवी.....*

त्यामुळे काव्यातील पुढची गंमत तुमच्या लक्षात येईल........

२}
यमकांची जुळणी दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतच व्हायला हवी...
यमक अत्यंत सुंदर आणि सटीक असावे......


वरील नियमाप्रमाणे चारोळी लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे.. ती, आशयपूर्ण भाषेचा उत्तम नमुना आणि परिपूर्ण काव्यानुभव देणारी असावी.

काव्यांजली काव्य प्रकार 
*♦️नियम*♦️

*१)*.  *चार ओळीचे एक कडवे असावे*

*२)*.  *पहिल्या ओळीत दोन शब्द*

*३)*.   *दुसऱ्या ओळीत तीन शब्द*

*४)*.   *तिसऱ्या ओळीत दोन शब्द*

*५)*.   *चौथ्या ओळीत एक शब्द*

*६)*.   *दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत शेवटचा शब्द यमक यायला हवा*

*७)*.  *रचनेत आशय, लय, ताल, व्याकरण योग्य असावे*

*८))*. *रचना ३,४, ५ कडव्यांची असावी*

*उदाहरणार्थ*


सडा प्राजक्ताचा
दारी खूप पडलेला 
सुगंध सांडलेला
मनातही...

दरवळ त्याचा
पसरला दाही दिशा
तरुण निशा
भारावली...

प्रभातवेळी फुलतो
प्राजक्त खुलून दिसतो
अंतरात भिनतो
दरवळ...

कोवळी पालवी
फुलांची नाजूक पाकळी
प्राजक्ताची कळी
फुलली...

सडा प्राजक्ताचा
मनात जपून ठेवला
अंगणी पसरलेला
सुगंध...

प्राजक्त मनातला
शब्दातून आज दरवळला
लेखणीतून उतरला
कागदावर...

*धनंजय देशमुख नांदेड*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*उपक्रम   उपक्रम    उपक्रम*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम सुनीत काव्य*

*विषय:- नशीब*

*दिनांक:- ७/०३/२०२०*

*वेळ:- १०.०० ते ११ रात्रीपर्यंत*

🔴    *सुनीत काव्यप्रकार* 

*Sonnet* हा मूळ रशियन काव्यप्रकार. तो शेक्सपियरने इंग्रजी भाषेत आणला. हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे, त्याचे *सुनीत* असे नामकरण करण्याचे आणि तो मराठी जनमानसात रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील कविंनी केले. माधव ज्युलियन, कवी बी. केशवशूत ह्यांची सुनीत काव्ये प्रसिद्ध आहेत.
त्याचे नियम पुढीलप्रमाणे.

🔴     *सुनीत काव्य नियम*

*१. हा काव्यप्रकार १४ ओळींचा आहे*
*२. चार चार ओळींची ३ कडवी आणि
अखेरीस दोन ओळी*
*३. पहिल्या दोन चरणांत पहिल्या आणि 
चौथ्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या
ओळींच्या अंती यमक*
*४. तिसर्‍या चरणात मात्र यमक पहिल्या
आणि तिसर्‍या ओळींच्या शेवटी आणिक दुसर्‍या आणि
चौथ्या ओळींच्या अंती यमक*
*५. अखेरच्या दोन ओळींमध्ये यमक
जुळले पाहिजे*
*६. पहिल्या तीन कडव्यात प्रश्न वा भावनातिरेक अपेक्षित* अखेरच्या दोन ओळी काव्याला कलाटणी देणार्‍या.
ह्याशिवाय विं. दा करंदीकर ह्यांनी सुनीत रचना अधिक प्रभावी व्हावी ह्याकरता *मुक्त सुनीत* रूढ केले. ह्यात ओळींची संख्या क्वचित तेरा अथवा पंधरा सुद्धा असते. ह्याचबरोबर यमक नियम सुद्धा शिथिल केलेले आहेत.

 🔴   *उदाहरणार्थ*

*सुनीत काव्य*

वाटते कधी नव्याने आयुष्य जगावे
पण मला का हा एकांत छळतो?
आठवणीने अंतःकरणात वणावा पेटतो
होरपळलेल्या ह्रदयात का वाटते मी मरावे?

जीवनाच्या या सुखदुःखाच्या मार्गात
आयुष्याच्या वाटेवरती का गाऊ विरहाचे गीत?
सख्या पुरल्या तुझ्या आठवणी मी जमीनीत
वाटते का अजूनही रमावे तुझ्याच स्पर्शात?

कळला नाही तुला कधीच मैत्रीचा अर्थ
का समजल्या नाही तुला माझ्या भावना?
आयुष्यभर खाल्लेल्या ठेचा गेल्या व्यर्थ
असह्य झाल्या प्रेमभंगाच्या यातना

एकदा पाहून बघ अंतर्मनाच्या आरशात
तुझेच प्रतिबिंब दिसेल माझ्या ह्रदयात

....सौ. अनिता आबनावे ©®

======================

*समूह संस्थापक*
*सौ. अनिता आबनावे*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*हायकू बद्दल थोडीशी माहिती:*

हायकू हा जपानी कवितेचा एक पारंपरिक प्रकार आहे ज्यामधे तीन लहान ओळींंतील कविता असते. हायकू कवितांच्या उत्पत्तीचा शोध नवव्या शतकात सापडतो.

हायकू हा फक्त कविताप्रकार नसून तो भौतिक जगाकडे पाहण्याचा आणि आपल्य अस्तित्वाकडे सखोलपणे पाहण्याचा एक मार्ग आहे. तो वाचकाच्या मनावर एक वेगळा आणि ठळक प्रभाव पाडतो.

शिरीष पै यांनी सन १९७५ मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

शिरीष पै म्हणजे आचार्य अत्रे यांच्या कन्या. शिरीषताई म्हणायचे त्यांना सारे. 

हायकू मूळ जपानी काव्यप्रकार आहे. 
५,७,५ अशी *अक्षर संख्या असते यात. *(शब्द नव्हे)*
एकूण तीन ओळींची अर्थपूर्ण अल्पाक्षरी कविता म्हणजे थोडक्यात हायकू. 
कोणत्याही दोन ओळीत यमक असावे हा साधारण नियम आहे त्याचा. निसर्ग व मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण टिपणे , ही वैशिष्ट्ये या प्रकारात येतात. 

काव्यप्रकार छोटा असला तरी अर्थ मोठा असतो. म्हणूनच दिसायला सोपा पण करायला अवघड असा हा प्रकार. 

*काही उदाहरणं:*

१.
झटकू कशी? (५)
कोळीष्टके मनात (७)
गुंतले त्यात (५)

२.
शिस्त लावली (५)
मी दुःखालाही नेक (७)
येती एकेक (५)

३.
टपटपत (५)
थेंबही पानांतून (७)
ओल आतून (५)

४.
भिंतीला कान (५)
कानात गोळा प्राण (७)
वाद अबोल (५)

५.
एक मनात (५)
दुसरेच जनात (७)
हेही जिणेच (५)

*(माहिती संग्रहित करून ठेवा.)*

*द्रोणकाव्य नियमावली*

*पहिल्या ओळीत ७ वर्ण*
*दुसऱ्या ओळीत ६ वर्ण*
*तिसऱ्या ओळीत ५ वर्ण*
*चवथ्या ओळीत ४ वर्ण*
*पाचव्या ओळीत ३ वर्ण*
*सहाव्या ओळीत २ वर्ण*
*सातव्या ओळीत १ वर्ण*

*अशी रचनेची मांडणी असते.*

*महत्त्वाचा नियम*

 *पहिल्या,तिसऱ्या, आणि पाचव्या ओळीत*
किंवा 
*दुसऱ्या, चवथ्या आणि सहाव्या ओळीत यमक जुळलेले असावे.*

 *उदा.*
*============================*
*शब्दांकन. धनंजय देशमुख*

*मना होई आनंद*
*परसबागेत*
*तो करवंद* 
*पसरला*
*सुगंध*
*नभी*
*या*

*सुगंधी नी मधाळ*
*थोडेसे आंबट* 
*अन् रसाळ*
*रंगवर्णी*
*ते लाल*
*दिसे* 
*ते*

*सुगंध हवाहवा* 
*वाटसरूस तो*
*वाटतो नवा* 
*कोणासही* 
*तो द्यावा*
*गोड*
*तो*
*============================*

गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

निसर्ग

निसर्ग 
वसंत फुलतो 
हळूवार भाव दाटतो 
हृदयात प्रितीचा गाव दिसतो

निसर्ग 
पहिला पाऊस
आठवण मनी तुझी
विरहात डोळे ओली माझी

निसर्ग
शेतांमधला हिरवा
सुगीचा रानी गारवा
विहरतो गगन गाभारी पारवा

निसर्ग 
फुलाने बहरतो
वेलीने तो सजतो
रानं माळी शृंगाराने दिसतो

निसर्ग 
काळ्या ढगात
भासे पाण्याच्या पखाली
घरट्याकडे पक्षी जीव वरखाली

शाळा

शाळा
संस्काराचे मंदिर
केंद्र ते आत्मविकासाचे
मिळती धडे तेथे स्वयंशिस्तीचे

शाळा
मित्रांचे आगरं
ज्ञानाचा तो जागरं
गुरु ठायी अमृताचा सागरं

शाळा
समाजाचे श्रध्दास्थानं
मिळते सर्वांना मार्गदर्शनं
स्वयं अध्ययनात स्वावलंबी शिकवणं

शाळा
आनंददायी शिक्षणं
वाट भविष्याची सुकरं
देते राष्ट्राला नागरिक जबाबदारं

शाळा
आठवणींचा मेळा
सोडून जाता सर्वांचा
दाटून येतो विरहाचा गळा


सोमनाथ पुरी

काव्य शिरोमणी


काव्य शिरोमणी
******************************
      *काव्य शिरोमणी* हा पारंपरिक काव्य रचनेचा प्रकार नाही. त्यामूळे अधिक माहिती कुठेही उपलब्ध नाही. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर लिहीला जाणारा काव्य प्रकार आहे. ह्यात कडव्यांच्या संख्येचे बंधन नसले तरी कविता सुरस व्हावी व मूल्यमापणासाठी किमान पाच कडव्यांची रचना असावी. उर्वरीत नियम खालील प्रमाणे.

*नियम*
*१) चार ओळींचे कडवे असावे.*
*२) पहिल्या ओळीत एकच शब्द असावा व तोच शब्द प्रत्येक कडव्यात प्रथम शब्द असावा.*
*३) दुसऱ्या ओळीत दोन, तिसऱ्या ओळीत तीन व चौथ्या ओळीत चार शब्द असावेत.*
*४) दुसऱ्या व चौथ्या किंवा तिसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेले असावे.*
*५) पहिला शब्द हा संबोध असावा/ संकल्पनात्मक त्या शब्दाबद्दलचा आशय प्रत्येक उलगडत जावा.*
*६) अक्षर संख्येचे कोणतेही बंधन नाही.*

*********************************

भावना
वात्सल्य सिंधू 
मातेची असे खास
ममतेची बालकास ती आस

भावना
प्रेमात प्रियसीची
जीवाला असतो ध्यास
विरहात जणू गळ्याला फास

भावना
क्रोधाची करते
विनाश हळव्या मनाचा
मार्ग असतो तो अधोगतीचा

भावना
लोभाची करते
जेंव्हा संपत्तीचा हव्यास
सुख समाधान जाते लयास

भावना
अहंकारी मनाची
अंधत्व ठरते विद्वानांची
होळी करते सर्व प्रस्थापितांची

*~सोमनाथ पुरी*


 

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

स्वचरित्र काव्य श्रुती पंडित

सोमनाथ जी 

सुविचार न चुकता येई 
विचारांची परिसीमा असते 
हिंदी मराठी चारोळ्याची 
रोजनिशी ज्योत पेटते 

विचाराचे भांडार तुमचे 
परिपक्वता आचरणात असते 
कौतुकाची थाप देणे तुमचे
मोजक्या शब्दांत मांडणे असते

कौशल्य तुमचे मानतो आम्ही
शब्दांच्या सामर्थ्यावर असते
शब्दांना अर्थासकट समजावणे 
तुम्हालाच ते जमत असते 

स्वभावाने थोडे कडक तरीही
मृदुभाषी  तुमचे धोरण 
सत्य आणि खरेपणा आवडी
निःसंकोचता न मनी धरी 

       मैत्रीण श्रुती

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

शृंगार रस

💕💕💕💕💕💕
*शृंगार रस (अष्टाक्षरी )*
💗💗💗💗💗💗
*तुझे गोड हास्य गाली* 🍁
*शोभे त्यावर ती खळी*
*तिळ हनुवटीवरी*
*अदा ओठात बावळी*
🍁
*किती करु जाळ मनी*
*लाखात एक देखणी*
*तू सौंदर्याची खाण ती*
*पाहता बार तो जनी*
                          🍁
*कमनीय कटी धनु*
*पाठीवर लांब वेणी*
*लवता पापणी डोळी*
*हाय होते माझ्या मनी*
🍁
*दाटलेली भरजारी*
*चोळी यौवनात भारी*
*पाहता वृध्दही होती*
*बावळे ते घरोघरी*
                         🍁
*शृंगार तुझा तो भारी*
*नाक मोडीशी तू जरी*
*असे मल्ल आखाड्यात*
*कुस्तीत मी लय भारी*
💓💓💓💓💓💓
*✍सोमनाथ पुरी* 🍁
💕💕💕💕💕💕

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

चांदणे (कविता)

आज चांदणे रुसले
चंद्र नभी मावळला
जणू तरंग सागरात
अर्क भाव उतरला

तिथे बाकावर दोघे
रात्रांत जागलो संगे
रात्री पुनवेच्या होती
माझ्या आठवण संगे

छाया पाहतो ढगात
तुझी प्रतिमा हसरी
लुप्त अचानक होता
मनी आवस दुःखरी

मंद पहाटेचा वारा
स्पर्शतो सर्वांग सारे
स्पर्श तुझ्याविन करी
संथ लाटांचे किनारे

तेज स्मृतीत लख्खते
रंग आकाशाचे मनी
होता चंदेरी किनारे
रुप तुझेच स्मृतींनी

~सोमनाथ पुरी

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

22 सप्टेंबर दिनविशेष

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
☀☀☀💐 *सुप्रभात !* 💐☀☀☀
#########################
*२२ सप्टेंबर – दिनविशेष*

*अधिक आश्विन शके १९४२*
*अधिक आश्विन शुक्ल ६*
*नक्षत्र : अनुराधा*
*सूर्योदय : ०६ : २९* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३४* 🌇
##########################

*२२ सप्टेंबर – घटना*

२२ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
##########################
*२२ सप्टेंबर – जन्म*

२२ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७) १८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म. १८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म.
##########################
*२२ सप्टेंबर – मृत्यू*

२२ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन. १५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९) १८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.
१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो
############################
*सुविचार : चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.*
##########################
*📝संकलन : सोमनाथ पुरी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कोरी पाटी (कविता )

कोरी पाटी

मातीत पेरुन रक्त
सर्वांना करी सशक्त
असा तो बाप सर्वांचा
कुनबी मात्र अशक्त

त्याले नाही हो पेंन्शन
नाही कसले वेतन
खपतो रानात स्वतः
मातीस करी चेतन 

माहित नसते त्याला
धर्माचे राजकारण
रिकाम टवळ्यांचे ते
कलगी तुरा भाषण

धडपड करतो तो
रानामधी पिकासाठी
पिक गेले तरी पुन्हा
पेरी सदा जगासाठी

प्रश्न अनेक त्याचेही
सतत असता पाठी
मसनात गेला तरी
कुटुंबाची कोरी पाटी

सोमनाथ पुरी



रविवार, २० सप्टेंबर, २०२०

१७ सप्टेंबर दिनविशेष

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
💐💐 *सुप्रभात !* 💐💐
दि. १७/०९/२०२०, गुरुवार
आश्विन शके १९४२, भाद्रपद कृ. १५
सूर्योदय : ०६ : २८
सूर्यास्त : १८ : ३९

*****************************
*मराठवाडा मुक्तिदिन*
*****************************
१७ सप्टेंबर – घटना

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली. १९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. १९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१७ सप्टेंबर – जन्म

१७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)
१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१७ सप्टेंबर – मृत्यू

१७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)
१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०) १९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन.
********************************
*सुविचार : प्रत्येक बाबतीत दुस-याचे अनुकरण करु नका स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा.*
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

१८ सप्टेंबर दिनविशेष

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
*सुप्रभात*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दिनविशेष*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*अधिक मासारंभ*
दि. १८ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
आश्विन शके १९४२, अधिक आश्विन शु. १
सूर्योदय : 🌄 ०६ : २८
सूर्यास्त : 🌇 १८ : ३७
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८ सप्टेंबर – घटना

१८ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१५०२: शेवटच्या सफरीत ख्रिस्तोफर कोलंबस होंडुरास येथे पोचले.
१८१०: चिली देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. १८८२: पॅसिफिक स्टॉक एक्सचेंजची सुरूवात झाली. १८८५: कॅनडातील माँट्रिअल शहरात कांजिण्यांची लस घेणे सक्तीचे केली.

१८ सप्टेंबर – जन्म

१८ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
५३: रोमन सम्राट ट्राजान यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११७)
१७०९: ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, व विचारवंत सॅम्युअल जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १७८४)
१९००: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९८५)
१९०५: हॉलीवूड अभिनेत्री ग्रेटा यांचा जन्म.

१८ सप्टेंबर – मृत्यू

१८ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७८३: स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑयलर यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७०७)
१९९२: भारताचे सहावे उपराष्ट्रपती मुहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९०५ – लखनौ, उत्तर प्रदेश)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘


२० सप्टेंबर दिनविशेष

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
💐💐💐 *सुप्रभात !* 💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – दिनविशेष*

*आश्विन शके १९४२,*
*अधिक आश्विन शु. ४, रविवार*
*विनायक चतुर्थी*
*सूर्योदय : ०६ : २८*
*सूर्यास्त : १८ : ३६*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*२० सप्टेंबर – घटना*

२० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

*२० सप्टेंबर – जन्म*

२० सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०) १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. 

*२० सप्टेंबर – मृत्यू*

२० सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१) १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.
१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : नकारात्मक विचार शत्रूपेक्षा जास्त इजा पोहचवतात.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

परतीच्या वाटा....(कविता)

२१ सप्टेंबर दिनविशेष

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
☀☀☀ *सुप्रभात !* ☀☀☀
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*२१ सप्टेंबर – दिनविशेष*
*शके १९४२*
*अधिक आश्विन शु. ५,सोमवार*
*सूर्योदय : ०६ : २८* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३४* 🌇

|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*जागतिक अल्झेमर्स दिन*

*आंतरराष्ट्रीय शांतता दिन*
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*२१ सप्टेंबर – घटना*

२१ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१७९२: अठराव्या लुईचं साम्राज्य बरखास्त केलं आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
१९३४: प्रभातच्या दामलेंनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्रमंदिर या नावाने सुरू केले.
१९४२: दुसरे महायुद्ध

*२१ सप्टेंबर – जन्म*

२१ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८६६: विज्ञान कथा इंग्लिश लेखक एच. जी. वेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९४६)
१८८२: भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९५३) १९०२: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म.

*२१ सप्टेंबर – मृत्यू*

२१ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७४३: जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १६८८)
१९८२: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. (जन्म: २१ जून १९२३)
१९९२: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन. (जन्म: १० मे १९१४)
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*सुविचार : विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत . ते प्रत्येक गोष्ट वेगळे पणाने करतात.*
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
*📝संकलन : सोमनाथ पुरी*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

दिनविशेष १९ सप्टेंबर

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
💐💐💐 *सुप्रभात !* 💐💐💐
*१९ सप्टेंबर – दिनविशेष*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*आश्विन शके १९४२*
*अधिक आश्विन शु. २/३, शनिवार*
*मुस्लिम सफर मासारंभ*
*सूर्योदय : ०६ : २८* 🌄
*सूर्यास्त : १८ : ३६* 🌇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१९ सप्टेंबर – घटना*

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.
१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*१९ सप्टेंबर – जन्म*

१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)
१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८) १९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*१९ सप्टेंबर – मृत्यू*

१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन. १७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन. १८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*सुविचार : वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवा, जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल.*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*संकलन : सोमनाथ पुरी*
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

अलवार चाहूल तुझी

🌹🌿🍁🌴🍁🌲🍁🌾🍁🌿🌹
*ललित लेख*
*अलवार चाहुल तुझी*
      आजची सकाळ जरा वेगळी भासली. पहाटे साडेपाचचा सुमार, बेसूमार धुके दाटलेले, वातावरण जणू गुलाबाचा गंध घेऊन धुंद होते. रानातील हिरवीगार पिकं आनंदात दवांनी नटली होती. झाडाच्या पानापानांतून दव निसटत जमिनीवर पडे व रामप्रहरी सडा टाकल्यागत भूईवर दवांच्या थेंबाचे अंथरुणच जनू टाकले कोणी असा भास होत होता.गवताची पाती भिजून चिंब झालेली. दोन दिवसाच्या गरमी नंतर आजची सकाळ गुलाबी वातावरणाने प्रसन्न भासत होती.
         सकाळचा फेरफटका मारण्यासाठी अशा रम्य वातावरणात आम्हीं निघालो. वातावरणच एवढे अल्हाददायक होते की, त्यात तुझी आठवण येणार नाही तर नवलच. तुझ्या चेह-यावरचे स्मित मला आठवले. नेहमी आनंदी दिसनारी तू , कुठे तरी आत खोलवर एका अनाकलनिय दुःखाचे सावट असेल असे कधी तुला पाहून वाटलेच नव्हते, पण सुखाला दुःखाचा शाप असतो. सुखे कधीच भरभरुन एकटी येत नसतात, तसेच तुझेही झालेले.
       चालता चालता हाच विचार मनात घोळत होता. निसर्ग हिरवागार आनंदी दिसतो. पण त्या मागे निसर्गाचेही दुःखाचे संचित असतेच. सर्व उन्हाळा अंगावर झेलतो. तापून तापून जमिनीत उष्णता खोलवर मूरते. मग मृगाचा पाऊस , तो मृदगंध सर्वांनाच हवाहवासा वाटतो. हिरवळीने नटलेली धरा आणि श्रावणातील बरसना-या धारा.. .. असुसलेला वारा...हे सर्व वातावरण आपल्याला एका अलौकिक दुनियेत घेऊन जाते. ज्यांच्या जवळ त्यांच्या प्रिय व्यक्ती असते, ते निसर्गाचा मन मुराद आनंद घेतात व ज्यांच्या पासून कोणी प्रिय व्यक्ती दुरावलेली असते, ते भूतकाळातील आठवणीत रमतात.
       अशीच मला तुझी आठवण आली आणि पहिला प्रेमाचा ऋतू आठवला. जीवनभर पुरुन उरेल असे ह्या जगात काहीच नसते, पण माणूस सुखाच्या मागे धावत असतो. जसे हरीन नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाने उर फुटे पर्यंत धावते.....पण त्याच्या जवळ असलेल्या कस्तुरीची त्याला जानीव नसते. 
               माणसाचेही तसेच आहे ना.... सुखाच्या मागे आयुष्यभर धाव...धाव धावत असतो, पण सुखी कधीच होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत चेहऱ्यावर दुःख, आणि काही तरी मिळवलं नाही ह्याची खंत. मृत्यूनंतरही कपाळावरील आट्या त्याच्या अपूर्णतेचे निदर्शन करतात....पण ते पूर्ण सत्य नाही. सुख हे कस्तुरी प्रमाणे आपल्याच मनात असते. फक्त गरज असते दृष्टिकोन बदलण्याची..........!!

 ~ *सोमनाथ पुरी*
🌹🌿🍁🌿🌺🌴🌺🌲🌺🌿🌹

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

गजरा

*****************
*गजरा*
*****************
*आहे तुझा मनी ताजा*
*गजरा आठवणींचा*
*फुल एकेक माळीले*
*दरवळ रोज त्याचा*

*सुख दुःखाचे क्षणही*
*प्रेम धाग्यात गुंफिले*
*माझ्या कवितेत आज*
*तुझे चित्रही रंगले*

*चाफा प्राजक्ताचे येणे*
*झाले सहज अंगणी*
*बाग फुलांचीही आता*
*बहरली ती शब्दांनी*

*दुराव्याचे ही अंतर*
*मोती अक्षरात झाले*
*नसशिल ह्या क्षणाला*
*तुझे बोलणे स्मरले*

*बाग रोज फुलवितो*
*आठवणींच्या फुलांनी*
*सांजवेळी ते पहातो*
*चित्र दुरुन डोळ्यांनी*

******************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************






गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

आई

आई होती साधी भोळी
जशी कोंदनाची पोळी

मनी सदा देव भक्ती
आम्हां भावंडाची शक्ती

घरकाम सर्व राडा
हाके संसाराचा गाडा

जीव लावी लेकराला
जशी गाय वासराला

एक क्षण असा आला
श्वास शेवटाचा गेला

- सोमनाथ पुरी

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

कोरा कागद

कृष्ण सखा

बाप्पा काय म्हणतील

छळनारी नजर

प्रेम

ओल


संताचे बोल

*स्पर्धेसाठी*

*संताचे बोल*

अंध श्रध्दा नको
संतांनी बोलीले
ढोंगीच जाहले
वर्तमानी

गावांची स्वच्छता
गाडगे बाबांची
हौस ती फोटोंची
आज झाली

सावत्याचे बोलं
ईश्वरं कर्मातं
घ्यावे हे ध्यानातं
जनलोकी

जाती भेद नको
नको तो विटाळं
सर्वांहाती टाळं
भक्तीमार्गी

नाते निसर्गाशी
जपावे सर्वांनी
बोलीले तुक्यांनी
अभंगातं

*सोमनाथ रामराव पुरी*
कुरुंदा, ता. वसमत जि. हिंगोली
पोस्ट पिन - 431512
मो.क्र. 9665989838
purisomnath555@gmail.com

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

त्रिवेणी

*त्रिवेणी* हा काव्यप्रकार भारतात सर्वप्रथम कवी गुलजार यांनी हिन्दी भाषेत विकसित केला. 
मराठीत याचे प्रचलन कोणी केले याबद्दल काही निश्चित माहीती उपलब्ध नाही. 
इथे त्रिवेणाच्या नियमांत थोडी सुधारणा करून या काव्यप्रकाराला अधिक आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. 

*त्रिवेणी रचनेचे नियमः-*

१) त्रिवेणी नावाप्रमाणेच तीन ओळींची साधीसुदी रचना असते. याला विषयाचे बंधन नसते.

२) पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडला जातो आणि तिसरी ओळ कधी पहिल्या दोन     ओळींच्या अर्थामध्ये भर घालते तर कधी त्यांना वेगळा दृष्टीकोन देते.

३) ही रचना तीन ओळीत मर्यादीत होत असली तरी यात हायकू प्रमाणे प्रत्येक ओळीत अक्षरांची ठराविक मर्यादा नसते. तर पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत अक्षरांऐवजी शब्दांची संख्या सारखी असते आणि दुसऱ्या ओळीत रचना लयबद्ध आणि अर्थ पूर्ण होईल इतकेच शब्द असतात.

या रचनेला त्रिवेणी नाव दिले गेले कारण इलाहाबादच्या त्रिवेणी संगमाप्रमाणेच इथेही तीन ओळींचा संगम होतो. तिथे संगमावर गंगा आणि जमुना आपल्याला स्पष्ट दिसतात पण तक्षशिले कडून वाहत येणारी सरस्वती संगमावर आल्यावर दोघांच्या प्रवाहात बेमालूम मिसळते, तिथे तिचे वेगळे अस्तित्व दिसत नाही. सरस्वती प्रमाणेच त्रिवेणीची तिसरी ओळही या रचनेला पूर्णत्व देते. तिसरी ओळ स्वतंत्र असली तरी ती पहिल्या दोन ओळीत बेमालूम मिसळते. अर्थात पहिल्या दोन ओळीतील गुढ तिसऱ्या ओळीत उमगते. 


*उदा:*

१.
आसमंत गिळंकृत करणारी शांतता पुन्हा नव्यानं फसली;
गर्द तिमीरातूनी एक शलाका अविरत तेवती दिसली. 

वाकलेल्या सुईनं झाकलेलं नातं सांधत होतं कुणीतरी. 

२.
पडत्याला सावरून घेण्याचा झाला उगा कांगावा, 
सुधारणा दाखवण्याचा क्रम स्वतःच कितीदा सांगावा. 

असो,
खोडरबराला बोलता कुठं येतं अजून!

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

अर्चना


|| अर्चना ||

वक्रतुंड गौरीसुत
श्रीगणेश लंबोदर
रुप तुझे रे मोहक
शोभे ते उंदीरावर

ढोल ताशांचा गजरं
तुझे येणे उल्हासितं
नेत्र ही पाहून पावकं
बाल थोरं आनंदीतं

मोदकांचा ही प्रसादं
तुला भावे सदोदितं
मूर्ती ही अति सुंदरं
जागोजागी विराजितं

महामारी संकटातं
तुच तारणहार रे
करी भक्त अर्चना ही
दाव तू अवतार रे

गजमुख गजाननं
भावे करीतो आरती 
दिसो अशीच नेहमी
तुझी ही प्रसन्न मूर्ती 

- सोमनाथ पुरी

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

वृत्त

वृत्त

गद्यात एकामागोमाग एक चरण म्हणजेच ओळी येतात.

पद्यात ओवी किंवा चरण असते.

पद्य रचनेत लय असते या लयबद्ध शब्द रचनेला वाक्य म्हणतात पद्याच्या वाक्यात ही जी विशिष्ट शब्दबद्ध रचना असते तिलाच वृत्त किंवा छंद म्हणतात.

वृत्त आणि चंदा चे काही नियम

१) वृत्तात अक्षरसंख्या ठरलेली असते.
२) चरणातील रस्व व दीर्घ हा अक्षर क्रम ठरलेला असतो.
३) रस्व अक्षरांना लघु म्हणतात.
४) रस व अक्षर  u अशा   चिन्हांनी दर्शवितात.
५) दीर्घ अक्षरांना गुरू अक्षर म्हणतात.
६) गुरु अक्षर अशा  - चिन्हांनी दाखवतात.
७) गण म्हणजे गट चरणातील तीन-तीन अक्षरांचा मिळून गण तयार होतो.

यती----
पद्धत चरण वाचताना वाचकाला जिथे थांबावे लागते  ते विश्रांती स्थान म्हणजे यती.

कवितेचे चरण वाचताना वाचक जिथे मध्ये थांबतो त्याला मध्यस्ती असे म्हणतात.

जेव्हा वाचक कवितेच्या आचरणाच्या शेवटी थांबतो त्याला अंत्यस्ती असे म्हणतात.

यती भंग
कवितेचे चरण वाचताना वाचक जेव्हा एखादा शब्द तोडून वाचतो त्याला यती भंग असे म्हणतात.

उदाहरण
प्रिय अमुचा एक महा-राष्ट्र
 देश हा
हे काव्य चरण वाचत असताना गायक किंवा वाचत महाराष्ट्र म्हणतांना  मधेच थांबतो यालाच येती गंगा म्हणतात.

-हस्व स्वर ( लघु )
अ, इ, उ,ऋ लृ 

दिर्घ स्वर ( गुरू)  
आ ई ऊ ए ऐ ओ औ 

व्यंजन-
-हस्व ( लघु )  
क कि कु 
दिर्घ ( गुरू)  
का की के कै को कौ कं क:

-हस्व ( लघु )   अक्षर दिर्घ केंव्हा होते.

जर लघु अक्षराच्या पुढे जोडाक्षर आले. व त्या जोडाक्षराचा आघात आधिच्या अक्षरावर येत असेल तर अश्यावेळी ते लघु अक्षर गुरू होते.
उदा -
मस्तक
हा शब्द  पाहिला तर 
म स्त क 
u  -   u  
असा लघु गुरूचा क्रम आपण लिहू.
पण वाचतांना स्त या अजोडाक्षराचा आघात म वर येतो. व्याकरण नियमानुसार अश्या ठीकाणी त्या लघु अक्षराला गुरू मानवावे. म्हणजेच इथे म लघु असला तरी तो गुरू समजावा लागतो.

अनुस्वार
ज्या स्वरावर अनुस्वार आला असेल तो स्वर किंवा व्यंजन दिर्घ  समजावे.
उदा. नंतर 

विसर्ग - 

जर काव्यचरणात विसर्ग युक्त स्वर आला तर ज्या स्वर किंवा व्यंजनानंतर  विसर्ग आला त्याला दिर्घ समजावे.

उदा.- 
दु: ख येथे दु -हस्व असला तरी त्यानंतर विसर्ग  आला असल्यां मुळे दु वर आघात येतो. म्हणून दु ला गुरू मानावे.

जर काव्य पंक्तिच्या शेवटी लघु अक्षर येत असेल  तर ते दिर्घ उच्चारले जातील तर त्याला गुरू मानावे.


ही दोन्ही अक्षरे इंग्रजी भाषेत उपयोगाची आहेत मराठी भाषेत सरळ उपयोग होत नाही. आणि यांना नविन स्ववर म्हणून मान्यता  दिली आहे. याचा उपयोग अजून तरी मराठीत फक्त इंग्रजी शब्दांच्या उच्चारणासाठीच केला जातो. व मराठी काव्यरचनेत आपण इंग्रजी.स्वरांचा वापर करत नाही. पण अ + य = अॅ जर म्हटल तरी ते गुरू येइल. व आॅ सरळ गुरूच येइल.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

अभंग

अभंग 

ताम्र क्षितीजांची,एक सांज भोळी
शाल पांघरली,आसमंती 

कृष्णास देखोनी,तुळस लाजली
पणती पेटली,वृंदावनी

चांदणे फुलले,आठवता सखा
हृदयाचा ठोका,चुकवूनी

चंद्र गोरा मोरा,रुप सोज्वळ ते
साजन मुखी ते,तेजाळले

सडा गुलाबांचा,अंथरुन ल्याले
दिप मंदावले,रात्रीला ते

- सोमनाथ पुरी

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

पत्रलेखन

पत्रलेखन ही एक कला आहे ज्यात आपण आपल्या मनाची भावना शब्दांद्वारे व्यक्त करतो. कधीकधी असे होते जेव्हा आपण व्यक्तीस आपल्या मनात उद्भवलेल्या विचारांचे आणि भावना व्यक्त करू शकत नाही, तर आम्ही त्या भावना आणि विचारांना पत्राने सहजपणे व्यक्त करू शकतो.शब्दांद्वारे शब्दांद्वारे व्यक्त केलेले भाव नेहमी आपल्यासोबत असतात. हृदयाशी जोडण्यासाठी, माहितीचे देवाणघेवाण करणे, समाजात जागरुकता पसरविणे आणि प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
      आपण जितके वारंवार आपल्याला हवे तितके अक्षरे वाचू आणि जितक्या वेळा शक्य तितके आनंद घेऊ.आजही, दूरसंचार क्रांतीमुळे मोबाईल डिव्हाइसेसमुळे तथापि, पत्रांचे महत्त्व कमी झाले नाही. आजही, घनिष्ठ संबंध जतन करण्यासाठी सरकारी आणि व्यवसायासाठी पत्र आवश्यक आहेत. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ माध्यम आहे.


पत्र मुख्यतः दोन प्रकारचे आहेत-

  • औपचारिक पत्र - सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी लिहून ठेवलेले असे पत्र औपचारिक पत्रांच्या श्रेणीमध्ये येतात.
  • अनौपचारिक पत्र - जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेले असे पत्र अनौपचारिक पत्रअसे म्हणतात. यांना वैयक्तिक पत्र असेही म्हटले जाते.

चांगला पत्र लिहिण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:

  • प्रभावी लेखन: आपला पत्र प्रभाव टाकणारे असले पाहिजे. 
  • सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.
  • थोडक्यात: पत्र नेहमी थोडक्यात लिहावे, अनावश्यक पाल्हाळ लावू नका.
  • क्रमिकरण: विषयानुसार पत्र क्रमवारीत लिहा.
  • शब्दलेखन सुधारणाः मात्रा आणि विरामचिन्हे यांच्यात चुका करू नका.
. औपचारिक पत्रलेखन
                                             २३२८, दळवी गल्ली
                                             कुरुंदा ४२१५१२
                                             १० आॕगस्ट, २०२०


प्रति,
व्यवस्थापक 
मेहता बुक पब्लिकेशन,
पुणे - ४११०३०
दिनांक  १०/०८/२०२०


  महोदय,

          आपल्या प्रकाशनाच्या पुस्तकांची माहिती मला मिळाली.  मला अभ्यासासाठी काही पुस्तकांची आवश्यकता आहे. कृपया खालील पुस्तकांच्या दोन-दोन  प्रती खाली दिलेल्या माझ्या पत्यावर पाठवण्याची कृपा करावी .

पुस्तकाचे नाव                                लेखक
१.सुगम मराठी व्याकरण-लेखन      मो. रा. वाळंबे
२.शुद्धलेखन परिचय                    मो. रा. वाळंबे
३.इंग्रजी मराठी डिक्शनरी             सोहोनी
४.अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण      ओक


                                              आपला विश्वासू 
                                                शुभम दळवी


२) अनौपचारिक पत्रलेखन


232, गांधी नगर ,
मुंबई -400 037
दिनांक : 13.12.2018



प्रिय मित्र रमेश यास,

     सप्रेम नमस्कार.

        मित्रा रमेश कसा आहेस ? सर्व मजेत ना ? माझ सर्व ठीक चालल आहे. येत्या १६ डिसेम्बर ला तुझा वाढ दिवस येतोय  त्या शुभ दिनासाठी माझ्या तर्फे तुला खुप खुप शुभेच्छा .माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या साठी भेटवस्तू म्हणुन तुला आवडणारे शिवजी सावंत लिखित " छावा " ही कादंबरी सोबत पाठवली आहे . आशा आहे तुला ते जरूर आवडेल आणि तुझ्या साठी लाभदायी ठरेल.

       परत एकदा खुप खुप अभिंनदन.

                                                        तुझा मित्र
                                                           सुरेश




प्रयोग व प्रकार

*प्रयोग व त्याचे प्रकार*

*वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.*

*मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.*

1) कर्तरी प्रयोग
2) कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग

1. *कर्तरी प्रयोग (Active Voice) :*

जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात.

उदा .

तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी)ती चित्र काढते. (कर्ता- लिंग)ते चित्र काढतात. (कर्ता- वचन)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

1. सकर्मक कर्तरी प्रयोग
2. अकर्मक कर्तरी प्रयोग

1. सकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

राम आंबा खातो.सीता आंबा खाते. (लिंग)ते आंबा खातात. (वचन)

2. अकर्मक कर्तरी प्रयोग :

ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

राम पडलासिता पडली (लिंग)ते पडले (वचन)

2. कर्मणी प्रयोग (Passive Voice) :

क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात.

उदा .

राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग)राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन)

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
2. नवीन कर्मणी प्रयोग
3. समापन कर्मणी प्रयोग
4. शक्य कर्मणी प्रयोग
5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग :

हा प्रयोग मूल संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरनातील वाक्य संस्कृत मधील कवीरूपी आढळतात.

उदा.

नळे इंद्रास असे बोलीले.जो – जो किजो परमार्थ लाहो.

2. नवीन कर्मणी प्रयोग : 

ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात.

उदा .

रावण रामाकडून मारला गेला.चोर पोलिसांकडून पकडला गेला.

3. समापण कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो तेव्हा त्यास समापण कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

त्याचा पेरु खाऊन झाला.रामाची गोष्ट सांगून झाली.

4. शक्य कर्मणी प्रयोग :

जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आई कडून काम करविते.बाबांकडून जिना चढवितो.

5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग :

कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.

उदा .

त्याने काम केले.तिने पत्र लिहिले.

3. भावे प्रयोग :

जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

सुरेशने बैलाला पकडले.सिमाने मुलांना मारले.

भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तुक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.

उदा.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.रामाने रावणास मारले.

2. अकर्मक भावे प्रयोग :

ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात

उदा .

मुलांनी खेळावे.विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :

भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.

उदा .

आता उजाडले.शांत बसावे.आज सारखे उकडते.

टोकाई

स्थळकाव्य: टोकाई
(वसमत जि. हिंगोली)
टोकाई

षट्कोणी ही बारव
आहे निजामकालीन
गडी देवी ती टोकाई 
जसी पहाडी वाघीन

तळ कुणी न पाहिला
अशी ख्याती बारवेची
गुप्त धनाच्याही कथा
कल्पकता ती जनाची

स्थळ हे निसर्गरम्य
श्रावणात गडावर
हिरवळ शोभे सारी
पानोपानी वृक्षांवर

भरे दस-याला यात्रा
टोकाईच्या माळावर
भक्त सारे दर्शनाला
येती पायी चढावर

थाटे दुकाने प्रसादी
मुरमुरे बत्ताशांची
खेळण्याच्या दुकानातं
होई गर्दीही मूलांची

- सोमनाथ पुरी

मंगळवार, २१ जुलै, २०२०

श्रावण सरी

*****************
*श्रावण सरी*
******************
झीम झीम सरी आल्या
श्रावणात वेली न्हाल्या
चींब झाले वृक्ष सारे
माती तृण पांघरल्या

आला हवेतं गारठा
काटा अंगावर आला
थेंबा थेंबाचा पाऊस
मनोमनी रेंगाळला

शब्द रमले सृष्टीत
भाव मनात आले
निसर्गाच्या बदलाचे
स्वागतही हर्षी झाले

सण असे आनंदाचे
श्रावणाच्या मासी आले
गौरी गणपती येता
सर्व आनंदीत झाले

नाग पंचमीचा झुला
झाडा झाडाला बांधला
चढाओढ खेळण्याची
झोका उंच उंच गेला
*****************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************

गझल (वृत्त आनंद)

**************
जीवास घोर आहे
प्रेमात जोर आहे

धारात पावसाच्या
मौनात शोर आहे

ईमान वीकलेल्या
नेत्यात चोर आहे

माणूस मानलेल्या
टोळीत ढोर आहे

फूलात झींगलेल्या
भूंग्यास तोर आहे

रुतू मनातला तो
स्वप्नात मोर आहे

सांजेस लाल आभा
रात्रीस कोर आहे
**************
*सोमनाथ पुरी*
**************

रविवार, १९ जुलै, २०२०

तत्सम शब्द

#तत्सम_शब्द 
(संस्कृत भाषेतून मराठीत ध्वनी परिवर्तन न होता आलेले शब्द)

अमृत - सुधा,पियुष
अनाथ - पोरका
अनल - अनिल,वारा,वात,पवन
अरण्य - जंगल,कानन,वन,विपिन आग,अनल,पावक,वह्नि,ज्वाला,वृहदभानु ,वायुसख, चित्रभानु, विभावस, शुचि, अचिन्त, कृशानु, वैश्वानर,धनंजय,दहन,सर्वभक्षी,जातवेद, हुताशन,हव्यवान,ज्वलन,शिखा, वैसन्दर,रोहिताश्व, कृपीट्योनी,तनूनपात,शोचिष्केनश,उषर्बुध,आश्रयाश,
अजेय -अदम्य,अपराजेय, अजित,अपराजित
अतिथी - पाहूना,अभ्यागत,आगन्तुक,बटाऊ
अरण्य -  कानन,जंगल
अश्रु  - आसवे,आसु
अनुपम -  अपूर्व, अतुल,अनोखा,अद्भुत,अनन्य
अमूल्य - अनमोल
अमित  - अमर्याद,अगणित,! असंख्य
अग्नी - विस्तव ,अनल, पावक,वन्ही, वैश्वानर, आग
अनल  - अग्नी, विस्तव पावक, वन्ही,वैश्वानर
अभिनय - हावभाव , अंगविक्षेप
अमृत - सुधा पीयूष
अरण्य - रान,  कानन,  वन , विपीन,  जंगल
अश्व - घोडा,  हय,  तुरग तुरंग,  तुरंगम वारु,  वाजी.
अही - सर्प, साप,  भुजंग,  व्याल.
आम्र -आंबा
आवाज - स्वर,नाद,ध्वनी,सूर
आई - जननी,माता,माऊली,माय,मातृ
आश्चर्य - अचंबा,विस्मय,नवल,नवलाई
आस्था - आदर,आदर, जिव्हाळा,आपुलकी
आनंदी - आई-माता, माय , जननी , जन्मदात्री
आनंद - मोद, हर्ष, संतोष, प्रमोद, आमोद
आई - माता,  जननी, माय, जन्मदा, जन्मदात्री,  माउली.
आकाश - गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण अंतरिक्ष,ख, अंतराळ, आभाळ,अवकाश
आठवण - स्मरण, स्मृती.
आनंद - मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष.
आवाहन - विनंती, बोलावणे.
आश्चर्य - नवल, विस्मय,  अचंबा.
आहार - खाणे,  भोजन.
इच्छा - आशा,मनिषा,वासना,आस
ईश्वर - नटवर,परमेश्वर,देव,भगवान
उत्सव - सण
उत्सव - समारंभ
ऊन  - ऊर्ण
ओठ -.ओष्ठ
अंबर -नभ, व्योम,गगन,आकाश, वस्त्र
अंग - देह, तनु, शरीर,काया
अंतराळ - अवकाश,
अंगठा व करंगळी अंतर - वीत

अघ - पाप,दोष,गुन्हा, अपराध, अधम
अघटित - असंभाव्य, विलक्षण, लोकोत्तर, अपूर्व, नवलपूर्ण, चमत्कारिक, अदभुत, अजब, अभूतपुर्व
अघोर - अचाट, भयंकर, अमंगल, भीतिदायक, राक्षसी,वाईट,दारुण,आसुरी, 
अचपळ - खोडकर, चंचल, तरतरीत, चैतन्यपूर्ण, गतिमान
अचरट - वाह्यात, अयोग्य, अविचारी, व्रात्य, बावळट, 
अचाट - फार, अतिशय, विलक्षण, फाजील, भलतेच, अजब, अमानवी, अतिमानवी, बेफाट,बेसुमार, पराकोटी
अचानक - अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी,अवचित,अकल्पित, कर्मधर्मसंयोग, अभावित
अचेत - अचेतन,जड,चैतन्यरहित, निर्जीव,  प्राणरहित, चैतन्यहीन, निष्प्राण, निपचित,  निचेष्ट
अछोडा - कासरा, दोर, चाबूक,दावण,दवे,लगाम, रस्सी, नाडा,वादी, रज्जू, सुंभ, प्रत्यंचाअजंगम - स्थावर, न हलणारे, अचल
अजर - वृद्धत्वहीन, शाश्वत,अविनाशी,चिरतरुण
अजस्त्र - मोठा, प्रचंड, विस्तृत, अवाढव्य, महाकाय,अगडबंब, स्थूल
अजिंक्य - दुर्भेध, अजेय,अपराजित,अदम्य,अजित, अमोघ
अटकर - बांधेसूद, नीटनेटका, हट्टी, प्रमाणबद्ध, नीटस,सुबक
अटकळ - अजमास, अंदाज, तर्क, नियम, रूढ,रीत, भाकीत,ठोकताळा, आखाडा, स्थूलमान, होरा
अटकाव - अडथळा, प्रतिरोध,आडकाठी, प्रतिबंध,मज्जाव, अडसर,व्यत्यय,अटकाव, अवरोध,खळ, मनाई , हरकत,अडवणूक, बाधा,पेच,खोळंबा, 
अट्टाहास - आग्रह, अत्याग्रह, हेका आक्रोश
अवाढव्य - अफाट, विस्तीर्ण

कपाळ - ललाट,कपोत,निढळ
कमळ - राजीव,पंकज
कन्या - तनया,मुलगी,लेक,दुहिता,नंदिनी,आत्मजा
कलश - करा,तांब्या
कपाळ - निढळ,  भाल, ललाट, निटिल.
कमळ - अंबुज,  पंकज,  नीरज,  रावीज,  पद्म, नलिनी,  अब्ज,  सरोज.
कविता - काव्य रचना
कर्ण - कान
कलम - लेखणी
कलश - तांब्या
कलह - भांडण,तंटा
कर्ण - कान
कणक - सोनं .धतूरा , गहू
कमळ - पद्म, पंकज
कस - जोम ,सत्व,कसोटी,परीक्षा
काळोख - अंधार,तिमिर,काळोख
कावळा - काक, वायसच, वायस, एकाक्ष,
काळोख - अंधार, तिमीर,  तम.
कासव - कूर्म,कच्छ,कच्छप
काक - कावळा,एकाक्ष
काळजी - चिंता,फिकिर
कार्य  - काम,
कानन - अरण्य
कांचणी - त्रास
किंकर - दास,सेवक,गुलाम
किरण - कर, अंशू, रश्मी.
कुवासना - वाईट इच्छा
कुसुम – फुल,सुमन
कृष्ण - कान्हा,कन्हैया, मुकुंद,वासुदेव,मोहन,मधुसुदन
केस - कुंतल
कोकिळ - कोयल,पिक
क्रोध - राग,संताप,चीड
कोंदले - भरले

ख - तारांगण,व्योम
खजिना  - तिजोरी ,गल्ला
खल - नीच,दुष्ट, दुर्जन
खच - ढीग,थर,गंज,रास
खड्ग - तलवार
खळ - खंड

गणेश - गणपती,चिंतामणी,गणपती,वक्रतुंड
गर्व   - अहंकार,घमेंड
गल्ली - बोळ
गायन - गाणे
गाय - गौ , गऊ , धेनु ,
गुरु - सखा,मार्गदर्शक
गोरज - सायंकाली,गाई परतताना,विवाह मुहुर्त
गौरव -अभिनंदन,सन्मान
गंध -सुवास,परीमल,वासगंध,वास ,सुवास, परिमळ,दरवळ
ग्रंथ - जाडजूड पुस्तक,पोथी,पवित्र पुस्तक
ग्रास - गवत,तृण,तन
गृह - घर,सदन,निकेतन,भवन

घर - सदन,  भवन, गृह,  गेह,  आलय, धाम,  निकेतन,निवास मकान ,
घृणा - किळस

चव - रुची
चर - खंदक,खड्डा,खळगा
चवताळणे - रागावणे ,चिडणे
चिर - कायम टिकणारे
चेष्टा - थट्टा,मस्करी
चोज - कौतुक
चंद्र - इंदू, शशी, विधू, सोम,  हिमांशू,  सुधांशू, सुधाकर, रजनीनाथ.निशाकर चांदोबा
चंचू - चो च
चांदणे - चंद्रिका,  कौमुदी,  ज्योत्स्ना.

जल - पय,पाणी,नीर,जीवन
जनक - बाप,वडिल,पिता,तात,पितृ
जमीन - भू,  भूमी, भुई,  धरा
जिन्नस - वस्तु,नग
जूना - प्राचीन,जूनकट,पूराणा,फाटकाअरण्य = जंगल,अरण्य,कानन,वन,रान

झाड - वृक्ष,  तरु, पादम,  द्रुम.
झोपाळा - झुला,झोका,हिंदोळा

डोके - मस्तक,शीर,मस्तिष्क
डोळा - नयन,  लोचन, नेत्र,  अक्ष,  चक्षू.
डौल - ऐट,रुबाब,दिमाख
डोंगरी - आग-वणवा,दावानल

ढग - मेघ,  घन,जलद,पयोधर

तलवार - खड्ग,  समशेर,  असि.
तलाव - तटाक,  तडाग, कासार,  सारस.
तोंड - वदन, आनन, मुख,  तुंड.

दागिना - अलंकार
दिवस - वार,  वासर,  दिन,  अह.
दीप - दिवा
दूध - दुग्ध, पय,  क्षीर.
दुग्ध - दूध
देऊळ - मंदिर,  राऊळ,  देवालय.
देव - सुर,  ईश्वर,  अमर, निर्जर.
देह - शरीर,  तनू, तन, काया, वपू.
दैत्य - राक्षस,  दानव,  असुर.
दंड -. शिक्षा
धन - संपत्ती,  द्रव्य, संपदा, दौलत.
धनुष्य - चाप,  कोंदड,  कमठा, धनू, कार्मुक.
धाक - जरब,दरारा,वचक
धुरा - जबाबदारी
धुंद - मग्न
धैर्य - धाडस,साहस,धीर,धीटपणा
ध्वज - झेंडा,निशाण

नदी - सरिता, तटिनी,  तरंगिनी. सागरकांता ,कुमुदिनी
नग - रत्न , नगीना , पहाड , सूर्य
नवरा - पती, वल्लभ, भ्रतार,  धव,  कांत,  भर्ता.
निस्तेज - तेजहीन
निष्णात - तरबेज,प्रविण,पारंगत
नैवेद्य - प्रसाद
नृत्य - नाच
नृत्य - नाच,नर्तन

पत्नी - अर्धांगिनी,  दारा,जाया,बायको भार्या बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, 
पळापळ - भागमभाग,धावाधाव,धावपळ
पर्ण - पान,पत्र,पत्ता
पक्षी - खग, विहंग
पत्र - पान
परंतु - पण
पत्नी - भार्या,  बायको, कलत्र, अर्धांगी, कांता, दारा, जाया.
पराक्रम - शौर्य, प्रताप, विक्रम, बहादुरी.
पर्वत - अचल, नग, अद्री, शैल, गिरी.
पक्षी - खग,  विहग, विहंगम, अंडज, द्विज.
पर्वत - टेकडी,डोंगर, पहाड
पध्दतशीर - रीतसर,रीतीप्रमाणे
पाय -पद
पत्नी - बायको,अर्धांगीनी,सहचरिणी
पान - पल्लव, पर्ण, पत्र.
पाय - पद, पाद, चरण.
पातक - पापक,दुष्कृत्यपोपट- शुक, राघू रावा.
पाप - दुष्कृत्य
पाणी - जल,  अंबू, पय, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, वारी. अमृत
पुण्य - सत्कृत्य,सत्कार्य
पुत्र - तनय,मुलगा,तनुज ,नंदन,सुत
पुरुष - नर, मनुष्य, मर्द.
पोपट - शुक, राघू रावा.
पुष्प - फूल,कुसूम
पुरी - शहर
पंकज - कमळ,राजीव
पृथ्वी -  वसुंधरा ,धरा धरणी,धरती,जमीन,भूमी,क्षिती,अवनी,क्षमा,कुंभिनी,मेदिनी
प्रात:काल  - पहाटे,सकाळी
प्रसिद्ध -  प्रख्यात,नामांकित,ख्यातनाम,विख्यात
प्रीती - प्रेम
पृथ्वी - धरणी, धरती, वसुंधरा, धरित्री, भू, भूमी, धरा, मही, क्षमा रसा.
प्रासाद - वाडा, मंदिर.
प्रवीण - निपुण, कुशल, हुशार, पटू, तरबेज, निष्णात.
प्रसिद्ध - प्रख्यात, नामांकित,  ख्यातनाम, विख्यात.
प्रेम - प्रीती, लोभ, अनुराग.
प्रकाश - उजेड
प्रवीण - निपुण,कुशल,पारंगत
प्रीत्यर्थ,- त्यामुळे ,त्यासाठी

फुका - व्यर्थ
फूल - पुष्प, सुमन, कुसुम, सुम.

बाण -शर,तीर,सायक
बाग - बगीचा, उदयान, उपवन.
बाण - शर, तीर, सायक.
बाप - पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता.
बिकट - कठीण,  अवघड.
बांबू - वेळू,कळक
ब्राह्मण - विप्र,द्विज
ब्रम्हदेव -कमलाकर,प्रजापती,  विधी ,विधीकर
ब्राह्मण - द्विज, विप्र.

भगवान - देव,ईश्वर, भगवंत
भाऊ - भ्राता, बंधू, सहोदर.
भीती - भय
भुंगा - भ्रमर, अली, मधुप, मिलिंद, मधुकर
भूमी - भू, जमिन,भुई
भोजन - जेवण,अन्न
भांडण - तंटा, कलह, झगडा, कज्जा.

मत्सरानल - मत्सरुपी
मर्कट - माकड,कपि
महर्षि - ऋषी,मुनी,साधु
मस्तक - डोके,शिर,माथा
मरण - मृत्यु,प्राण जाणे,देहावसान
मस् - तीळ ,चामखीळ
मस्तक - शिर ,शीश ,डोके ,शीर्ष
मरण - मृत्यु,प्राण जाणे,देहावसान
मस् -  तीळ ,चामखीळ
मासा - मीन
मानव - मनुष्य,माणुस
मान - प्रतिष्ठा,सन्मान,मोठेपणा
माया - ममता,प्रेम,वात्सल्य
माणूस - मनुष्य, मनुज, मानव .
मासा - मीन,  मत्स्य.
मित्र - स्नेही, सखा, दोस्त, सोबती, सवंगडी, सुहद्.यार
मुलगा - सुत, तनय, आत्मज, तनुज, पुत्र, नंदन.
मुलगी - सुता, तनया, तनुजा, कन्या, आत्मजा, दुहिता, नंदिनी.
मौज - मजा,गंमत

रमणीगर्व - सुंदर स्त्रिचा गर्व
रव - आवाज
रस्ता - मार्ग, पथ, वाट, पंथ.
रजनीकांत - शशी
राई - झाडी
राघू - पोपट ,तोता ,रावा
राग - संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप.
राजा - भूपती, भूप नृप, नरेश, नरेंद्र, भूपाल, नृपती, राय, लोकपाल, भूमिपाल,.बादशहा,
रात्र - रजनी, यामिनी, निशा.
राख - खाक,भस्मसात
रेखणे - आखणे

लग्न - विवाह , जन्मगाठ
लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, पद्मा वैष्णवी.
लालसा - इच्छा
लाहे -. लाभते

वर्ण -अक्षर , रंग
वन - जंगल, रान
वडील - बाप , जन्मदात तात
वसुंधरा - रा,धरणी,अवनी,पृथ्वी
वावड्या - अफवा,वदंता
वर्दळ - राबतां,वावर,गर्दी
वर्ष. - संवत्सर,साल,सन
वस्ती - वसाहत
वारा - पवन,सुनील,वायु
वस्त्र - वसन, अंबर, पट, चिर.
वात्रट - चावट,आचरट
वानर - मर्कट,कपि, शाखामृग.
वानणे - स्तुती करणे
वारा - पवन, अनिल, मरुत, समीर, वायू, वात, समीरण.
वाड:निश्चय  - साखरपुडा
विलोल - चंचल
विष्णू - श्रीपती,रमापती, रमेश, चक्रपाणी, अच्युत, केशव, नारायण, माधव, गोविंद, मधुसूदन, त्रिविक्रम, पुरुषोत्तम, वासुदेव, हषिकेश पद्मनाभ, पीतांबर, शेषशायी, उपेंद्र, श्रीधर.
विद्वान - पंडीत,. हुशार
वीज - चपला, तडित, बिजली, विदयुत, सौदामिनी, विदयुल्लता.
वेचिले - खर्च केले
वैखरी - वाणी
वृक्ष - तरु,झाड,द्रुम,पादप,शाखी
वृद्ध - म्हातारा
व्यथित - पिडलेले

शत्रू - अरी, रिपू, दुष्मन, वैरी.
शिशु - बालक,तान्हं बाळ,
शिखर - माथा,कळस
शिर - डोके,मस्तक,शीर्ष
शेतकरी - कृषिक, कृषीवल.
शंकर - महेश, त्र्यबंक, रुद्र, भालचंद्र, चंद्रशेखर, पार्वतीश, महादेव, सदाशिव, कैलासनाथ, महेश्वर, नीलकंठ, शिव, सांब, दिगंबर, त्रिनेत्र, शंभू, चंद्रमौळी, उमापती.

सफलता - साफल्य,सार्थक,चीज,धन्यता
सकस - पौष्टिक ,चवदार,कसदार,सत्वयुक्त
सन्मान - गौरव
समृद्धी - भरभराट
सरिता - तटिनी,नदी
सन्मति - .सद्बुद्धी
सर्प - साप
सत्वर - सूर,नाद
समर्थन - पाठिंबा
सत्कार - गौरव
सत्कार - सन्मान,आदर
समुद्र - सागर, उदधी, सिंधू, अर्णव, अंबुधी, पयोधी, जलधी, वारिराशी, रत्नाकर. सहस्ररश्मी, मार्तंड,  वासरमणी.
सह्याद्री - सहयपर्वत, सहयाचल, सहयगिरी.
समारंभ- कार्यक्रम
सभ्य - सज्जन
सुत्र  - पध्दत,रीत
सुत्र  - धागा
सुषुप्त - झोपलेले
सुंदर - सुरेख, रम्य, रमणीय, ललित, मनोहर, अभिराम.
सुरवात - आदि, आरंभ, प्रारंभ.
सुज्ञ - विवेकी,समंजस,शहाणा
सूर्य - रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशू,  दिनकर, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, सहस्रकर
सेनापती - सेनानी, सेनानायक.
सुदूरस्थ - अतिशय दूर असलेला
सुर्य - भास्कर, दीनकर,सुरज, रवि,     सविता,मित्र, आदित्य,वासरमणी
सैल. - ढगळ,ढिला
सोने - सुवर्ण, कनक, कांचन, हिरण्य, हेम.
सोबत - साथ
संघर्ष - कलह, झगडा, टक्कर, भांडण.
संमेलन - मेळा,मेळावा
संत - साधू
सिंह - केसरी, पंचानन, मृगेंद्र, मृगराज,  वनराज.
स्त्री - अबला, महिला, ललना, वनिता, नारी, अंगना, कामिनी.बाई,  
स्वामी - मालक

हस्त - हात,कर,बाहु
हत्ती - गज, कुंजर, सारंग, नाग.
हरिण - मृग, कुरंग, सारंग.
हरी  - कृष्ण , इंद्र , विष्णू
हत्यार - अवजार
हात - हस्त, कर, पाणि, भुज, बाहू.
हास्य, - हसणे
हेतू -  उद्देश,मनसुबा,इरादा
होडी - नाव, नौका, तर .
हदय - अंत:करण, अंतर.

तन - अंग,शरीर,देह
तट - किनारा,तीर,काठ
ताकत - शक्ती,बल
तिथी - मिती,तारीख
तुल्य - समान,सारखा,सम
तोंड - मुख, चेहरा
त्वेष - स्फुरण,आवेश

दगड - अश्म,पाषाण,खड
द्वेष - मत्सर,हेवा
देवर्षि - देवऋषी
दैत्य - दानव,असुर,राक्षस

नमस्कार  - दंडवत,परिणाम,वंदन,नमन,अभिवादन, प्रणिपात
नदी - सरीता
नित्य - नेहमी, सदा, सतत, नियमीत , अविरत
निःसंग - विरक्त
निशा - रात्र
नीर - पाणी, जल, तोय
निवे  - शांत होते

श्रध्दा - विश्वास
श्रीफळ - नारळ
श्रृंगार -  साज

ऋतू - मोसम,हंगाम
ॠषी - मुनी,  साधू.

ढग - जलद,  अंबुद, पयोधर, पयोद,  नीरद, अब्द, घन, अभ्र ,मेघ.
ढ्ग - मेघ , जलधी

यद्यपि - अद्याप,अजुन
युद्ध - लढाई, संगर, झुंज, संग्राम, समर, रण.

रविवार, २१ जून, २०२०

बाप



जन्म लेकराचा होतो
तेंव्हा बापं आनंदातं
उत्साहीतं मनं त्याचं
वाटे मिठाई गावातं

ठोका चुके काळजाचा
बापं कासावीसं होतो
आजारातं तो बाळाच्या
दवाखाना ही गाठतो

देतो घेऊनं खेळणे
गरीबीत ही देखणे
हास्यं बाळाचे पाहूनं
दुःखं बापाचे ते उणे

बाळं शाळेमधी जाता
घारीवानी फिरे मनं
क्षणोक्षणी चिंता लागे
येतो आनंद घेऊनं

मोठे होते जेंव्हा मूलं
लागे चिंता भविष्याची
कधी रागावतो बापं
ओढं बाळं कल्याणाची

सोडू नका वृध्दकाळी
मायं बापं ते आश्रमी
त्यागं सुखाचा करुनं
झीजतातं ढोरावानी

- सोमनाथ पुरी