काव्य शिरोमणी
******************************
*काव्य शिरोमणी* हा पारंपरिक काव्य रचनेचा प्रकार नाही. त्यामूळे अधिक माहिती कुठेही उपलब्ध नाही. प्रामुख्याने समाजमाध्यमांवर लिहीला जाणारा काव्य प्रकार आहे. ह्यात कडव्यांच्या संख्येचे बंधन नसले तरी कविता सुरस व्हावी व मूल्यमापणासाठी किमान पाच कडव्यांची रचना असावी. उर्वरीत नियम खालील प्रमाणे.
*नियम*
*१) चार ओळींचे कडवे असावे.*
*२) पहिल्या ओळीत एकच शब्द असावा व तोच शब्द प्रत्येक कडव्यात प्रथम शब्द असावा.*
*३) दुसऱ्या ओळीत दोन, तिसऱ्या ओळीत तीन व चौथ्या ओळीत चार शब्द असावेत.*
*४) दुसऱ्या व चौथ्या किंवा तिसऱ्या व चौथ्या ओळीत यमक साधलेले असावे.*
*५) पहिला शब्द हा संबोध असावा/ संकल्पनात्मक त्या शब्दाबद्दलचा आशय प्रत्येक उलगडत जावा.*
*६) अक्षर संख्येचे कोणतेही बंधन नाही.*
*********************************
भावना
वात्सल्य सिंधू
मातेची असे खास
ममतेची बालकास ती आस
भावना
प्रेमात प्रियसीची
जीवाला असतो ध्यास
विरहात जणू गळ्याला फास
भावना
क्रोधाची करते
विनाश हळव्या मनाचा
मार्ग असतो तो अधोगतीचा
भावना
लोभाची करते
जेंव्हा संपत्तीचा हव्यास
सुख समाधान जाते लयास
भावना
अहंकारी मनाची
अंधत्व ठरते विद्वानांची
होळी करते सर्व प्रस्थापितांची
*~सोमनाथ पुरी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा