*उपक्रमासाठी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*शब्द रजनी साहित्य समूह आयोजित*
*लावणी उपक्रम*
*विषय : प्रीत गुलाबी थंडीची*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
*प्रीत गुलाबी थंडीची....*
मौसमात आली बहार, रानामधी ही सुगीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची||धृ||
सोळा श्रृंगार केला राजसा हा तुमच्यासाठी
राया आता!अहो सख्या आता! घ्या एक मिठी
पहा कशी नभी लाली पसरली तिन्ही सांजेची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||१||
थंडी वाढली झोंबणारी, गोरी काया थरथरली
तुम्हा पाहून मनात वेंधळी भावना सळसळली
अहो सख्या आता ऊब द्या ना जरा पिरतीची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||२||
तारांगणे ही फुलली, रात चांदण्यात शहारली
सख्या पहा ना आता कशी रात धुंद नशीली
बघा भर ज्वानीत कशी कामिनी हि मदनाची
राया सांज घेऊन आली, प्रीती गुलाबी थंडीची ||३||
*- सोमनाथ पुरी*
~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा