[27/12, 11:47 PM] Abnave Anita: *गीत म्हणजे काय*
शब्दरचनेला सुरावट किंवा स्वररचना प्राप्त करून दिली तर ती शब्दरचना गीत बनते. शब्दरचना ही शब्दांच्या उच्चारांच्या ज्या समाजमान्य पद्धती आहेत तिच्यातून जन्माला येत असते. ती करताना प्रत्येक ओळीत विशिष्ट अनुक्रमाने येणारा शब्दसमूह हा एक कालिक रचना घडवितो. अनेकदा विशिष्ट अंतराने तोच तो उच्चार येतो आणि आपणास लयपूर्ण बांधणी प्रतीत होते. कवितेच्या या अंगभूत लयीवर सुरांची एक रचना बसविली गेली की ती कविता गीत बनते. संगीतातील स्वररचनेमध्ये कवितेतील शब्द बसविले की गीत तयार होते.
*ध्रुवपद म्हणजे काय ?* *मुखडा म्हणजे काय ?*
ध्रुवपद म्हणजे गाण्याची सुरुवात. त्याला मुखडाही म्हणतात. गाण्याची सुरुवात दोन ओळी किंवा चार ओळीने लिहिता येते. यात छंद आणि मात्रा मध्ये या दोन्ही पद्धतीने गाण्याची रचना लिहिता येते.
*अंतरा म्हणजे काय?*
मुखडाच्या ओळी संपल्यावर नंतर ज्या ओळी सुरू होतात. त्यांना अंतरा म्हणतात. कोणत्याही गाण्यात एका कडव्यात चार किंवा पाच ओळी असतात.
अंतरीच्या ओळी तीन ओळी असतात. चौथी ओळ ही मुखडा ओळीची असते. अंतरीच्या ओळी ध्रुवपदास समरूप असायला हवी. रचनेत लय,ताल, आशय, यमक असावा. गाण्याच्या ओळी अर्थपुर्ण असाव्यात.सहज गुणगणता यावी आणि चाल लावता यावी अशी रचना असावी. कोणत्याही गाण्याची कडवी ३,४, त्याही पेक्षा जास्त कडवी असू शकतात.
*मीटर म्हणजे काय*?
पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दांपर्यंतचे जे त्याला मीटर असे म्हणतात.
गीत लिहिताना मीटरचे अंतर कमी असावे. गीत सहज गुणगुणता व चाल लावता यावी असे असावे.
*गीत प्रकार*
अभंग , गझल , लावणी , बालगीत ,भावगीत , भक्तीगीत, देशगीत ,लोकगीत, ओवी, गवळण, पोवाडा असे अनेक गीतेचे प्रकार आहेत.
१) गीत प्रकार :- लावणी
आज आपण लावणी गीत प्रकार बघणार आहोत. लावणी हा काव्याचाच प्रकार आहे. लावणी वाड्:मयाचा अभ्यास करताना... प्रथम आपण तिची शैली पहाणार आहोत . तिची मांडणी, काव्यात्मकता कशी असते रचना लिहिताना या गोष्टी घ्यावा लागतात. गीतांमध्ये सुर,ताल आणि भाव यांचा मधूर संगम असतो. लापनिका या संस्कृत शब्दावरून लावणी हा शब्द तयार झाला असावा. लवण म्हणजे सुंदर...लवण या शब्दावरून लावण्यगीत व लावणी शब्द तयार झाला असावा. लावणी शृंगाररसाचा मानसिक पाया आहे . लावणी हे ग्रामीण गीत आहे. ग्राम्यता, शृंगार व गेयता या तीन लक्षणांसोबत नृत्यात्मकता हे लावणीचे लक्षण आहे. सजण व साजणी यांची मनाला धुंद करणारी चित्र लावणीत आढळतात.लावणीचे अंतरंग सुंदर व रसपूर्ण ती म्हणण्याचा ढंग ही नखरेबाज आहे. वीरश्री आणि शृंगार हे तारूण्याला शोभणारा विषय आहे. लावणी लिहिणे सोपे नाही. वीर, कारूण्य, शृंगार यांची मांडणी म्हणजेच लावणी असते. लावणी लिहिताना आपल्या नजरेसमोर तशी बैठक आणि बाज ठेवावा लागतो. शृंगारशिवाय लावणीत मजा नाही. नुसताच शृंगार रस नाही तर नऊरसांनी ती सजलेली आहे. म्हणून ही लावणी नऊवारीत सादर केलेली आपण नेहमी पाहत आलो आहे. ह्रदयाला चटका लावणारी आणि विशेषतः स्त्री सौंदर्य वर्णन असणारी लावणी आपण शिकणार आहोत.
*लावणीचे प्रकार*
(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.
(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.
(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.
*सौ. अनिता आबनावे* ©®
[27/12, 11:59 PM] Abnave Anita: लावणी
विषय :- लाखात एक शुक्राची चांदणी
कुहू कुहू कोकीळा गाते प्रेमात मंजुळ गाणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी
नेसली भरजरी साडी पैठणी नऊवारी
ओठांवर लाली साज गळ्यात कोल्हापूरी
बांगड्या वाजे खणखण ज्वानीत धुंद होऊनी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी
गोरी गोरी माझी काया गालावर खळी
यौवनात उमलते जशी गुलाबाची कळी
झालं वरीस सोळा बहरत आली ज्वानी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी
नजर नका लावू नेत्री लावली कोरीव काजळी
लाल कुंकवाचा टिळा चंद्राची कोर कपाळी
उमटे दिलावर राया राज करते ही इश्काची राणी
उगवली जशी लाखात एक मी शुक्राची चांदणी
.....सौ. अनिता आबनावे ©®
[28/12, 12:04 AM] Bhavarthi Rajashri: लगीनाची घाई का हो झाली कारभारी*!
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!धृ!!*
आणालं का हो राया पैठणी पिवळीजर्द...
बघून तुम्हांस्नि होतील सख्या साऱ्याच सर्द !
मर्दानी बाणा तुमचा पाहता भुलले हो स्वारी ...
*साजशृंगारी ललना नटूनी...नेसली नऊवारी !!१!!*
लावण्य सुंदरी मनात खूप भरली ..
पहावया तिला पाव्हणं गोळा झाली !
स्वागतासी त्यांचा मंडप घातला दारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!२!!*
भरजरी शालूचा पदर सावरत ..
नटखट ऐश्वर्या निघाली बावरत !
अक्षतेसाठी हो खोळंबली सारी !
*साजशृंगारी ललना नटूनी ...नेसली नऊवारी !!३!!*
सौ राजश्री भावार्थी
पुणे
[28/12, 12:06 AM] Bhavarthi Rajashri: विषय - आरसा*
*भिगिभिगी पावलं माझी आरशापुढे धावली.....!*
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !! धृ !!*
बुगडी माझी सावरत हो, वाट तुमची अडवते ....
वर्खाचा गोविंद विडा, तुमच्यासाठी गुंफते !!
कोमल काया माझी, तुमच्या प्रेमात बुडाली...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली!!१!!*
कारभारी आता तुम्ही जरा दमानं घ्या ...
आरशात माझं देखणं रूप, हे पाहून घ्या !!
पिळदार रुबाबाची भुरळ, या दिलावर पडली ...
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी, मनी खूप लाजली !!२!!*
मनीचं माझ्या गोड गुपित,हे सांगून झालं....
काया तुमची बघून माझं अंग शहारलं !!
पिरतीच्या चांदण्याची उधळण, अंगणभर पसरली ..
*ज्वानीची गुलाबी कळी पाहुनी,मनी खूप लाजली!!३!!*
©️ *राज*
*सौ राजश्री भावार्थी*
*पुणे*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा