बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

कोल्हापूरी मिर्ची (लावणी)

***********************************
*स्पर्धेसाठी*
*शब्दरजनी साहित्य समूह आयोजित*
*भव्य राज्यस्तरीय लावणी लेखन स्पर्धा*
*दि. ३०/१२/२०२०, बुधवार*
***********************************
*विषय : कोल्हापूरी मिर्ची*

लागती तिखट चांगली लालभडक ही मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||धृ||

आला थंडीचा महिना जीवाची झाली दैना
वरण भात, भाजीचा पांचट पणा तो जाईना
जीभीला चटका आवड मी आहे सा-यांची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||१||

म्हाता-याला लागते खमंग ठेचा अन भाकरी
तरण्यालाही आहे माझ्यातच गोडी लय भारी
भर ज्वानीत आहे, गावरान लालेलाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची ||२||

थंडीत गरमी गरमीत नरमी मिरची लाल सस्ती
चव जरा तोंडानी घ्या ना जीरवा तुमची मस्ती
हिरव्या देठाची आहे भर पाडात लाल मिरची
राया मी आहे कोल्हापूरची लाल लवंगी मिरची||३||

**********************************
*- सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
**********************************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा