शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

विवीध काव्य नियम

Shalini Wagh:
*काव्यबत्तीशी हा काव्यप्रकार मोहरली समुह प्रमुख सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे यांचा स्वनिर्मित काव्यप्रकार आहे.*

*काव्यबत्तीशी नियमावली*

काव्य बत्तीशी प्रकारातील काव्य करीत असताना

१}

*पहिल्या ओळीत       नऊ(९)* 
*दुसऱ्या ओळीत       सात(७)*
*तिसऱ्या ओळीत      नऊ(९)*  
*चौथ्या ओळीत         सात(७)*
                *एकूण *बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी....*

किंवा याच्या अगदी उलट म्हणजेच

*पहिल्या ओळीत       सात(७)* 
*दुसऱ्या ओळीत        नऊ(९)* 
*तिसऱ्या ओळीत       सात(७)*  
*चौथ्या ओळीत         नऊ(९)* 
                 *एकूण बत्तीस वर्ण*
*म्हणजेच काव्य बत्तीशी...*

अशा पद्धतीने वर्णाक्षरे यायला हवी.

*एकूण काय तर नऊ सात किंवा सात नऊ अशी चारोळीची मांडणी असायला हवी.....*

त्यामुळे काव्यातील पुढची गंमत तुमच्या लक्षात येईल........

२}
यमकांची जुळणी दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतच व्हायला हवी...
यमक अत्यंत सुंदर आणि सटीक असावे......


वरील नियमाप्रमाणे चारोळी लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे.. ती, आशयपूर्ण भाषेचा उत्तम नमुना आणि परिपूर्ण काव्यानुभव देणारी असावी.

काव्यांजली काव्य प्रकार 
*♦️नियम*♦️

*१)*.  *चार ओळीचे एक कडवे असावे*

*२)*.  *पहिल्या ओळीत दोन शब्द*

*३)*.   *दुसऱ्या ओळीत तीन शब्द*

*४)*.   *तिसऱ्या ओळीत दोन शब्द*

*५)*.   *चौथ्या ओळीत एक शब्द*

*६)*.   *दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत शेवटचा शब्द यमक यायला हवा*

*७)*.  *रचनेत आशय, लय, ताल, व्याकरण योग्य असावे*

*८))*. *रचना ३,४, ५ कडव्यांची असावी*

*उदाहरणार्थ*


सडा प्राजक्ताचा
दारी खूप पडलेला 
सुगंध सांडलेला
मनातही...

दरवळ त्याचा
पसरला दाही दिशा
तरुण निशा
भारावली...

प्रभातवेळी फुलतो
प्राजक्त खुलून दिसतो
अंतरात भिनतो
दरवळ...

कोवळी पालवी
फुलांची नाजूक पाकळी
प्राजक्ताची कळी
फुलली...

सडा प्राजक्ताचा
मनात जपून ठेवला
अंगणी पसरलेला
सुगंध...

प्राजक्त मनातला
शब्दातून आज दरवळला
लेखणीतून उतरला
कागदावर...

*धनंजय देशमुख नांदेड*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*उपक्रम   उपक्रम    उपक्रम*

*शब्दरजनी साहित्य समूह*
*आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम सुनीत काव्य*

*विषय:- नशीब*

*दिनांक:- ७/०३/२०२०*

*वेळ:- १०.०० ते ११ रात्रीपर्यंत*

🔴    *सुनीत काव्यप्रकार* 

*Sonnet* हा मूळ रशियन काव्यप्रकार. तो शेक्सपियरने इंग्रजी भाषेत आणला. हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे, त्याचे *सुनीत* असे नामकरण करण्याचे आणि तो मराठी जनमानसात रुजविण्याचे काम रविकिरण मंडळातील कविंनी केले. माधव ज्युलियन, कवी बी. केशवशूत ह्यांची सुनीत काव्ये प्रसिद्ध आहेत.
त्याचे नियम पुढीलप्रमाणे.

🔴     *सुनीत काव्य नियम*

*१. हा काव्यप्रकार १४ ओळींचा आहे*
*२. चार चार ओळींची ३ कडवी आणि
अखेरीस दोन ओळी*
*३. पहिल्या दोन चरणांत पहिल्या आणि 
चौथ्या तर दुसऱ्या आणि तिसऱ्या
ओळींच्या अंती यमक*
*४. तिसर्‍या चरणात मात्र यमक पहिल्या
आणि तिसर्‍या ओळींच्या शेवटी आणिक दुसर्‍या आणि
चौथ्या ओळींच्या अंती यमक*
*५. अखेरच्या दोन ओळींमध्ये यमक
जुळले पाहिजे*
*६. पहिल्या तीन कडव्यात प्रश्न वा भावनातिरेक अपेक्षित* अखेरच्या दोन ओळी काव्याला कलाटणी देणार्‍या.
ह्याशिवाय विं. दा करंदीकर ह्यांनी सुनीत रचना अधिक प्रभावी व्हावी ह्याकरता *मुक्त सुनीत* रूढ केले. ह्यात ओळींची संख्या क्वचित तेरा अथवा पंधरा सुद्धा असते. ह्याचबरोबर यमक नियम सुद्धा शिथिल केलेले आहेत.

 🔴   *उदाहरणार्थ*

*सुनीत काव्य*

वाटते कधी नव्याने आयुष्य जगावे
पण मला का हा एकांत छळतो?
आठवणीने अंतःकरणात वणावा पेटतो
होरपळलेल्या ह्रदयात का वाटते मी मरावे?

जीवनाच्या या सुखदुःखाच्या मार्गात
आयुष्याच्या वाटेवरती का गाऊ विरहाचे गीत?
सख्या पुरल्या तुझ्या आठवणी मी जमीनीत
वाटते का अजूनही रमावे तुझ्याच स्पर्शात?

कळला नाही तुला कधीच मैत्रीचा अर्थ
का समजल्या नाही तुला माझ्या भावना?
आयुष्यभर खाल्लेल्या ठेचा गेल्या व्यर्थ
असह्य झाल्या प्रेमभंगाच्या यातना

एकदा पाहून बघ अंतर्मनाच्या आरशात
तुझेच प्रतिबिंब दिसेल माझ्या ह्रदयात

....सौ. अनिता आबनावे ©®

======================

*समूह संस्थापक*
*सौ. अनिता आबनावे*

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

*हायकू बद्दल थोडीशी माहिती:*

हायकू हा जपानी कवितेचा एक पारंपरिक प्रकार आहे ज्यामधे तीन लहान ओळींंतील कविता असते. हायकू कवितांच्या उत्पत्तीचा शोध नवव्या शतकात सापडतो.

हायकू हा फक्त कविताप्रकार नसून तो भौतिक जगाकडे पाहण्याचा आणि आपल्य अस्तित्वाकडे सखोलपणे पाहण्याचा एक मार्ग आहे. तो वाचकाच्या मनावर एक वेगळा आणि ठळक प्रभाव पाडतो.

शिरीष पै यांनी सन १९७५ मध्ये ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठीत आणला आणि लोकप्रिय केला.

शिरीष पै म्हणजे आचार्य अत्रे यांच्या कन्या. शिरीषताई म्हणायचे त्यांना सारे. 

हायकू मूळ जपानी काव्यप्रकार आहे. 
५,७,५ अशी *अक्षर संख्या असते यात. *(शब्द नव्हे)*
एकूण तीन ओळींची अर्थपूर्ण अल्पाक्षरी कविता म्हणजे थोडक्यात हायकू. 
कोणत्याही दोन ओळीत यमक असावे हा साधारण नियम आहे त्याचा. निसर्ग व मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण टिपणे , ही वैशिष्ट्ये या प्रकारात येतात. 

काव्यप्रकार छोटा असला तरी अर्थ मोठा असतो. म्हणूनच दिसायला सोपा पण करायला अवघड असा हा प्रकार. 

*काही उदाहरणं:*

१.
झटकू कशी? (५)
कोळीष्टके मनात (७)
गुंतले त्यात (५)

२.
शिस्त लावली (५)
मी दुःखालाही नेक (७)
येती एकेक (५)

३.
टपटपत (५)
थेंबही पानांतून (७)
ओल आतून (५)

४.
भिंतीला कान (५)
कानात गोळा प्राण (७)
वाद अबोल (५)

५.
एक मनात (५)
दुसरेच जनात (७)
हेही जिणेच (५)

*(माहिती संग्रहित करून ठेवा.)*

*द्रोणकाव्य नियमावली*

*पहिल्या ओळीत ७ वर्ण*
*दुसऱ्या ओळीत ६ वर्ण*
*तिसऱ्या ओळीत ५ वर्ण*
*चवथ्या ओळीत ४ वर्ण*
*पाचव्या ओळीत ३ वर्ण*
*सहाव्या ओळीत २ वर्ण*
*सातव्या ओळीत १ वर्ण*

*अशी रचनेची मांडणी असते.*

*महत्त्वाचा नियम*

 *पहिल्या,तिसऱ्या, आणि पाचव्या ओळीत*
किंवा 
*दुसऱ्या, चवथ्या आणि सहाव्या ओळीत यमक जुळलेले असावे.*

 *उदा.*
*============================*
*शब्दांकन. धनंजय देशमुख*

*मना होई आनंद*
*परसबागेत*
*तो करवंद* 
*पसरला*
*सुगंध*
*नभी*
*या*

*सुगंधी नी मधाळ*
*थोडेसे आंबट* 
*अन् रसाळ*
*रंगवर्णी*
*ते लाल*
*दिसे* 
*ते*

*सुगंध हवाहवा* 
*वाटसरूस तो*
*वाटतो नवा* 
*कोणासही* 
*तो द्यावा*
*गोड*
*तो*
*============================*

२ टिप्पण्या:

  1. मला माझा स्वनिर्मित "त्रिपदीराना" काव्य प्रकार या पेजवर प्रकाशित करावयाचा आहे कृपया मार्गदर्शन करावे.🙏🙂

    उत्तर द्याहटवा
  2. माझा संपर्क:- राहूल नारायण सपाटे, मोबाईल नंबर ९५०३७३८८३२

    उत्तर द्याहटवा