शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

शृंगार तुझा...

जीव माझा रंगला सखे
प्रीतीत तुझ्या खरा
काय करु उमजेना मला
दे शब्दांचा आसरा 🍁

दिसता तू होतो धूंद मी
उमलू दे प्रीत ही
रातराणीची दरवळ
येते कशी बघ ही 🍁

नको दुरावा असा आता
जप भाव तू असा
प्राजक्ताचा सडा अंगणी
यावा सुगंध तसा 
🍁
तू अबोली बागेतील ती
मी निःशब्द भ्रमर 🐝
स्मित तुझे फुल पाकळी🌷
मी मोती दहीवर🍁

कमल नेत्री काजळ ते
पाणीदार तरल👀
रेखीव भुवया जणू गं
नक्षी शिल्प सरल
🍁
आवर पदर जरासा
खांद्यावर तो आला
नाजुक बांधा चंचला तू
मनी ताबा सुटला🍁

तू स्वप्न परी घोर जीवा
मनी मोर नाचरा 🦃
देखे तुला तरुण होतो
जरी असे बोचरा
🍁
हजर जबाबी चाणाक्ष
वैभव ते बुध्दीचे
शब्दाशब्दांत मांडीशी तू
गीत प्रेम धुंदीचे😍

नजरा खिळवूनी राही
चाहूल ती लागता
हृदये चोरुन घेशी तू💕
सर्वांचे जाता जाता  💃

 🎅 सोमनाथ पुरी✍ 🎅


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा