मंगळवार, २१ जुलै, २०२०

श्रावण सरी

*****************
*श्रावण सरी*
******************
झीम झीम सरी आल्या
श्रावणात वेली न्हाल्या
चींब झाले वृक्ष सारे
माती तृण पांघरल्या

आला हवेतं गारठा
काटा अंगावर आला
थेंबा थेंबाचा पाऊस
मनोमनी रेंगाळला

शब्द रमले सृष्टीत
भाव मनात आले
निसर्गाच्या बदलाचे
स्वागतही हर्षी झाले

सण असे आनंदाचे
श्रावणाच्या मासी आले
गौरी गणपती येता
सर्व आनंदीत झाले

नाग पंचमीचा झुला
झाडा झाडाला बांधला
चढाओढ खेळण्याची
झोका उंच उंच गेला
*****************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा