शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

गजरा

*****************
*गजरा*
*****************
*आहे तुझा मनी ताजा*
*गजरा आठवणींचा*
*फुल एकेक माळीले*
*दरवळ रोज त्याचा*

*सुख दुःखाचे क्षणही*
*प्रेम धाग्यात गुंफिले*
*माझ्या कवितेत आज*
*तुझे चित्रही रंगले*

*चाफा प्राजक्ताचे येणे*
*झाले सहज अंगणी*
*बाग फुलांचीही आता*
*बहरली ती शब्दांनी*

*दुराव्याचे ही अंतर*
*मोती अक्षरात झाले*
*नसशिल ह्या क्षणाला*
*तुझे बोलणे स्मरले*

*बाग रोज फुलवितो*
*आठवणींच्या फुलांनी*
*सांजवेळी ते पहातो*
*चित्र दुरुन डोळ्यांनी*

******************
*सोमनाथ पुरी*
*वसमत जि. हिंगोली*
*****************






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा