*घुंगरु* (लावणी)
साज श्रृंगार केला सख्या, मी राणी प्रीतीची ||
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||धृ.||
नखरा केला नथीचा, साडीवर शोभे मोर पिसे
भर यौवनात रसरसलेली ज्वानी माझी दिसे
त्यावर खूले पिवळी धमक नऊवारी जरीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||१||
काढीते रांगोळी प्राजक्ताची मी तुझ्या अंगणी
मोगराही कसा बहरला,मी गज-याची दिवाणी
माळ वेणीत गजरा दिलबरा, मी राणी प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रितीची ||२||
उडवून दे एकदा बार इश्काचा रंगमहाली
राजसा टच्च अंगभर ज्वानी ही रसरसली
मी भूकेली सख्या दिलबरा तुझ्या प्रीतीची
पायी चाळ घुंगरांचे मनी अत्तर कुपी प्रीतीची ||३||
*सोमनाथ पुरी*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा