आज चांदणे रुसले
चंद्र नभी मावळला
जणू तरंग सागरात
अर्क भाव उतरला
तिथे बाकावर दोघे
रात्रांत जागलो संगे
रात्री पुनवेच्या होती
माझ्या आठवण संगे
छाया पाहतो ढगात
तुझी प्रतिमा हसरी
लुप्त अचानक होता
मनी आवस दुःखरी
मंद पहाटेचा वारा
स्पर्शतो सर्वांग सारे
स्पर्श तुझ्याविन करी
संथ लाटांचे किनारे
तेज स्मृतीत लख्खते
रंग आकाशाचे मनी
होता चंदेरी किनारे
रुप तुझेच स्मृतींनी
~सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा