वृत्त
गद्यात एकामागोमाग एक चरण म्हणजेच ओळी येतात.
पद्यात ओवी किंवा चरण असते.
पद्य रचनेत लय असते या लयबद्ध शब्द रचनेला वाक्य म्हणतात पद्याच्या वाक्यात ही जी विशिष्ट शब्दबद्ध रचना असते तिलाच वृत्त किंवा छंद म्हणतात.
वृत्त आणि चंदा चे काही नियम
१) वृत्तात अक्षरसंख्या ठरलेली असते.
२) चरणातील रस्व व दीर्घ हा अक्षर क्रम ठरलेला असतो.
३) रस्व अक्षरांना लघु म्हणतात.
४) रस व अक्षर u अशा चिन्हांनी दर्शवितात.
५) दीर्घ अक्षरांना गुरू अक्षर म्हणतात.
६) गुरु अक्षर अशा - चिन्हांनी दाखवतात.
७) गण म्हणजे गट चरणातील तीन-तीन अक्षरांचा मिळून गण तयार होतो.
यती----
पद्धत चरण वाचताना वाचकाला जिथे थांबावे लागते ते विश्रांती स्थान म्हणजे यती.
कवितेचे चरण वाचताना वाचक जिथे मध्ये थांबतो त्याला मध्यस्ती असे म्हणतात.
जेव्हा वाचक कवितेच्या आचरणाच्या शेवटी थांबतो त्याला अंत्यस्ती असे म्हणतात.
यती भंग
कवितेचे चरण वाचताना वाचक जेव्हा एखादा शब्द तोडून वाचतो त्याला यती भंग असे म्हणतात.
उदाहरण
प्रिय अमुचा एक महा-राष्ट्र
देश हा
हे काव्य चरण वाचत असताना गायक किंवा वाचत महाराष्ट्र म्हणतांना मधेच थांबतो यालाच येती गंगा म्हणतात.
-हस्व स्वर ( लघु )
अ, इ, उ,ऋ लृ
दिर्घ स्वर ( गुरू)
आ ई ऊ ए ऐ ओ औ
व्यंजन-
-हस्व ( लघु )
क कि कु
दिर्घ ( गुरू)
का की के कै को कौ कं क:
-हस्व ( लघु ) अक्षर दिर्घ केंव्हा होते.
जर लघु अक्षराच्या पुढे जोडाक्षर आले. व त्या जोडाक्षराचा आघात आधिच्या अक्षरावर येत असेल तर अश्यावेळी ते लघु अक्षर गुरू होते.
उदा -
मस्तक
हा शब्द पाहिला तर
म स्त क
u - u
असा लघु गुरूचा क्रम आपण लिहू.
पण वाचतांना स्त या अजोडाक्षराचा आघात म वर येतो. व्याकरण नियमानुसार अश्या ठीकाणी त्या लघु अक्षराला गुरू मानवावे. म्हणजेच इथे म लघु असला तरी तो गुरू समजावा लागतो.
अनुस्वार
ज्या स्वरावर अनुस्वार आला असेल तो स्वर किंवा व्यंजन दिर्घ समजावे.
उदा. नंतर
विसर्ग -
जर काव्यचरणात विसर्ग युक्त स्वर आला तर ज्या स्वर किंवा व्यंजनानंतर विसर्ग आला त्याला दिर्घ समजावे.
उदा.-
दु: ख येथे दु -हस्व असला तरी त्यानंतर विसर्ग आला असल्यां मुळे दु वर आघात येतो. म्हणून दु ला गुरू मानावे.
जर काव्य पंक्तिच्या शेवटी लघु अक्षर येत असेल तर ते दिर्घ उच्चारले जातील तर त्याला गुरू मानावे.
ही दोन्ही अक्षरे इंग्रजी भाषेत उपयोगाची आहेत मराठी भाषेत सरळ उपयोग होत नाही. आणि यांना नविन स्ववर म्हणून मान्यता दिली आहे. याचा उपयोग अजून तरी मराठीत फक्त इंग्रजी शब्दांच्या उच्चारणासाठीच केला जातो. व मराठी काव्यरचनेत आपण इंग्रजी.स्वरांचा वापर करत नाही. पण अ + य = अॅ जर म्हटल तरी ते गुरू येइल. व आॅ सरळ गुरूच येइल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा