|| अभंग ||
मार्ग अहिंसेचा,त्याग व शांतीचा ||
दावीला धम्माचा, गौतमांनी ||१||
मूळ ते दुःखाचे, ईच्छा असक्तीचे ||
नश्वर देहाचे, क्षणभंगुर ||२||
आर्य सत्याचेही, मार्ग ते अष्टांग ||
भिनावे सर्वांग, मनुष्याच्या ||३||
सम्यक ती दृष्टी, कर्मही सम्यकं ||
संकल्प सम्यकं, वर्तनावे ||४||
प्रज्ञावंत व्हावा, मानव शिलाने ||
अंत समाधिने, धम्म तत्वं ||५||
©सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा