शुक्रवार, २२ मे, २०२०

नाळ

नाळ तुझी तोडताना
तगमग ह्या मनाची
जीव सुरक्षित असो
आशा बाळंत मातेची

तुज घेऊन चालते
वाटं घोर संकटाची
बाळा तुझीये भविष्य 
घडो वाट भारताची

कुठे बांधू तो पाळणा
मुखी मधुर अंगाई
खाऊ चिऊचाही मुखी
कधी भरु घास बाई

जीव कासावीसं आता
शुष्क झाले जीभओठं
चालताना मैलोमैली
हात पाय झाले ताठं

पान्हा ही आटला आता
अन्नपाण्या वीण माझा
भूकेलेल्या ह्या पोटाला
घोट कंचा देऊ ताजा

- सोमनाथ पुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा