चंद्रासवे गाते आई
कधी अंगाईचे गीत
चंद्र कधी होतो मामा
भाच्चा नात्याचीही रीत
रमजान च्या सनाला
चंद्र कोर दिसे मस्तं
तेंव्हा ईदही साजरी
मैत्री बंध होई चुस्तं
चंद्र बहिण भावाचा
नारळी त्या पौर्णिमेला
रक्षाबंधनी बहिण
राखी बांधते भावाला
वैशाखाच्या पौर्णिमेला
चंद्र गौतम बुध्दाचा
प्रज्ञा, शील, करुणाही
मार्ग दाविते धम्माचा
चंद्र असतो मधुही
प्रियकर प्रियसीचा
अंतराळी चंद्रयान
चंद्र होतो खगोलाचा
नाते पृथ्वी व चंद्राचे
आधी जीव निर्मितीच्या
संस्कृतीत बध्द झाले
अर्वाचीन मानवाच्या
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा