मधुचंद्र
तुझ्या मोहक डोळ्यांत
माझीच प्रतिमा पहावी
अन हरवून भान सारे
मूर्ती तुझी न्याहळावी
ओठ गुलाबी चुंबून ते
सारी मधुशाला प्राशावी
गुलाबी सुगंधाने रात्रही
नखशिखांत भिनावी
माळलेला गजराही
सुगंंधाने दरवळावा
अन अलगद फुलांचा
सडा सर्वत्र पसरावा
मालवून घेता दीप सारे
एक मिनमिनती ज्योत
दोघांत प्रकाशत जावी
एक पहाट तृप्त व्हावी
किरणे कुंतल कांतीवर
प्रभात रवीची स्पर्शावी
ऊर्मी मनाची सुमनापरी
दररोज फुलत रहावी
- सोमनाथ पुरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा